मे २०१८ - कुटं कुटं जायाचं..?

मे २०१८ - कुटं कुटं जायाचं - शिवथरघळ

बरीच वर्षे शिवथरघळी बद्दल ऐकले होते पण काही ना काही कारणाने आणि मह्त्वाचे म्हणजे थोडे आडवळणी असल्याने राहून जात होते.
मागच्या वर्षी दुबईतल्या दासबोध मंडळातर्फे , ९-१३ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी शिवथरघळ येथे १ आठवड्याचे शिबीर आयोजित केले होते. इथेच बरीच वर्ष राहणारी ही मुले , एकदम तिथे कशी राहातील ह्याची धाकधूक होती , पण तरी नाव घातले होते. तर त्यांना सोडायला आम्ही मिनी बस करून शिवथरघळला पुण्याहून भोर मार्गे वरंधा घाटातून गेलो होतो. साधारण १२५ किमी अंतर आहे. ताम्हीणी घाटातूनही जाता येते. पण पुण्याहून ते अंतर जास्त पडते.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

मे २०१८ - कुटं कुटं जायाचं - लोणार

महाराष्ट्रातील खरे तर अतिशय interesting पण तेवढिच दुर्लक्षित जागा म्हणजे लोणार सरोवर. प्राचीन काळी ऊल्का पडल्यामुळे लोणार सरोवर तयार झाले आहे. गुगल केले तर सगळी माहीती मिळेलच.सरोवर परिसरात 100 च्या वर पुराणकालीन देवळे आहेत. 1/2 दिवस तरी हाताशी पाहिजेत सगळी मंदिरे बघायला. त्या विवरात ऊतरून पाण्यापर्यंत जाता येते. पाणी मात्र पिण्यालायक नाही आहे. पुण्या मुंबईतून जाणार असाल तर लोणार आणी शेगाव अशी छान ट्रिप होऊ शकते.

सृजनाच्या वाटा: 

सृजनाच्या वाटा: मे २०१८: कुटं कुटं जायाचं- केशवराज

केशवराज मंदिर. गाव- आसूद, तालुका- दापोली, जि. रत्नागिरी. हे गाव दापोलीकडून आंजर्ले गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे. खाली गाडी पार्क करून मिनी ट्रेक करून वर टेकडीवर देऊळ आहे. एक सुंदर लहानशी नदी पुलावरून क्रॉस करून वर पायऱ्या चढत जायचे. हा पायऱ्या असलेला रस्ता नारळ पोफळींच्या बागेतून जातो त्यामुळे रस्ताभर हिरवीगार झाडे आणि सावली आहे. रस्त्याबरोबर कडेने पाटाचे स्वच्छ नितळ पाणी खळाळत असते.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

मे २०१८ - कुटं कुटं जायाचं - कणेरी मठ , कोल्हापूर

कोल्हापूर म्हणजे अंबाबाई, जोतीबा, पन्हाळा हे ठरलेले आहे.

पण कोल्हापूरपासून १२-१३ किमी वर असलेला आणि पुणे-बेंगलोर हायवे पासून ४ किमी अंतरावर असलेला हा सिध्दगिरी कणेरी मठ पण नक्की पहावा , मुलांना दाखवावा असाच आहे. आता आजकाल ह्याचा बराच प्रचार झालेला आहे , पण अगदी लांबच्या लोकांना कदाचित माहित नसेल म्हणून इथे नोंदवून ठेवत आहे. अतिशय रम्य परीसर आहे. मी बघून काही वर्ष झाली खरतर ... आणि थोडे गडबडीत होतो , पण नक्की वेळ काढून परत जावे असे ठरवले आहे.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सृजनाच्या वाटा: मे २०१८ - कुटं कुटं जायाचं..?

महाराष्ट्र दिनाच्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा!

आणि पालक-आयांना, काय मग लागला का निकाल? :winking:
आता शाळेचे रिझल्ट लागले म्हणजे खऱ्या अर्थाने धमाल, टेन्शन-फ्री सुट्टीला सुरुवात आहे. पण ही सुट्टी आणि आंबे सोडता मे महिना तसा फारच त्रासदायक ब्वा! घाम, चिकचिकाट, पाण्याचे प्रश्न... आणि हे प्रमाण शहरी भागात जरा जास्तच असतं. ह्या सगळ्यातून जरा छान सावलीत बसून गार वारा अनुभवायला एखादा वीकेंड कुठेतरी जायलाच हवं.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to मे २०१८ -  कुटं कुटं जायाचं..?
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle