प्रोजेक्ट स्टेटस (शत शब्दकथा)

कविन आणी सुमूक्ताच्या शतशब्दकथा वाचून मलाही एक शतशब्दकथा सुचली. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ईथल्या मैत्रिणी नक्कीच सांभाळून घेतील.मेघने वाचून काही बदल सुचवलेत. मेघ Bighug
–----------------------------------------

सायली

सायली ट्रॅफिकला शिव्या देत ऑफिसमध्ये शिरली. एका एक्सिडेंटमुळे ट्रॅफिक जॅम. क्युबीकलमध्ये अगदिच सामसूम होती. प्रोजेक्टमध्ये आग लागलेली. एका इश्यूसाठी एक ईमेल क्लाएंटला द्यायचा होता ज्यामूळे टेस्टिंग टिमवर लागलेले आरोप पुसले जाणार होते.

समीर

"च्यायला,काल रात्रभर झोप नाही एस्कलेशनमुळे, कुठून बुद्धी झाली आणि हा टेस्ट मेनेजरचा रोल घेतला.
"
अरे! सायलीचे पिंग आले, रिक्वायर्ड ईमेल सापडला. समीर आनंदाने ओरडणार तोच त्याला दरदरून घाम सुटला.....
काल तर सायली हार्टफेलने..........

मनिषा
मनिषा धावतच समीरच्या डेस्कपाशी आली आणि अक्षरशः जागेवर गोठली कारण किबोर्ड बडवला जात होता पण तिथे कोणीही नव्हते...
तिचा कलिग फोनवर ओरडतोय "मनिषा, ऐकतेस ना...समीर ऑफिसला येताना एक्सिडेंटमध्ये गेला..."

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle