रंग माझा वेगळा-भाग ८

रंग माझा वेगळा-भाग ८

निधी खूप विचार करायला लागली . तिच्या मिडल क्लास सराउंडिंग मध्ये तिने हि गोष्ट कधीच ऐकली नव्हती . फक्त सिनेमात असते हे सर्व अस आता पर्यंत तिला वाटत होत. "विकी डोनर" सिनेमा तिने बघितला पण होता . पण आता ती तिच्या बेस्ट फ्रेंड कडून त्याने केलेलं त्याच्या बाबत घडलेला किस्सा ऐकत होती. होत ते सगळं ग्रेटच होत पण आपण अशा व्यक्ती बरोबर फ्रेंडशिप निभावू शकू का ? अशी काहीतरी एक विचित्र हुरहूर तिला वाटायला लागली . तो नेपियन सी रोड वर रहात होता . त्याच्या आजूबाजूच सगळं वातावरण वेगळं . हाय फाय . आपण त्या सगळ्यात मिसफिट आहोत असं तिला वाटायला लागलं . त्याच थोडस "अघळ पघळ" बोलणं पण तिला खटकत होतच . ती फक्त इतके दिवस "असते एकेकाची सवय "म्हणून दुर्लक्ष करत होती पण आता मात्र तिच्या विचारांचा गोंधळ उडाला .

दुसऱ्या दिवशी "हाय बेब " करत तो बोलायला आला आणि तिला फारच जाणवलं आपण त्यांच्या मैत्रीच्या लायक नाहीयोत . काहीच कॉमन नाहीये आपल्या मध्ये ना वय / ना आर्थिक परिस्थिती / ना आजूबाजूच कल्चर . . . तिने अगदी थंड रिस्पॉन्स दिला आणि "लॉग आऊट होते रे. डोकं दुखतंय" असं कारण दिल . त्याने मात्र तस बऱ्यापैकी लगेचच ओळखलं "का ग बोलायचं नाहीये माझ्याशी .काल मी तुझ्या जवळ जे काही बोललॊ त्याने तुला मी काहीतरी वेगळा वाटतोय का ? "नाही तस नाही ". तिने सारवासारव केली खरी पण त्याने बरोबर ओळखल होत . म्हणून त्याच कौतुक पण वाटल

"कसलं टेन्शन आहे ग तुला . मस्त लाईफ एन्जॉय करायचं . बघ मी कसा आहे . तुला विचारतोय का काही . तुझ्या लाईफ बदल ? तुला तसच पाहिजे होत ना? . मग आता काय झालं? एकदम आल्या आल्या जाण्याच्या गोष्टी करतेस ? बिनधास्त बोल माझ्या बरोबर . सगळं टेन्शन मी घेईन मी तुझं . काळजीच करू नको . मी तुझ्या स्माईल साठीच आहे . मला रोज स्माईल देत जा फक्त . बाकी मला काही नको ग . अनकंडिशनल फ्रेंडशिप आहे आपली . ना मी तुझ्या कडून पैसे मागणार ना तू माझ्याकडून . फक्त मी तुझ्या कडून तुझ्या काळज्या मात्र मागतोय . त्या दे मला आणि मस्त एन्जॉय कर लाईफ " .एका दमात त्याने सगळंच बोलून टाकल

निधीं विचार करायला लागली " हा काहीतरी वेगळाच विचार करतो नेहमीच. असं आता पर्यंत कोणीच बोललं नव्हतं माझ्याजवळ माझ्याबद्दल "

काल रात्रीचे सगळे विचार पळून गेले आणि तिने परत त्याला स्माईल दिल .आणि मेसेंजर मध्ये त्याला गाण पण पाठवलं

कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में सभी के लिए

किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए

तेरा मिलना है उस रब का इशारा मानो

तुझको बनाया मेरे जैसे ही किसी के लिए

त्याने हसत हसत कॉमेंट केली "आता कशी "

"चल काही तरी विचार करू नको . बाय . गुड नाईट . टेक केयर"

निधीच्या डोक्यातलं सगळं मळभ दूर झाल होत . तिने पण हसत हसत लॉग आऊट केलं

दोन तीन दिवस निधीने पाहिलं तर विराज ने त्याचा फोटो काढूनच टाकला होता . स्वतःचा फोटो न लावता कुठलेतरी वेगळेच लावत असतो . शेवटी निधी ने विचारलेच त्याला . "अरे काय आहे तुझं रे . दोन दिवस सुद्धा स्वतःचा फोटो टिकू देत नाहीस . लगेच काढायची केवढी घाई. काय झालं काय तुला ?. एवढा छान चेहरा दिलाय वरच्यानी आणि तुला फोटो लावायला काय झालं रे ?

"अग नको ग. मुली फार पाठी पडतात ."

"ते तर आहेच. पण मग मी नाही का लावत . ? तुला काय वाटत तुझ्याच पाठी पडतात? आमचे पण फॅन आहेत बर का " आणि निधीने ऑनलाईन डोळा मारला

"माहित आहे ग तुझं . पण मी नाही लावत "

"तुम्ही काय बाबा मोट्ठी माणस . नेपियन सी रोड वर राहणारी . आम्ही काय बाबा छोटी माणस" निधीला गंमत करायची लहर आली

" गप्प बस जास्त बोललीस तर बघ "

"काय करशील रे ?"

"काहीच करणार नाही . तुझं निमूट पणे ऐकून घेईन डॉगी सारखं"

"असं काय . डॉगी सारखं काय रे ?

"मग काय ?आमच्या कडे आहेत ना डॉगी ते निमूटपणे ऐकतात आमचं "

"ते ऐकत असतील रे. पण तू असं काय म्हणतो स्वतःला ?"

"बर ते जाऊदे . ठीक आहे . मी काहीच करणार नाही . तू सांगशील ते करेन. काय करू ? बोल" -विराज

विराज असं अधून मधून लाडात येतच होता . तिला काहीच सुचल नाही ती गप्पच .

"मस्त जमत नाही ग आपलं . तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस खरंच अनकंडिशनल दोस्ती आहे आपली "

"हो . ना ते तर आहेच"

निधी म्हणाली "मी सांगेन ते ऐकशील म्हणतोस ना?. मग तुझा फोटो लाव प्रोफाइल पिक्चर म्हणून . मगाशीच नाही का बोलले तुला ? "

"ते सोडून बोल . ऐक ना . आपण महिना -दीड महिना इथे एफ बी वर बोलतोय . तुला असं नाही का वाटत आता आपण नंबर शेयर करायला पाहिजेत "

"नको . इतक्यात नको "

"ठीक आहे माझा घेऊन ठेव . तुला वाटेल तेव्हा तुझा दे . पण दे"

"बघते रे . नक्की नाही "

नंतर चार दिवस विराज उगवलाच नाही . एफ बी वर वाट बघून बघून थकली ती

चार दिवसांनी उगवला . "बर नव्हतं ग . थोडा कामात पण होतो . सगळं एकत्रच आल बघ . तुझा नंबर असता तर कळवलं नसत का ?

ती पटकन म्हणाली "हो रे . थांबा जरा देते . "

" पोरगी पटली तर" विराजचा मेसेज आणि जोरजोरात हसायला लागला

"आ. काय बोललास ? म्हणजे बर नव्हतं . काम होत . हे सगळं नाटक होत तर?"

विराज आणखीनच जोरजोरात हसायला लागला .

"नालायक आहेस" निधी बडबडली

"पण तू माझी स्वीट फ्रेंड आहेस "

"जा जा रे "

कुठे जाऊ? परत गायब होऊ ?

"नको रे. आता गायब झालास तर बघ"

निधी त्यावर जोरात ओरडली ऑनलाइनच . "फटके देईन हा "म्हणाली

नेहमी प्रमाणे नाटकीपणे विराज ने " येस मॅडम हाजीर आहे फटाके द्यायचेत ना " वगैरे वगैरे बडबड केली आणि निधी जोरजोरात हसायला लागली

"एक नंबरचा नौटंकी आहेस "

"बघ हसलीस कि नाही? . हेच पाहिजे मला तुझ्याकडून . मला स्माईलच पाहिजे तुझी . अशीच हसत रहा ग. "

"चल लॉग आऊट होऊ का ? चल बाय टेक केयर" आणि नेहमीप्रमाणेच तो लॉगऑऊट झाला. अर्थात पाठोपाठ ती पण

"थोडक्यात विराजची सवय झालेय तर " निधी मनातल्या मनात पुटपुटली

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle