रंग माझा वेगळा- भाग ९

रंग माझा वेगळा- भाग ९

रविवार सुट्टीचा दिवस दोघांनाही त्याला हि आणि तिलाही

सकाळ सकाळीच विराजचा मेसेज . " निघी आय वॉन्ट टू हग यु " दोन मिनिटेच निधी जरा बघत बसली त्याच्या मेसेज कडे . असं काय हा ? डायरेकट हे काय ? लगेच पुढचा विचार आलाच " आजकाल अशी यंग मुलं अशी बरीच असतात बिनधास्त मित्र -मैत्रिणीकडे ह्ग मागणारी . त्यात काय एवढं ? बाऊ करण्यासारखं काही नाहीये." तिने मनाला समजावलं

आणि "थांब जरा . थोड्यावेळाने बोलते " असा मेसेज टाकून मोकळी झाली .

काय झालं असेल असं मनात येत होताच . एकीकडे किचन मधली काम पण उरकत होती . सगळी काम झाली आणि निवांत बसण्याची वेळ आली आणि तिने मेसेज केला "हा बोल " तो पण थोडाच मोकळा होता . त्याने पण थोड्या वेळाने मेसेज केला

" निधी आय वॉन्ट टेन थाऊसंट रुपीज फ्रॉम यु "

निधी शॉक्सड. निघीने ताबडतोब कळवलं सुद्धा " विराज इट्स शॉकिंग . काय बोलतोस तू समजतंय ना तुला . एवढा मोठा बिसनेसमन तू . बापाची करोडोंची प्रॉपर्टी असलेला बिझनेसमन आणि मला दहा हजाराकरता विचारतोय ? आय कान्ट बिलिव्ह इट विराज "

"पण तुला बिलिव्ह करावच लागेल शप्पथ . अग काय झालं . माझ्या क्रेडिट कार्ड मध्ये पैसे भरायचे राहिले . दहा हजार ठेवायचेत आज रात्री पर्यंत नाही तर पेंनल्टी भरावी लागेल ग . "

"मग भर ना . पण माझ्या कडे का मागतोस ? एकतर इतके पैसे मी नाही घरात नाही ठेवत. आणि तुझ्या मॉम-डॅड कडे माग कि "

"नाही ना त्यांच्या कडे मागू शकत नाही म्हणून तर तुझ्या कडे मागतोय . "

बराच वेळा मेसेज च युद्ध करत बसले दोघं . मेसेज वर मेसेज. ती शॉक्ड आणि तो अजीजी . "दे ना ग "ची

शेवटी निधी बोललीच "इट्स अमेझिंग विराज तुझ्या मॉम - डॅड कडे तू पैसे नाही मागू शकत ? इतकं तुझं आणि तुझ्या पेरेंट्स बरोबर च रिलेशन तकलादू आहे ?

"ते मला माहिती नाही पण मी नाही मागू शकत ग. असं कर आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी तुझ्या बिल्डिंग च्या खाली उभा राहतो . आल्यावर मिस्ड कॉल करतो तू लगेच पैसे घेऊन ये . येणार ना ? तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना ? "

"नाही येणार . आणि तुला माझं घर कुठे माहिती आहे ? ".

"माहिती आहे ग . माहिती आहे . कस ते तुला नंतर सांगीन . पण मी येतोय सहा वाजेपर्यंत तुझ्या बिल्डिंग खाली"

निधी घाबरली . "खरंच येणार कि काय ?"

"हे बघ जास्त जादा पणा करू नको एक तर मी तुला देणार नाहीये . कारण इतके पैसे माझ्याकडे नाहीयेत पण पण अगदीच तुला गरज असेल तर तुझे पेनल्टी चे ३,२०० ( तीन हजार दोनशे ) मी देऊ शकते."

आणि नेहमीप्रमाणेच अगदी नेहमीप्रमाणेच एवढं सगळं रामायण घडल्यावर विराज खदा खदा हसायला लागला . ऑनलाईन

तेव्हाच निधीला संशय आला

"विराज नक्की काय आहे . हे नेहमीप्रमाणेच ? "

शेवटी त्याने कॉल केलाच " लव्ह यु ग निधी . लव्ह यु . यु आर रियली माय बेस्ट फ्रेंड . अग बावळट . इतका मोठा बिझनेस मन आहे मी. लाखोंचे व्यवहार करतो दिवसाला आणि तुझ्या कडे १०, ००० रुपये मागेंन ? किव्वा पेनल्टी पण तुझ्याकडून घेईन ? बावळट आहेस का ग . ?

"अरे पण मी कुठे देणारे . फक्त पेनल्टीचे भरीन म्हणून सांगितलं ना तुला "

"पण ते तरी का ? निधी विचार कर ते तरी का ? "

निधी -"कारण यु आर माय बेस्ट फ्रेंड "

"आत्ताच सांगतोय निधी तुला . कितीही बेस्ट फ्रेंड असू दे. पण दोस्ती मध्ये पैशाचा व्यवहार आणायचा नाही ग. तुम्ही दोस्ती मध्ये प्रेम द्या . समोरच्याला सहानभूती द्या . पण पैसे ? अजिबात द्यायचे नाहीत. एकदा का पैसे दिलेत कि संपलातच तुम्ही . समोरची व्यक्ती तुम्हाला बरोबर ओळखून जाते आणि एवढ्या पैसेवाल्याला तर नाहीच नाही . कळलं का? शिरलं का डोक्यात ?

निधीने कॉल वरच हात जोडले " बाबारे तुला समजण जरा कठीणच आहे ".

"समजून घे समजून घे . खूप काही समजावींन मी तुला. खूप काही धडे देईन . समजल ना येडू ? "

"आता एव्हढच तुझ्याकडून समजावून घेण्याच बाकी होत .यु आर डिफरंट " निधी

"मग आहेच मी वेगळा सगळ्यांपेक्षा .चल ठेवतो". आणि कॉल बंद केला त्याने

निधीने नेहमीप्रमाणे कॉल संपल्यावर मेसेज वर स्माईल दिली .

दुसऱ्या दिवशीच विराज चा मेसेज

"काय करतेयस."

"मस्त गिरनार ग्रीन टी पितेय रे. मस्त असतो हॉट अँड स्वीट"

"म्हणजे माझ्या सारखा म्हण कि "-विराज

"हो रे बाबा तुझ्या सारखा. नार्सिसिस आहेस पक्का . स्वतःच कौतुक करून घेणारा"

तेवढ्यात निधीच व्हॉट्स अप प्रोफाइल कडे लक्ष गेलं तर एका रावडी माणसाचा फोटो लावला होता . अगदी त्याच्या स्वतःच्या विरुद्ध . तिने एफ बी चेक केल तर तिथेही तोच फोटो

लगेच हटकलच तिने " काय रे कसला काही तरी रावडी फोटो लावलास रे डीपी म्हणून . आणि दोन्ही कडे "

"आहे ग त्या मागे एक कारण आहे . निधी माझ्या वर जास्त जीव लावू नको हा नाहीतर मग असं होत "

"घ्या म्हणजे आधी सुरवात कोणी केली ? तू मला रिक्वेस्ट पाठवलीस . मी नाही . आणि तू बोलायला सुरवात केलीस . बोलून बोलून मला बोलत केलंस. नाही तर मी अशी पटकन कोणाशीही बोलणाऱ्यातली नाही रे "

"मग आहेच तसा मी. मला एखादी व्यक्ती आवडली कि मी स्वतःहून अप्रोच होतो " -विराज

"हो रे . पण जेव्हा तू मला रिक्वेस्ट पाठवलीस ना . त्या वेळी तुझा जर का हा डीपी असता ना तर तुझी फ्रेड रिक्वेस्ट मी ऍक्सेप्टच केली नसती आणि जीव लावू नको वगैरे ? काय आहे हे ? असं का म्हणतोस ?"

"अग माझी एक खूप क्लोज मैत्रीण होती ग . ती माझ्या वर रागावली - खूप रागावली कारण मी तिला त्रास दिलाय ग . ती खूप रडत होती परवा. तिला खूप दिवसांनी मेसेज केला मी . ती खूप रागावलेय माझ्यावर -खूप काय काय बोलली मला म्हणून मी तिच्या कडे शिक्षा मागितली तर तिने मला शिक्षा दिलेय सोशल मीडिया वर कुठेही तू स्वतःचा फोटो लावू नको म्हणून . मी तिच ऐकलंय"

निधी जोरजोरात हसायलाच लागली .

"काय झाल ? कशाला हसते बावळट "

"विराज तुला हिच्या कडे -तिच्याकडे शिक्षा मागायचं फार फॅसिनेशन आहे रे . माझ्या कडे पण सारख्या शिक्षा मागत असतोस . अगदी बाळ आहेस तू .एवढा मोठा बिसनेसमन तू पण किती इनोसंट आहेस रे "

"अग म्हणजे काय ? आहे हा असा आहे . मला नाही कोणाला दुखवायला आवडत . मग माझं चुकल तर मी शिक्षा भोगतो"

" हो आणि मागून मागून. कस ग तरी छोट छोट बाळ आहे ते " निधी जोरजोरात हसायला लागली

"विराज कित्ती स्वभावाने चांगला आहेस रे. कोणी तरी फायदा घेईल तुझा" निधी पटकन बोलून गेली

"असं नाही काही . तसा मी स्ट्रॉंग पण आहे . आता डॅड चा बिझनेस संभाळतोय ना ? . त्यांना मदत करत असतो की " .

"हो तेही आहेच म्हणा "
दुसऱ्याच क्षणी त्याने एक पेंटिंग चा फोटो पोस्ट केला

निधी " किती सुंदर आहे रे " " मी काढलाय " विराज म्हणाला

"वौव म्हणजे कलाकार आहेस तू . अरे माझी पण चित्रकला चांगली होती रे लहानपणी" म्हणून निधीने पण तिची काही चित्र पाठवली

"म्हणजे बघ आपण दोघे सारखे सारखे कधीपासून म्हणतोय मी . म्हणून आपलं खूप जमत" . विराज म्हणाला

"पण माझ्या पेक्षा तू काढलेली पेंटिंग खूप म्हणजे खूपच सुंदर आहेत" निधी बोलली . लगेच विराजने आणखीन दोन चार पेंटिंग पोस्ट केली ." कसला आहेस रे तू . तू आर्ट गॅलरी मध्ये तुझ्या पेंटिंग चा एक्सझिबिशन का नाही भरवत रे."

"अग कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये पूर्वी मी माझी पेंटिंग विकायला ठेवली होती"

"काय सांगतोस काय . ? विकायला ?"

"हो विकायला. पण ती जास्त महिने नाही ठेवली . मग डॅड च्या बिझनेस मध्ये सामील झालो ना . मग वेळ कुठे आहे पेंटिंग काढायला" .

"ग्रेटच आहेस रे तू विराज . किती वेगळा आहेस तू . सर्वांपेक्षा युनिक आहेस . खरंच . खूप वेगळा आहेस तू "

निधी म्हणून गेली

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle