तरुण तुर्कांच्या देशात ६

तरुण तुर्कांच्या देशात १: https://www.maitrin.com/node/3918
तरुण तुर्कांच्या देशात २: https://www.maitrin.com/node/3922
तरुण तुर्कांच्या देशात ३: https://www.maitrin.com/node/3936
तरुण तुर्कांच्या देशात ४: https://www.maitrin.com/node/3944
तरुण तुर्कांच्या देशात ५: https://www.maitrin.com/node/3966

आजचा दिवस प्रवासाचा होता. आज आम्ही कुसाडासीला जाणार होतो. चुकुन काल केलेली बलुन राईड काही कारणाने कॅन्सल झाली तर या विचारामुळे आजचा दिवस बफर म्हणुन ठेवावा असा विचार आधी केला होता. त्यामुळे आजची फ्लाईट दुपारी बारच्या सुमारास होती. अर्थात जर ठरल्याप्रमाणे बलुन राईड झाली तर तेव्हढीच झोप जास्त मिळावी हा माझा आळशी विचार होताच.
कालच सगळ बघुन झाल्याने आज निवांतपणे उठायच प्लॅन माझ्या डोक्यात होता. पण काल रात्री एक टुम निघाली की आज आपण हॉटेलच्या गच्चीवरुन इतर लोकांचे बलुन्स बघु. त्यामुळे आजही फार झोपण शक्य नव्हतं. पण तरीही जितक्या उशीरा उठता येइल तितक्या उशीरा उठुन आम्ही सातला वर आलो.

तिथे ऑलरेडी बरेच इतर लोकं जमलेच होते. भल्या पहाटे एकदम टकाटक तयार होउन एक कपल फोटो काढत होते. आम्ही आपले असच इकडे तिकडे बघत राहिलो. मग हळुहळु लांबवर बलुन्स उडायला सुरवात झाली. एक बलुन तर आमच्या डोक्यावरच आला, इतका जवळ की आम्ही आणि बलुनमधे असणार्‍या लोकआंनी एकमेकांकडे बघुन हात हलवले. आम्ही सगळेच फारच आवतारात असल्याने मला फोटो काढायची शुन्य इच्छा होती पण भैरवीला फोटो काढायचेच होते.. मग तिचे फोटो काढले, कपल फोटो काढले, फॅमिली फोटो काढले आणि फायनली फोटो काढाकाढीचा उद्योग आवरता घेतला.

खाली आमच्या रुममधे येउन आवरुन ब्रेकफास्टला वर आलो. ब्रेकफास्ट करुन होइपर्यंत निघायची वेळ झालीच. इथे येताना इस्तंबुलच्या विमानतळावर आम्ही उशिरा पोचल्याने जो गोंधळ झाला होता त्यामुळे सावधगिरी म्हणुन इथल्या विमानतळावर बरच आह्दी पोचायच ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही वेळेवर निघालो, वेळेवर पोचलो. परत दोनदा सिक्युरिटी झाली. इथल विमानतळ फारच छोटं आहे. अगदी बसस्टँड असावा तसच. एक का दोनच गेट आहेत, त्यामुळे बसायला जागा नसतेच. त्यात आम्च्या आधीची फ्लाईट लेट झाली होती त्यामुळे त्या फ्लाईटचे पॅसेंजरही होतेच. सिक्युरिटी आटपुन आम्ही गेटजवळ आलो तर तिथे जवळपास ९०% भारतीय पब्लिक दिसत होतं. आईशप्पत सांगते, आपण भारतातल्याच एखाद्या छोट्याश्या एअरपोर्टवर आहोत असचं वाटत होतं. कानावर हिंदी, गुजराती, दक्षिणात्य भाषा पडत होत्या.

या एअरपोर्टवरुन फक्त इस्तंबुललाच (किंवा अंकारालाही असेल तर माहित नाही) फ्लाईटस जात असाव्यात. त्यामुळे आजाची आमची फ्लाईट इथुन इस्तंबुल मग एक तासाचा हॉल्ट आणि इस्तंबुल इझमिर अशी होती. आम्ही साधारण पाचच्या सुमारास इझमिरला पोचणार होतो.

आमची फ्लाईट वेळेवर असल्याने आम्हाला विमानतळावर जास्त ताटकळत बसावं लागलं नाही. विमानात आजही मागच्यासारखच गरम गरम कुरकुरीत चीज सँडविच मिळालं. भुक लागल्याने सगळ्यांनीच ते मनापासुन खाल्लही. एका तासात इस्तंबुलला पोचलो. आम्हाला वाटलं होत की इथे थोडा वेळ मिळेल पण नविन गेटपर्यंत जाईपर्यंत बोर्डींग ऑलमोस्ट सुरु व्हायची वेळ झालीच होती. मागच्या प्रवासात आमच्या छोट्या बॅगेची चेन थोडी खराब झाली होती. पण बॅग तशी नीट बंद होत होती. पण तरिही आता नविन बॅग घ्यावी असं माझं म्हणणं होतं तर एअरपोर्टवर उगीएच महाग बॅग कशाला घ्यायची त्यापेक्षा कुसाडासीला पोचलो की तिथुन दुकानातुन घेउ असं मनजीतचं म्हणणं होतं. त्यावर आमची भर एअरपोर्टवर संयमीत चर्चा झाली. शेवटी आपण एकदा इथल्या दुकानात जाउन तर बघु, बॅग महाग वाटली तर नको घ्यायला असा तोडगा निघाला. पण मनजीतच बरोबर होतं. तिथे बॅगा काहीच्या काही महाग होत्या.

थोड्याच वेळात आम्ही इझमीरच्या विमानात बसलो. परत चीज सँडविच आलच, पण जस्ट दीड तासापुर्वीच ते खाल्लं असल्याने आणि आता पोटोबा शांत झाल्याने ते कोणी घेतल नाही. इझमीरला उतरल्यावर बॅगेजबेल्टपाशी जात असताना एका ठिकाणी थोडी गर्दी जमलेली दिसली. जरा कुतुहलाने आम्ही बघायला गेलो तर एक काका जमिनीवर पडले होते. त्यांच्या तोंडातुन फेस येत होता. एक कामचलाउ डॉक्टर त्यांना मदत करत होता. प्रॉपर डॉक्टरला बोलवले असावे. एकुण त्या काकांचा अंदाज बघता त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला असावा. आम्ही तर काहीच मदत करु शकणार नव्हतो. म्हणुन थोडं जड मनानेच बॅग्स घ्यायला निघालो. नंतर बर्याच वेळ त्या काकांबद्दल मनात विचार येत राहिले. आय होप, त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळालेली असावी आणि ते सुखरुप असावेत.

आम्हाला इझमीरच्या एअरपोर्टवर घयायला टॅक्सी सांगितली होती, त्या ड्रायव्हरचा मी आलोय आणि अमुक अमुक ठिकाणी तुमची वाट बघतोय असा बाबांना मेसेज आलाच होता. आज काही केल्या आमच सामान येतच नव्हतं. विमान सुटायच्या आधी विमानाच्या पोटात सामान भरताना आपल्या सगळ्या बॅगा आत गेल्यात हे आईने पाहिलं होतं त्यामुळे सामान हरवलं अस्ले ही शंका नव्हती. आमच्यासारखेच बरेच लोकं उभे होते. बाबांना काही नाही तर उगीच तो ड्रायव्हर कधीचा थांबला आहे आणि तो वाट बघुन निघुन गेला तर याच टेन्शन यायला लागलं. म्हणुन आलेल्या दोन-तीन बॅगा घेउन ते आणि मनजीत ड्रायव्हरकडे गेले. थोड्यावेळाने अजुन एक बॅग आल्यावर ती घेउन अक्षयही गेला. आता आम्ही तिघीच उरलेल्या दोन बॅगांची वाट बघत बसलो. आमच्याबरओबर अजुन तुरळक लोकं होती. बर्याच वेळाने कोणीतरी एअरपोर्ट वरचा तरुण तुर्क उगवला. त्याला इंग्लिश फारशी कळत नव्हती, पण त्याने गुगल ट्रान्सलेटमधे टाईप करुन आम्हाला दाखवल की जास्तीत जास्त दहा मिनिटात बॅग येइल.

आमची अजुन पाचेक मिनिट वाट बघुन झाल्यावर सहज शेजारच्या पट्ट्याकडे लक्ष गेल तर आमची बॅग त्या पट्ट्यावर फिरत होती. आता ती एकटी बॅग त्या पट्ट्यावर कशी गेली काय माहित.

शेवटी साधारण सव्वा सहा- साडे सहाच्या सुमारास आम्ही इझमिरवरुन कुसाडासीला जायला निघालो.

आता थोडसं कुसाडासीबद्दल सांगते. मुळात टर्कीला जाउन बीच एंजॉय करायचा अस निम्या जनतेच म्हणणं असल्याने अर्थातच आमचा पहिला चॉइस हा सुप्रसिद्ध अँटाल्या हा होता. पण अँटाल्याचा प्रॉब्लेम हा ह्होता की हिवाळ्यात तिथुन पामुक्कलेला एक दिवसाच्या टुर्स नव्हत्या. मग अँटाल्या करायच म्हणल तर आम्हाला एक दिवस तिथे राहुन परत एक प्रवास करुन पामुकलेजवळच्या डेनिझिलला मुक्कम करावा लागला असता. मग आधीच कमी असेलेल्या वेळेत हे जमण अशक्य नसलं तरी कठिण होतं. त्यामुळे मी दुसर्या योग्य बीच असलेल्या आणि तिथुन पामुकलेला एकदिवसाच्या टुर्स असतील अशा गावाच्या शोधात होतेच. आमचे पुर्वीचे घरमालक हे तुर्की होते. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ते दरवर्षीप्रमाणे टर्कीत सुट्टीसाठी गेले असताना त्यांच्या व्हॉटस अप स्टेटसवर त्यांचा कुसाडासीच्या बीचवर डुंबण्याचे फोटो बघितले. मग लगेच शोधुन बगहितल तर ते पमुकलेपासुन फार लांब नव्हतं तसच तिथुन पामुकलेला जायला टुर होत्या. म्हणुन मग कुसाडासीला जायचं ठरवलं.

कुसाडासीला जायचा अजुन एक मोठा फायदा म्हणजे ते अँटाल्याच्या मानाने फार काही मोठ टुरिस्ट डेस्टिनेशन नसल्याने आणि आता ऑफ सीजन असल्याने आम्हाला एकदम मस्त हॉटेलचं बुकिंग बर्यापैकी कमी किंमतीत मिळालं होतं. अँटाल्याला साधं हॉटेल यापेक्षा दीडपट किमतीत मिळालं असतं.

कुसाडासीला पोचेपर्यंत साडे सात वाजले होते. आमच्या हॉटेलच्या शेजारच मेक्सिकन रेस्टॉरंट येता येताच बघौन ठेवलं होतं. त्यामुळे आज तिकडेच जेवायला जायचा प्लॅन होता. आज हॉटेलवर आल्या आल्या आधी सासरी फोन लावला. ट्रीपच्या गडबडीत त्यांच्याशी बोलण झालच नव्हतं. आधीच्या हॉटेलमधे इंटरनेट फार काही चांगल नसल्याने तिथुन फोन लावता आला नव्हता. इथे इंटरनेटचा स्पीड मस्तच अस्लयाने घरी व्हिडिओ कॉल केला. आमचं बोलण होइपर्यंत बाकीचे तयार होउन हॉटेलमधे कुठे काय काय आहे ते बघुन आले. हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर रेस्टॉरंट होतं, तिथुन समोर छान समुद्र दिसत होता. हे कळल्यावर तिथेच जेवायचं का असा प्रश्न उपस्थित झाला. पण उद्या आम्ही पुर्ण दिवस पामुकलेची ट्रीप करणार होतो, त्यामुळे हॉटेलवर परतायला उशीर होणार होता. म्हणुन मग आपण उद्या दमलो असु तर उद्या इथे जेवु आणि आज मेक्सिकनला जाउयात असं ठरलं.

आठ साडेआठला जेवायला गेलो. तिथे मस्तपैकी वेगवेगळे खेळ उपलब्ध होते. काही मुलं पुल खेळत होते. मनजीत आणि अक्षयला कधीचं पुल खेळायला जायच होतं, आधी खेळणार्या मुलांच खेळुन झाल्याक्षणी भैरवी, अक्षय आणि मनजीत खेळायला गेले. त्याआधी खाण्याची ऑर्डर देउन गेले ते बरं झालं. आमची ऑर्डर घ्यायला रेस्टॉरंटचा मालकच आला होता. त्याच इंग्लिश फार काही बरं नव्हतं. ऑर्डर घेता घेता तो एक शब्द जर्मनमधे बोलला. म्हणुन त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की त्याला जर्मनमधे बोलण हे इंग्लिशपेक्षा जास्त कंफर्टेबल आहे. इस्तंबुलमधे बहुतेक सगळ्यांना इंग्लिश येत होतं म्हणुन लक्षात आलं नाही पण आता हळुहळु इथे लोकांना इंग्लिशपेक्षा जर्मन जास्त समजते आणि बोलता येते हे कळायला लागलं होतं.

जेवण करायला केवळ भुक लागली होती म्हणुन मनजीत आणि अक्षय टेबलवर आले. त्यांना अगदी लहान मुलासारख कधी एकदा जेवण संपवतोय आणि परत खेळायला जातोय असं झालं होतं. त्याप्रमाणे जेवण झाल्यावर ते परत खेळायला गेले. इथे एक गोष्ट लक्षात आली की इस्तंबुलमधे आम्हाला कायम जेवण झाल्यावर कॉम्प्लिमेंटरी चहा मिळायचा. तो नंतर कोणत्याच गावाला मिळाला नाही. इस्तंबुलमधे रेस्टॉरंटच्या व्यवसायात बरीच स्पर्धा असावी.

जेवणानंतरही ते दोघ पुल खेळायला गेले आणि आम्ही चौघं हॉटेलवर परत आलो.

दुसर्या दिवशी टर्कीत पहिल्यांदा ३ तासाचा सलग प्रवास होता. आमचा गाईड आठला आमच्या हॉटेलमधे येणार होता, त्यामुळे त्यादिवशी जरा लवकरच उठुन, आवरुन आम्ही तयार झालो. बरोबर आठला गाईड आल्यावर पामुक्कलेला जायला निघालो. पाचच मिनिटात गाईडने गाडी थांबवुन अजुन एका फॅमिलीला गाडीत घेतलं. आता गाडीत इतर भारतीयच असणार हे सवयीच झाल होतं. जिकडे तिकडे भारतीय प्रवासी दिसत होतेच, पण यावेळी गाडीत आलेलं कुटुंब चक्क मराठीच निघालं की. ते काहीतरी बोलत बोलतच आत आले आणि आम्ही सहाही जण एकमेकांकडे बघत राहिलो. इतके दिवस आम्ही एकमेकांशी काय बोलतो हे बाकीच्यांना कळत नसे, त्यामुळे आम्ही कौटुंबीक गप्पा, गॉसिप्स, आईने जावयांकडे केलेल्या आमच्या दोघींच्या तक्रारी, बाबांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी त्यांचे मिळालेले पैसे कुठे गुंतवावेत टाईप आर्थिक गप्पा अस सगळ बिनधास्त बोलु शकत होतो. आता काय करणार? त्यांच्यासमोर यातले कोणतेच बोलण प्रशस्त वाटत नव्हतं. आणि हे विषय सोडुन आम्ही सहाही जण बोलु शकु असा विषयही सुचत नव्हता.आज तर सगळ्यात जास्त वेळ प्रवास होता.

मग आम्ही थोड्यावेळ झोपायचा प्रयत्न केला. काही मेंबर झोपले, काही मोबाईलमधे डोक खुपसुन बसले. मधेच गाईडने गाडी थांबवुन एका मेक्सिकन तरुणाला गाडीत घेतलं. साधारण साडे नउ-दहाच्या सुमारास गाडी चहा ब्रेकसाठी थांबली. आत्तापर्यंत त्यांनाही आम्ही मराठी आहोत हे कळलच होतं. त्यांच्या बोलण्यातुन ते फक्त मराठीच नाहीत तर पुण्याचेही आहेत हे आम्हाला कळल होतं. इकडे माझ्या आईला अणि तिकडे त्या काकुंना एकमेकांविषयी फारच उत्सुकता वाटत होती. बरं त्यांच्याक्डे बघुन हे लगेच कळत होतं की आई, वडील आणि मुलगा ट्रीपला आलेत. आमच्याकडे बघुन त्यांनाही उत्सुकता असणारच होती. अर्थात आमच्याबरोबर सरदारजी पाहुन आई, वडील, मुलगा, सुन आलेत असं वाटायचा प्रश्नच नव्हता. आई वडील, मुली, जावई ट्रीपला आलेत हे कळतच होतं. गाडी थांबल्याथांबल्या आम्ही चहा/कॉफी घेत असताना मनजीत त्यांच्या मुलाशी बोलताना दिसला. मग त्या दोघांनी एकमेकांची उत्सुकता शमवल्यावर आम्ही पुढे निघालो.

आता मघाशी झोपही झाल्याने पुढचे दोन तास काय करायचा हा प्रश्नच होता. सुदैवाने भैरवी आणि अक्षयने बरोबर पत्ते आणले होते. एवढ्याश्या जागेत बदाम सात खेळायला स्कोप नसल्याने अक्षयने शिकवलेला नविन गेम खेळलो. एकदा पत्ते खेळायला बसलो की वेल कसा जातो ते तसही कळत नाहीच. गेमच्या एका एकदम कृशिअल मोमेंटला म्हणजे मी आणि भैरवी जिंकत असताना (आम्ही दोघी पार्टनर्स होतो) गाईडने माईक हातात घेतला आअणि पामुक्कले जवळ आल्याची घोषणा केली. आता आपण आधी ओनिक्स स्टोनच्या फॅक्टरीत जाणार आहोत, मग जेवायला जाणार आहोत आणि मग शेवटी पामुक्कलेला जाणार असं सांगितल. त्यामुळे मग गेम थांबलाच. खर तर मी आणि भैरवी जवळजवळ जिंकलोच होतो पण गेम पुर्ण न झाल्याने बाकीच्यांनी ते मानलच नाही.

आम्हाला कोणालाच त्या ओनिक्स स्टोनच्या फॅक्टरीत इंटरेस्ट नव्हता, उगीच आमचा पामुक्कलेचा वेळ कमी होणार होता पण काय करणार? गाईडबरोबर गेल्याचा हा मोठा तोटा. गाईडने सांगितल की ओनिक्स स्टोन फॅक्टरीत अजुन एक गृप आम्हाला जॉइन होणार आहे. ते लोकं अँटाल्यावरुन येणार होते. हे ऐकताच, सगळ्यांनी मला "तु तर म्हणाली होतीस की अँटाल्यावरुन एक दिवसाच्या टुर्स नाहीत म्हणुन मग ते कसे येणार?" हे विचारलचं. मी नेटवर बघैतल तेव्हा खरच मला अशा टुर्स दिसल्या नव्हत्या. त्यांना कशी मिळाली काय माहित.

आम्ही पोचल्यावर पाच मिनिटात दुसरा गृप आला. बघतो तर गृप म्हणजे एक मोठी सरदारजी फॅमिली होती. हे म्हणजे मनजीतसाठी इकडे माहेरचे लोक आणि दुसरीकडे सासरचे लोक असच झालं ना? त्या लोकांनाही मनजीतला बघुन फारच आनंद झाला. त्यांचं सगळ्यांच एकमेकांना 'सत श्री अकाल' म्हणुन विश करुन झाल्यावर मग सगळ्यांनी ओनिक्स स्टोन फॅक्टरीतली गाईड काय सांगते ते ऐकायला सुरवात केली. ओनिक्स हा एक अर्धपारदर्शक दगड आहे हे आम्हाला माहितच होतं. आई-बाबांच्या नविन घरात त्यांनी ओनिक्सचा बराच वापर केला आहे. पण तिथल्या गाईडने फार काही दगडाबद्दल माहिती सांगितली नाही, फक्त मार्केटिंग केलं. इथे कोणीच काहीच घेतल नाही. सगळेच दहा मिनिटात बाहेर आले. आमच्या गाईडच बिचार्याचं कमिशन बुडलं असणार.

मग गाईडने आम्हाला जेवायला नेलं. तिथेही कप्पाडोकिआसारखच बुफे जेवण होतं. थोडक्यात टर्कीत असं गृपला बुफे जेवण द्यायची पद्धत दिसतिये. आईला आता अनेक दिवस भात न खाल्याने भाताचे फारच वेध लागले होते. इथे बुफेत तिला त्यांचा पिलाव मिळाल्याने ती फारच खुश झाली. तिथे साधारण आपल्यासारखीच कोणतीतरी भाजी होती. त्या भाजी आणि दह्याबरोबर आईने भात खाउन ती फारच तृप्त झाली.

जेवुन खाउन झाल्यावर आमच्या गाईडला बहुतेक आमची दया आली असावी किंवा आता आम्ही चिडुच हे जाणुन आम्ही फायनली पमुक्लेच्या प्रसिद्ध सॉल्ट डिओझिट्सकडे जायला निघालो.

या जागेवर एकुण तीन आकर्षण आहेत. पहिलं म्हणजे अर्थातच सॉल्ट डिपोसिट्स आणि त्यामुळे तयार झालेली रचना, दुसरं म्हणजे क्लिओपात्रा पुल हा कोमट पाण्याचा नैसर्गीक पुल आणि तिसर म्हणजे हिएरापोलीस हे साधारण पहिल्या शतकातलं ग्रीक गाव. .

आम्ही साधारण एक-दीडच्या सुमारास तिथे पोचलो. तिथे पोचल्यावर आमच्या शहाण्या गाईडने सांगितल की आपण बरोबर दोन तासाने परत जायला निघणार आहोत. अरे, याला काय अर्थय? दोन तासात काय पाहुन होणार? तीन तास येण्याचे आणि तीन तास जाण्याचे असे सहा तास प्रवास करुन मेन ठिकाणी फक्त दोनच तास काय?

मुळात हातात दोनच तास असल्याने हिएरापोलीस ही आमची शेवटची प्रायोरिटी होती. आम्ही तिथेच जवळ असलेल्या पहिल्या शतकातल्या जिमच्या उरलेल्या अवशेषांपुढे एक दोन फोटो काढले आणि टेरेसकडे मोर्चा वळवला.

DC8A2745-525C-4BE9-ADD4-284DFFAAD256.jpg

00D33581-3028-473B-AAC9-E89BB6769F7C.jpg

तिथे जाता जाता एक टुम निघाली की आपण आधी क्लिओपात्रा पुल बघुन येउ आणि मग सॉल्ट टेरेसच्या इथे जाउ. क्लिओपात्रा पुल हा थोडा पुढे होता.

तिथे लिहिल्यानुसार आणि गाईडने सांगितलेल्या माहितीनुसार ह्या पुलातील पाणी हे नैसर्गीक प्रवाहातुन येतं. या पाण्यात म्हणे मेडिकल प्रॉपर्टीज आहेत. जर काही त्वचेचे विकार असतील तर त्या पाण्यात काहीवेळ राहिलेल्याने ते बरे होतात. तो पुल बघुन हे खर असेल असं आजिबातच वाटत नव्हतं. तिथे फारच शेवाळं साचलं होतं.याचं नाव क्लिओपात्रा पुल का तर कधीतरी क्लिओपात्रा या पाण्यात उतरली होती म्हणुन. मनजीत, भैरवी, अक्षय हे तर त्या पुलात उतरणारच होते. बाबांचही हो नाही चालु होतं पण ते फायनली तयार झाले. मी आणि आई पाण्यात उतरणार नव्हतो. पण मग सगळ्यांनीच फार आग्रह केला. भैरवीने माझ्यासाठी स्वीमसुट आणला होताच त्यामुळे माझा प्रश्न नव्हता पण आईने स्वतासाठी एक टीशर्ट आणि एक थ्री फोर्थ स्लॅक्स आणली होती. ते घालुन पाण्यात उतरलेलं चालेल का असं विचारल्यावर आमचा गाईड हो म्हणला, मग आईही तयार झाली.

मग जवळच असलेल्या त्यांच्या लॉकरमधे आमचं सामान ठेवुन, कपडे बदलुन आम्ही तयार झालो.

आयत्यावेळी आत जाताना प्रवेशाजवळच्या बाईने आईला अडवलं. हे कपडे चालणार नाहीत म्हणाली. तिच बरोबरच होतं. तिथे स्वीमसुट घालुन आत या हेच लिहिलं होतं. ज्यांच्याकडे स्वीमसुट नसतील, त्यांच्यासाठी तिथे एक छोटसं दुकानही होतं. पण आईला स्वीमसुट घालायला फारच लाज वाटत होती. स्पेशली जावयांसमोर. त्यामुळे आईने बाहेरच थांबायच ठरवलं. तिचा चेहरा अगदीच पडला. हे बघुन मग आमचा गाईड सरसावला. आईला घेउन तो मॅनेजरकडे गेला. ते दोघ काय बोलले ते कळलं नाही पण मॅनेजरने आईला टीशर्ट-स्लॅक्समधे आत जायला परवानगी दिली.

अशा प्रकारे आम्ही सगळेच पुलात उतरलो. मस्त अगदी छान तापमानाचं पाणी होतं. मला स्वताला त्या पाण्याची बॉयन्सी (मराठीत काय शब्द आहे माहित नाही) थोडी जास्त वाटली. मला पोहता येत नाही पण तरीही त्या पाण्यावर तरंगणं तुलनेने सोप जात होतं. त्या पुलात भैरवी, अक्षय आणि मनजीत पुढे गेले. आपोआपच ते तिथे आणि आई, बाबा आणि मी असे आम्ही तिघ हे गृप पडले. आएला आधी शेवाळ्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि बाबा. तिला भैरवीबद्दल अशी काळजी नसते) पडु का हीच भिती होती आई हा पुल फारच एंजॉय करत होती. त्या पाण्यात मजा येत होतीच. तिथुन उठावसंही वाटत नव्हतं. पण असच केलं तर आमचे टेरेस बघायचे राहुन गेले असते. त्यामुळे बर्‍याच वेळाने आम्ही तिघं बाहेर आलो. आम्ही तिघ कपडे बदलुन येइपर्यंत उरलेले तिघही बाहेर आले असतील अशी आमची अपेक्षा होती. पण हे तिघ आम्ही कपडे बदलुन येउ मग आम्ही त्यांचा पुलात फोटो काढु या आशेवर अजुन पाण्यात खेळतच होते. फायनली त्यांचे फोटो काढल्यावर ते बाहेर आले. त्यांचे कपडे बदलुन येइपर्यंत फार उशीर झाला होता.

मला सगळ्यात जास्ट इंटरेस्ट सॉल्ट डिपॉझिशनच्या टेरेस बघण्यात होता पण एकुणच हातात असलेला कमी वेळ, क्लिओपात्रा पुलात आधी जाणं आणि तिथे फारच वेळ टाईमपास करणं यामुळे आता तेच मिस होइल असं वाटायला लागलं होतं.

या सॉल्ट डिपॉझिशन टेरेस म्हणजे तिथे असणार्या नैसर्गीक हॉट स्प्रिंगस्मधे बरेच कॅल्शियमचे क्षार आहेत. त्यामुळे तिथे या क्षारांचा संचय होउन पायर्‍या पायर्‍यांची रचना तयार झाली आहे. या पायर्‍यांवर साधारण गुढग्याएवढ पाणी आहे. या पायर्‍यांवर जाताना चपला, बुट काढुन जावं लागतं. हे क्षार पावलाला किंचित टोचतातही, पण त्यामुळेच या क्षारांचा खरा अनुभव वा फील घेता येतो असां मी म्हणेन.

22324738-EA62-42C0-92E9-EEE116827776.jpeg

C5DAF38D-45DC-4BD7-BEB8-E2385B522BDE.jpg

81C37B1C-BA5D-4647-81C5-52A4DDACE5C0.jpeg

(भैरवीचा हा फोटो तिची परवानगी घेउनच टाकला आहे.)

आम्ही धावत पळत टेरेसपाशी गेलो, जेमतेम तिथल्या पाण्यात पाय बुडवले. थोडे फोटो काढले आणि वेळेत बसपाशी पोचण्याच्या टेन्शनमधे तिथुन निघालो. आम्ही पोचलो तर बाकीचे लोक आलेच होते. त्यामुळे मग आमची बस निघालीच.

एकुण काय तर पामुक्कलेचा पोपटच झाला. तिथे बघण्यासारख बरच असुनही आम्ही धड काहीच बघु शकलो नाही. जर मैत्रीणींपैकी कोणी पामुक्कलेची ट्रीप प्लॅन करत असाल तरे आम्ही केलेली चुक करु नका. एकतर अशी लांबुन येउन वन डे टुर करु नका आणि केलीच/करावी लागलीच तर आधी सॉल्ट टेरेसवर जाउन ते मनसोक्त अनुभुवुन मग पुलात डुंबायला जा. तिथे असणारे सॉल्ट डिपॉझिट्स आणि रचना हे एक नैसर्गीक आश्चर्य आहे, क्लिओपात्रा पुलासारखे पुल अजुन बरेच असतील.

परतीच्या प्रवासात परत आम्ही पत्ते खेळत होतो त्यामुळे हा प्रवास फारसा कंटाळवाणा झाला नाही.

काल ठरवल्याप्रमाणे आज हॉटेलच्याच रेस्टॉरंटमधे जेवायचं ठरवलं होतं. त्यामुळे कुठे जायची घाई नव्हती. मग आम्ही सगळे भैरवीने आणलेला कतान हा बोर्ड गेम खेळत बसलो. मला तो चक्क जमत होता म्हणुन मला गेम आवडला. बाबांना जमत नव्हता म्हणुन त्यांना आजिबातच आवडला नाही. अर्ध्या पाउण तासाने भुक लागल्यावर आम्ही जेवायला हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरच्या रेस्टॉरंटमधे गेलो. पण आज तिथे कुठल्यातरी कंपनीची पार्टी होती म्हणुन मग त्या लोकांनी आम्हाला खालच्या रेस्टॉरंटमधे पाठवलं.

तिथे गेलो तर तिथे काळं कुत्रही नव्हतं. दोन-तीन मिनिट थांबल्यावर मग तिथला मॅनेजर आला. आल्यावर मात्र त्याने आमची ऑर्डर घेतली. एकुण तिथला कारभार बघता जेवण यायला बराच वेळ लागेल असं वाटत होतं. पण आज काही आम्हाला घाई नव्हती. मग निवांत गप्पा मारत बसलो. एकुण मनजीतने पास्ता, मी आणि बाबांनी रिझोटो, भैरवीने फलाफल रॅप, अक्षयने चिकनशी कोणतीतरी डिश आणि आईने बहुतेक सॅलड घेतलं होतं. जेवण मात्र सुंदरच होतं.

निवांत जेवण करुन परत आई-बाबांच्या रुममधे मधे सोडलेला कतान खेळायला आलो. जेमतेम दहा मिनिट खेळला असेल पण बाबांना हा गेम फारच बोअर झाल्यावर थोड्या गप्पा मारु झोपायला आलो.

उद्या काहीच करायच नव्ह्तं. हा पुर्ण दिवस आराम करण, जमलं तर कुसाडासी फिरण, नाही जमल तर हॉटेलमधेच मजा करणं यासाठी ठेवला होता.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle