रूपेरी वाळूत - २२

ती समोर उभ्या असलेल्या इव्हा वगैरे कझन्सच्या ग्रुपकडे जाऊन हसत काहीतरी गप्पा मारू लागली. अजूनही तिच्या हातापायांतून वीज सळसळत होती.  कोणीतरी तिच्या हातात स्पार्कलिंग वाईनचा ग्लास दिला. तिने घोट घेताघेता समोर गार्गीला कडेवर घेऊन दादाबरोबर बोलणाऱ्या पलाशकडे पाहिले. तिच्याकडे त्याची पाठ होती. पण घामेजल्या पाठीला चिकटलेल्या टीशर्टमुळे त्याचे खांदे आणि मसल्स उठून दिसत होते. पाचच मिनिटांपूर्वी तिचे हात तिथे असल्याचे आठवून तिच्या अंगावर पुन्हा शहारा आला. 'डॅम यू गर्ल, भानावर ये' तिने स्वतःला पुनःपुन्हा बजावले.ती बघत असतानाच अचानक त्याने वळून तिच्याकडे बघितले. परत तेच नो इट ऑल स्माईल! शिट! म्हणत तिने खाली ग्लासात बघितले.

इतका वेळ तो दादाशी काय बोलत होता ते त्याच्याच लक्षात नव्हते. नोराला सोडून लांब व्हावेसे वाटत नसले तरी कसेबसे स्वतःला डिस्ट्रॅक्ट करून तो तिच्याकडे पाठ करून उभा होता. तेवढ्यात गार्गी त्याच्या कानात "काका, तुला एल्सा बोलावत्ये!" म्हणाली म्हणून त्याने वळून पाहिले तर नोरा ग्लासाच्या काठावरून त्याच्याचकडे बघत होती. तिची न ढळणारी नजर बघून तो हसला आणि तिने भानावर येत ग्लासाकडे लक्ष दिले.

एव्हाना स्लो डान्सची प्लेलिस्ट बदलून झटॅक गाणी सुरू झाली होती. सगळे नाचण्यात गुंग झाल्यावर कडेला उभे राहिलेलेसुद्धा थिरकू लागले. गल्लां गुड़ियाँवर थोडावेळ नाचून ती बाहेर पडली. आता पोटातले कावळे जोरात ओरडत होते. बुफे टेबलकडे जाऊन तिने डिशमध्ये बार्बेक्यू पिझाचे दोन स्लाइस घेऊन वर भरपूर सिझनिंग आणि सॉस ओतला. ती स्लाइस उचलणार तोच कानापाशी त्याच्या ओठांचा निसटता स्पर्श जाणवला. तिच्या पापण्या आपोआप मिटल्या. "अँड व्हॉट अबाउट युअर हबी, डार्लिंग!" तो वाकून नाटकीपणे तिच्या कानात म्हणाला. ओठ चावत वळून तिने त्याच्या समोर प्लेट धरली. "हूं!" प्लेटकडे इशारा करत ती एवढंच म्हणू शकली. त्याने एक स्लाइस उचलून मोठा घास घेतला. "यू आर लूकिंग ब्यूटीफुल.. ब्लू इज डेफिनिटली युअर कलर..." तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. 'तू रोजच तसा दिसतोस' ती मनात म्हणाली आणि तोंडाने फक्त थँक्स म्हणत तिने डाव्या हाताने केसांच्या बटा खांद्यावरून मागे सरकवल्या. तिच्या बोटातली रिंग चमकली, रिंगवरून त्याची नजर तिच्या गळ्याकडे आणि तिथून अजून कुठे जाण्यापूर्वी त्याने आवंढा गिळला.

"ओह गॉडss उभं राहून आता माझे पाय दुखायला लागले." विषय बदलत ती म्हणाली. "एक मिनीट" म्हणून त्याने स्लाइस पुन्हा प्लेटमध्ये ठेवली आणि अजून एक प्लास्टिक चेअर आणून तिच्या खुर्चीच्या समोर ठेवली. "आह.. थँक्स.." म्हणत तिने काचणारे अँकल स्ट्रॅप्स उघडून चंदेरी स्टीलेटो काढून टाकले आणि पाय उचलून समोरच्या खुर्चीवर लांबवले. तो प्लेटमध्ये आणखी दोन पिझा स्लाइस घेऊन आला आणि शेजारच्या खुर्चीत बसला. डावा हात तिच्या खुर्चीच्या पाठीवर ठेवल्यामुळे तो अगदीच जवळ होता. पुन्हा ती ब्लॅक ओपियमच्या हलक्याश्या सुगंधात बुडून गेली. खाताखाता दमून तिने त्याच्या छातीवर डोके टेकले. ती धडपडू नये म्हणून सहज त्याचा हात खुर्चीच्या पाठीवरून तिच्या खांद्यावर आला. दोघेही निःशब्द होऊन वर आभाळभर शिंपडलेल्या चांदण्या पहात होते.

"हाऊ रोमँटिक! तरी बरं, आज पाऊस आला नाही. नाहीतर सगळ्या प्लॅनवर लिटरली पाणी फिरलं असतं" पाठमोऱ्या पलाश नोराकडे बघत शर्वरी म्हणाली, शिरीष तिच्याकडे बघून हसला. गार्गी एव्हाना पेंगायला लागलेली बघून शिरीष शर्वरीने त्यांचा निरोप घेतला आणि घरी निघाले. काही वेळात एकेक करून गावातले बाकी मित्रमंडळ काढता पाय घेऊ लागले. मागे उरलेल्या इव्हा, माया आणि कंपनीने त्यांना आग्रह करून घरात पाठवले.

दारातून आत जाताच त्याने तिच्या खांद्यावरचा हात काढला. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्याला दिसत होते. "हे घर?" तिने विचारताच त्याने तिला घर दाखवायला सुरुवात केली. लिव्हिंग रूममधला बोल्ड ऍक्वामरीन एल शेप लेदर सोफा, त्याच्यामागे भिंतीवर लावलेले एक राखाडी पांढऱ्या स्ट्रोक्सचे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग, शेजारी लाकडी ट्रायपॉडवर ठेवलेला दुधी शेडचा फ्लोर लॅम्प, जमिनीवर मॅचिंग राखाडी पांढऱ्या हेरिंगबोन पॅटर्नचा शॅगी रग, एक लाकडी सेंटर टेबल आणि समोरच्या भिंतीवर भलामोठा फ्लॅटस्क्रीन टीव्ही, काळ्या चमकत्या ग्रॅनाईटचा ओटा आणि पांढरे कॅबीनेट्स, एक इवलूसे चार सीटर डायनिंग टेबल असलेले किचन, एक टेबल खुर्ची, टेबल लॅम्प, निळा फॅब्रिक सोफा, एक पेस्टल कॉफी रंगाचा रग आणि काचेच्या दाराची तीन रिकामी लाकडी कपाटे असलेली स्टडीरूम. "आता आपण इथेच राहायचं आहे." तो जिना चढता चढता बोलू लागला. "हे घर रिसॉर्टसोबतच माझ्यासाठी बांधलं होतं पण रोज इथे येण्यापेक्षा मला तिकडे रहाणं सोयीचं होतं म्हणून हे घर रिकामंच राहिलं. कधीतरी हे घर ओळखीच्या लोकांसाठी रेंट आऊट करत असे. गेल्या आठ दहा दिवसांत घर डीप क्लीन करून सगळं सामान लावून घेतलं. मायाकडे तुझ्या बॅग्ज आणि बाकी सामान शिफ्ट करायला किल्ली दिली होती तेव्हाच त्यांनी पार्टीचं सगळं प्लॅनिंग केलं"

"ओह!" ती आश्चर्याने सगळं घर न्याहाळत होती. एव्हाना ते वरच्या कोरिडॉरमध्ये पोचले होते. समोरासमोर दार असलेल्या दोन बेडरूम्स होत्या. "डावीकडची मास्टर बेडरूम आहे, उजवीकडे गेस्ट बेडरूम थोडी लहान आहे. युअर चॉईस! तुला हवं तिथे रहा."

"ओके.. पण आज बहुतेक आपल्याला एकाच बेडरूममध्ये झोपावं लागेल, नाहीतर ह्या लोकांना कळेल.." बोलताना ती जरा अडखळली.

"या.. राईट." तो केसांतून हात फिरवत म्हणाला.

त्याने मास्टर बेडरूमचे दार उघडले. "डॅम! इव्हा!!" ती कपाळाला हात लावत ओरडली. समोर भल्यामोठ्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवला होता आणि नाईट स्टँडवर शॅम्पेन, दोन फ्लूट्स, काचेच्या फुलदाणीत लाल गुलाबांचा बुके आणि फरेरो रोशेचा बॉक्स ठेवला होता. तिचा चेहरा बघून तो हसायला लागला. तिने त्याच्याकडे बघून डोळे फिरवले आणि भराभरा जाऊन हाताने त्या पाकळ्या गोळा करून कोपऱ्यातल्या डस्टबीनमध्ये टाकल्या. कोपऱ्यातली बॅग रिकामी दिसली म्हणून तिने वॉर्डरोब उघडून पाहिले. ड्रॉवरमध्ये तिचे सगळे इनर्स आणि छोटे छोटे कपडे ठेवलेले होते. तिने पटकन त्याला दिसत नाही ना याची मागे वळून खात्री केली. तो बेडवर बसून शॅम्पेन उघडत होता. "ठेवलीच आहे तर पिऊया."  "मी कपडे बदलून येते" म्हणून ती इव्हाने दिलेला सिल्की टॅंक टॉप आणि लांब पाजामा घेऊन बाथरूममध्ये गेली.

मोठ्या निळ्या चकाकत्या टाईल्स आणि एका बाजूचा मोठा पांढराशुभ्र चंदेरी क्लॉ फूट असलेला बाथटब बघून ती अवाक झाली. इथे लहान क्युट वगैरे काही गोष्ट नसणारच, सगळं फाईव्ह स्टार! म्हणत तिने तोंड वाकडं केलं. ओकेय.. जरा शांत होत तिने पटापट कपडे बदलले. चेहरा बेबी ऑईलने पुसून काढला, मग फेसवॉश लावून धुतला, केसांवर कंगवा फिरवला आणि बाहेर आली. लाईटमध्ये तिचा स्वच्छ फ्रेश चेहरा, जास्त लाल झालेले ओठ आणि तिच्या शरीराची सगळी वळणे स्पष्ट दिसत होती. त्याने तिच्यावरची नजर हटवून हातातला चॉकलेटचा रॅपर टेबलावर टाकला आणि पटकन उठून बाथरूममध्ये गेला. थंडगार पाण्याचा फवारा डोक्यावर पडल्यावर तो थोडा स्टेबल झाला. 'गेट अ ग्रिप' म्हणत त्याने शॉवर जेल ओतून पटकन आंघोळ केली आणि टॉवेल गुंडाळून बाहेर आला.

"हे!" ओरडून ग्लास टेबलवर ठेऊन नोराने ब्लॅंकेट डोक्यावर ओढून घेतले. तो हसत कपाटाकडे गेला आणि एक लूज जॉगर घातली. डन! म्हटल्यावर तिने ब्लॅंकेट खाली करून पाहिले तर अजूनही तो उघडाच होता. "शिट! तू अजून कपडे घातले नाहीस!" ती त्याच्या छातीपासून बेंबीच्या खाली असलेल्या लो वेस्ट जॉगर्सपर्यंत बघत ओरडली. त्याने तिच्या जवळ येऊन शेजारची दोन ब्लॅंकेट आणि उशी उचलली. तिने हातांनी तोंड झाकून घेतलं. "बेटर गेट युझ्ड टू इट! एरवी मी झोपताना कपडे घालत नाही, आज तू आहेस म्हणून इतके तरी घातले." बेडशेजारी फरशीवर ब्लॅंकेट पसरताना तो तिरकस हसत म्हणाला. ती शॉक होऊन लाल झालेलं तोंड लपवत पुढे काही बोललीच नाही.

एव्हाना बाहेरच्या अंगणातले आवरा आवरीचे आवाज थांबून किचनमधून भांड्यांचे आवाज सुरू झाले. "ओह नो, हे लोक आता भांडी घासून जाणार की काय?" म्हणत शॅम्पेन पिता पिता तिने डोक्याला हात लावला. ब्लॅंकेटबाहेर दिसणाऱ्या फक्त एका लूज बेल्टखालच्या मोकळ्या खांद्याकडे बघून त्याचं रक्त तापलं होतं. तिच्याकडे न बघायचा प्रयत्न करत त्याने एक चॉकलेट खाल्ले. आज कुणीतरी सोबर राहण्याची गरज होती. इनफ! म्हणून त्याने बॉटल उचलून कपाटात ठेवली. "प्लीजss डोन्ट बी अ पार्टी पूपर.."  तिने विनवले पण तो बधला नाही. केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर ओघळली, तिने फुंकर मारून ती उडवली. तो ब्लॅंकेटवर बसून तिच्याकडे पहात होता. कोणी एकाच वेळी इतकं निरागस आणि इतकं सेक्सी कसं दिसू शकतं? नोरा दोन्ही आहे. पण मी काय करू! त्याने श्वास सोडला.

"मी हाकलू का सगळ्यांना?" त्याने विचारले.

"अम्म, म्हणजे.. आपण जर इथे काही करत असतो तर हे किती एम्बरासिंग झालं असतं!" ती हसताहसता म्हणाली. तिच्यातली शॅम्पेन आता बोलत होती.

"तर त्यात मला काहीच एम्बरासिंग वाटलं नसतं." तो शांत होता.

काहीतरी सुचून तिचे डोळे चमकले. "येस! मग त्यांना एम्बरास करूया" म्हणून ती पुन्हा खिदळली. "वॉच!" म्हणून तिने उशी उचलली आणि दोन्ही हातांनी धरून दोन तीन वेळा जोरात ग्रे टफ्तेड हेडबोर्डवर आपटली. ती ओठ चावून हसत होती. ती काय करतेय ते लक्षात येऊन तो उठून उभा राहिला.

"हे काय आहे?" आता त्याला हसू कंट्रोल होत नव्हतं.

"आय डोन्ट नो. माझं डोकं हेडबोर्डवर आपटते आहे!" ती खांदे उडवत म्हणाली.

नुसत्या तेवढ्या विचारानेच त्याचे रक्त सळसळले. डोळ्यासमोर आलेल्या इमेजेस नाहीश्या करून स्वतःला कंट्रोल करता करता आपोआप हातांच्या मुठी वळल्या गेल्या होत्या. "सॉरी टू से, पण त्याचा असा आवाज येत नाही."

"मग कसा येतो?" ती त्याला चिडवत होती की खरंच बोलत होती हे समजायला मार्ग नव्हता. पण दोन्ही गोष्टी डेंजरस होत्या. तिच्या पाऊट केलेल्या टपोऱ्या ओठांकडे बघत तो स्वतः ला शांत रहा, तिचं ऐकू नको म्हणून सांगत होता. पण टेस्टोस्टेरॉनच्या लाटा त्याला पुढे जायला भाग पाडत होत्या.

"सायलेन्स?" तिने परत विचारले. त्याला तिच्या खेळात सहभागी व्हायचं नव्हतं पण सोडून देण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तिची नजर त्याच्या डोळ्यात मिसळली. तो उठून बेडपाशी गेला, मूठ आवळली आणि हेडबोर्डवर एक जोरदार बुक्का मारला. दोन, तीन. शेजारच्या टेबलवरचे ग्लास किणकिणले. चार. हेडबोर्डला किंचितसा क्रॅक गेला. प्रत्येक वेळी तिचे डोळे मोठे होत होते. तिने ओठ चावला आणि नकळत ब्लॅंकेट घट्ट पकडले.

किचनमधले आवाज थांबले. तिने हातातलं ब्लॅंकेट सोडून रोखलेला श्वास सोडला. त्याने खोल श्वास घेऊन दुसऱ्या कुठल्या जागी आहोत असे समजायचा प्रयत्न केला. पण नाहीच, त्याच्या मनावर त्याचा ताबा रहात नव्हता. तिच्याकडे न बघता तो दाराकडे गेला आणि लाईटचा स्विच बंद केला. तो ब्लॅंकेटवर उशी ओढून आडवा झाला. तिच्या दिशेने काहीच आवाज येत नव्हता. गेटमधून कार बाहेर पडल्याचा आवाज आल्यावर त्याने तोंड उघडलं.

"गुड नाईट मिसेस." ती जागी असल्याची खात्री नव्हती.

"गुड नाईट हबी!" तिचा आवाज आल्यावर त्याने डोळे मिटले.

क्रमशः

घर
images (2)_8.jpeg

गायत्रीसाठी इंटेरिअर फोटोज
लिव्हिंग रूम
images(2)_9.jpeg

किचन
FB_IMG_1631293978562.jpg

FB_IMG_1631293965625.jpg

बेडरूम
FB_IMG_1631849973679.jpg

नोराचा पजामा
Screenshot_20210806-161815~2.png

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle