रूपेरी वाळूत - २८

Going to blue lagoon. Won't be back till tonight. Plz take care.

उठल्या उठल्या मोबाईलवर त्याचा टेक्स्ट दिसला. त्याच्याशेजारी तिला खरंच खूप शांत झोप लागली होती. आज फ्रेश वाटतंय म्हणून आवरून ती दवाखान्याकडे निघाली. रस्ताभर तिच्या डोक्यात पलाशचेच विचार सुरू होते. तिने फेक लग्नाची गोष्ट सुरू केल्यापासून तो जरा मऊ झाला होता. शांतपणे तिचं म्हणणं ऐकून तिला कायम सपोर्ट करत होता. आणि काल.. काल तिने कुणालाही न सांगितलेली, मनाच्या तळाशी लपवून ठेवलेली गोष्ट फक्त त्याच्यापाशी कशी उघड केली ते तिलाच अजून समजत नव्हते. त्याने शांतपणे, तिला कुठल्याही प्रकारे जज न करता, फक्त जवळ घेऊन थोपटलं होतं आणि तेवढ्यानेच तिला शांत झोप लागली होती. इज देअर समथिंग मोअर? इस धिस इव्हन रिअल?! तिला कळत नव्हतं, पण अजाणता तो तिच्या मनाच्या खूप जवळ आला होता. फक्त मनाच्या? शी डेफिनिटली कुडन्ट इग्नोर दॅट हॉट बॉडी!

कुलूप उघडून ती आत जाऊन बसली. असिस्टंट नेहमीप्रमाणे गायब होता. रात्रीची उतरली नसेल म्हणत मान हलवून तिने पीसी सुरू केला. दुपारी मुणगेकरांच्या गायीचं इंजेक्शन सोडता शेड्युल रिकामं होतं. हॉर्नच्या आवाजामुळे तिने मान उचलून समोर रस्त्यावर पाहिलं. थार! तिने स्वतःलाच चिमटा काढून खरंच थार असल्याची खात्री केली. तेवढ्यात उडी मारून पलाश उतरला. ब्लॅक ट्रावझर्स आणि टक इन केलेल्या प्लेन मरून शर्टमध्ये तो नेहमीसारखाच टवका दिसत होता. तो घाईत तिच्या समोर येऊन उभा राहिला. ती काही सेकंद त्याच्या डोळ्यात बघत राहिल्यावर तो जरासा खोकला. "तुमच्यासाठी एक पेशंट आणलाय डॉक!" तिरकस हसत तो म्हणाला. तेव्हा कुठे तिचं लक्ष त्याच्या मागून आलेल्या उंच माणसाकडे गेलं. शॉर्टसवर पांढराशुभ्र स्वेटशर्ट घातलेला बघून हा नक्कीच टुरिस्ट आहे हे तिने ताडले. त्याच्या हातात कसाबसा धरलेला भला मोठा गोल्डन रिट्रीव्हर मस्ती करत होता. माणसाचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. "हॅलो डॉक्टर!" तो तिच्याकडे बघून हसला. ओह हा बहुतेक टीव्ही सिरियल्समध्ये असतो.. तिला आठवलं. पलाश कडेची खुर्ची ओढून त्यात बसला. तिने कुत्र्याला टेबलवर ठेवायला सांगितले. "हॅलो! काय होतंय याला?"

"काल आम्ही लोकेशन बघायला हायवे पलीकडे डोंगरात गेलो होतो. रॉस पण फिरायला आला होता." हिरो केसांच्या कोंबड्यातून हात फिरवत म्हणाला.

"रॉस? हां ओके रॉस! मग?" ती कुत्र्याकडे बघत उद्गारली.

"मग आम्ही बरंच फिरून फोटो वगैरे काढत होते, इट वॉज प्रिटी डीप फॉरेस्ट. तिकडे दगडात एक नदी.. म्हणजे सॉर्ट ऑफ लहान नदी टाईप पाणी होतं."

एव्हाना पलाश कसंबसं त्याचं हसू दाबत स्वतःच्या हात आणि नखांकडे बघत होता.

नोरा त्याचं ऐकत ऐकता फुरफुरणाऱ्या रॉसला धरून त्याचं तोंड उघडून बघत होती.

"तर बराच वेळ रॉस सापडत नव्हता. मग त्या पाण्याच्या जवळ तो दिसला तेव्हा त्याने ऑलरेडी काहीतरी खाल्लं होतं. त्याच्या पंज्याला रक्त पण होतं."

"स्स.." नोराच्या कपाळाला आठ्या पडल्या.

"या.. ऍबसल्युटली डिसगस्टिंग.. सो आम्ही त्याला क्लीन करून रिसॉर्टवर परत आलो. रात्रभर तो नाकातून आवाज काढत होता, आय थिंक ही कान्ट ब्रीद.. सकाळी त्याला फक्त गाळलेलं चिकन सूप दिलं, बाकी काही खाता येत नाही."

तिने त्याची वायटल्स चेक केली. टॉर्च पेटवून तोंड आणि नाकात निरीक्षण केले. त्याला शांत करायला त्याच्या मानेखाली थोडं खाजवलं. "बहुतेक त्याने जी काही शिकार केली ते हाड वगैरे त्याच्या गळ्यात अडकलं आहे. इथे फार लिमिटेड इक्विपमेंट आहे. मला एक्स रे वगैरे काढता येणार नाही. पण मी चिमटा वापरून बघते नाहीतर कट देऊन सर्जीकली काढावं लागेल."

आता हिरोचं तोंड वाकडं झालं. "इथे दुसरं प्रायव्हेट क्लिनिक नाहीये का?" त्याने पलाशकडे बघून विचारलं. "आय डोन्ट ट्रस्ट गवर्नमेंट क्लिनिक अँड देअर डॉक्टर्स!"

रागाने तिचे गाल लाल झाले पण तिने रिऍक्ट करणं टाळलं.

"आय कॅन ट्रस्ट हर विथ माय लाईफ!" पलाश शांतपणे नोराकडे बघत म्हणाला. तिने झटक्यात मान वळवून त्याच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर राग विरघळून हसू उमटत होतं.

"तरीही प्रायव्हेट क्लिनिक हवंच असेल तर पणजी किंवा कोल्हापूरला जावं लागेल. इथे जवळ कुठेच नाही." त्याने पुढे सांगितलं.

"शक्स! रिअली? ओके.. करा मग काय ते इथेच." हिरो स्वतःला खुर्चीत आदळत म्हणाला.

तिने कुत्र्याला कुशीवर झोपवलं आणि त्याच्या छातीच्या पिंजऱ्याखालच्या मऊ जागी बंद मुठी दाबून चार पाच वेळा वरच्या दिशेने दाब दिला. त्याच्या घशातून विव्हळण्याच्या आवाजाशिवाय काही बाहेर आलं नाही.

"तुम्ही काल हे काढायचा प्रयत्न केला होता का?"

"हो, मी लगेच तोंडात हात घालून काढायला बघत होतो पण जमलं नाही." तो पटकन म्हणाला.

"तेच करायचं नाही. तुमच्या बोटांमुळे ती अडकलेली वस्तू अजून खोल जाते. मी आता केलं ते हायमलीक मनूव्हर आपण माणसांना करतो तसंच प्राण्यांना करायचं. फक्त इमर्जन्सी असेल तेव्हाच." ती काम करता करता बोलत होती.

हिरो आता तोंड बंद करून फक्त मान हलवत होता.

"आय थिंक ते थोडं त्याच्या एअर पॅसेजमध्ये गेलं असणार .. तुम्ही प्लिज त्याचे पाय धरून ठेवता का?" ती टूल किट उघडत म्हणाली. हिरोने उठून रॉसचे पाय घट्ट धरून ठेवले. दोन चार प्रकारच्या कात्र्या आणि दोन तीन साईजचे ट्विझर्स  काढून सोल्युशनने निर्जंतुक करून टेबलवर ठेवले. हातात ग्लव्ह्ज चढवले. डोक्यावर सर्जिकल हेड लॅम्प घातला आणि रॉसचं तोंड उघडलं. सगळ्या टूल्सनिशी जवळजवळ अर्धा तास खटपट केल्यावर तिने ट्विझर्स आत अलगद फिरवून अडकलेला लांबट तुकडा बाहेर काढला. पूर्ण वेळ तिचे डोळे किंचितही हलले नव्हते आणि रॉसच्या तोंडात लीलया फिरणारे हात जराही थरथरले नव्हते. तुकडा निघता क्षणी रॉस जिंकल्याच्या अविर्भावात जोरात भुंकला. "गुड बॉय!" म्हणत तिने त्याच्या पोटावर थोपटलं.

हिरो आता रडायचाच बाकी होता. नोराने ग्लव्ह्ज काढून हात धुतल्यावर त्याने तिला थॅंक्यू म्हणत मिठीच मारली. पलाशच्या तोंडाची सरळ रेष होऊन मुठी आवळल्या गेल्या तेवढ्यात तिने स्वतःची सुटका करून पलाशकडे वाकून बघत इट्स ओके म्हणत एक स्माईल दिलं.

तिने टेबलवरचा तो तुकडा न्याहाळला तेव्हा तिला धक्काच बसला. "यू नो व्हॉट? रॉसने झऱ्यावरचं कासव खाल्लय. मोस्ट प्रॉबब्ली अ बेबी. फक्त दोन इंच असते ते." तो काळ्यावर पिवळट रेषा असलेला  टणक पाठीचा तुकडा समोर धरून ती पुढे बोलत होती. "हे इंडियन स्टार टॉरटॉईज एक्स्टींक्ट होण्याच्या बॉर्डरवर आहे. आम्ही त्याला बापूजी म्हणतो. पूर्ण शाकाहारी आहे, गवत आणि फळं खातं. कुणावरच अटॅक करत नाही. त्यामुळे आधीच त्याला मारणारे प्राणी खूप असतात. आम्ही इथे ते काँजर्व करायचा प्रयत्न करतो आहोत. यू शुडंट टेक पेट डॉग्स टू सच एरिया. गोल्डन रिट्रीव्हर जेनेटिकली शिकारी आहेत. रॉसची यात काही चूक नाही, तुमची आहे. तिथला बोर्ड वाचला नाही का तुम्ही?" ती पुन्हा राग कंट्रोल करत बोलत होती.

"ओह.. सॉरी.. सॉरी असं परत अजिबात करणार नाही ." तो पडल्या चेहऱ्याने रॉसला थोपटत म्हणाला.

"गुड! नशिबाने आपल्याला त्याच्या विंडपाईपमध्ये ट्यूब नाही घालावी लागली. ही अँटिबायोटिक्स आणि पेन किलर्स आहेत. आता महिनाभर त्याला फक्त लिक्विड डाएट द्या कारण घश्यातली खरचटून झालेली जखम बरी व्हायला वेळ लागेल. डॉग फूड दिलं तर ग्राइंड करून गरम पाण्यातून द्या." तिने दोन गोळ्यांच्या स्ट्रिप्स आणि प्रिस्क्रिप्शन पुढे केले.

"थॅंक्यू सो मच. फीज?" तो उठता उठता म्हणाला.

"पन्नास रुपये. सरकारी औषधांचे! माझं काम फ्री आहे" ती म्हणाली. पलाश गालात हसला.

वरमून त्याने पैसे काढून दिले आणि ते दोघे बाहेर पडले.

--

So you trust me with your life huh?
अर्ध्या तासाने तिने ओठ चावून हसत टेक्स्ट केला.

"I did right? I married you." उत्तर आलं.
तिने बोटातली रिंग गोल फिरवली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle