जानेमन

जाने मन - कथा - वृंदा टिळक -एकता दिवाळी अंक 2022

“ ७८६२” टॅक्सी ड्रायव्हरला सावीने कोड सांगितला. टॅक्सी सुरु झाली. सावीने फोनवरचे बोलणे पुढे सुरू केले,” अग हो आई! वेळेत घरी परत जाईन. काळजी करू नकोस. बरं चल.. ठेवते आता .. मला दुसरा फोन येतोय.”

“हां यार..मां का फोन था.. रोज की वही बाते.. कहा जायेगी? कब जायेगी? कब आयेगी? अरे सुन सुन के कान भी पक जाते है!! वो छोड ..सब आ गये क्या?.. Wow .. फिर तो आज दांडिया मे खूब एन्जॉय करेंगे.. मै बस पाच मिनिट में पहुंचती हूं”
सावी ने फोनवर सेल्फी कॅमेरामध्ये चेहरा न्याहाळला. लाल चुटक रंगाचा घागरा, त्याला साजेसे कानातले आणि बांगड्या, मॅचिंग लिपस्टिक सगळे नीट आहे ना ते पाहिले. . प्रकाशाची तिरीप येताच ओढणीवरचे आरसे चमकत होते. स्वतः वरच ती खुश झाली.

ड्रायव्हर आरश्याचा अँगल अड्जस्ट करून तिला न्याहाळत होता ते तिच्या लक्षातच आले नव्हते. टॅक्सी मध्ये मंद आवाजात गाणे वाजत होते ..
जानेमन जानेमन तेरे दो नयन
चोरी चोरी लेके गए देखो मेरा मन

दांडिया जिथे होता ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आल्यावर गुगल पे करण्यासाठी तिने फोन हातात घेतला. पाहते तर फोनला रेंजच नव्हती. पटकन तिने पर्समधून कॅश काढली आणि टॅक्सी ड्रायव्हरला देऊन ती उतरली.

दाराशीच मित्रमैत्रिणी वाट पाहत थांबले होते. मंडपात शिरताच नर्तकांचे रंगीबेरंगी पोशाख, गायकांचे टिपेला चढलेले आवाज आणि धरलेल्या फेराची गती ह्या वातावरणाने आवर्तासारखे त्यांना आत ओढून घेतले.

दोन तास भरपूर नाचून, गप्पा मारून, दमून ते सगळे बाहेर पडले. दाराच्या बाहेरच एक उंच, रुबाबदार, तिशी ओलांडलेला तरुण उभा होता. त्याने सावीला थांबवून ‘एक्सक्युज मी मॅम ’ म्हटले.
ह्याचे आपल्याकडे काय काम असेल ते सावीच्या लक्षात येईना. तेवढ्यात तो म्हणाला,” मॅम, मगाशी गडबडीत तुम्ही दोनशेऐवजी पाचशेची नोट दिली होती. त्यानंतर मी तुमचा फोन पण ट्राय केला. पण तोही लागत नव्हता म्हणून तीनशे रुपये परत देण्यासाठी तुमची वाट पाहत होतो. “
आता सावीला आठवले की हा आपला टॅक्सी ड्रायव्हर असणार. मगाशी आपण त्याच्याकडे पाहिलेही नव्हते. ती म्हणाली,” थँक यू आणि सॉरी. तुम्हाला दीड दोन तास इथे उभे राहायला लागले. त्यावेळेत तुमचा किती बिझनेस बुडला असेल.”
त्यावर टॅक्सी ड्रायव्हर पटकन म्हणाला,” कोई बात नही मॅम .. वैसे .. तुम्हाला जिथून मी पिकप केलं त्याच बाजूला मला जायचंय. पाहिजे तर तुम्हाला मी सोडू शकतो.” थँक्स म्हणत सावी टॅक्सीत बसली.

घरापर्यंतच्या पंधरा मिनिटात मग त्या दोघांच्या गप्पा खूपच रंगल्या. त्याचे अदबशीर हिंदी कानांना फार गोड वाटत होते.
‘.. अभी तो कुछ कहाँ नहीं, अभी तो कुछ सुना नहीं
अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं ‘
गाण्याचे मंद सूर टॅक्सी मध्ये रेंगाळत असतानाच घर आले. बिलाचे पैसे गुगल पे करून सावी उतरली. त्याने तिला सांगितलं, “तुम्हाला कधीही कुठे जायचं असेल तर ॲपवरून टॅक्सी बुक करायची गरज नाही. माझ्या ह्या नंबर वर कॉल करा. बंदा आप की खिदमत में हाजीर हो जायेगा. बाय द वे ..मेरा नाम अमन ”

इतका श्रीमंत दिसणारा माणूस टॅक्सी ड्रायव्हर कसा? सावीला प्रश्न पडला. पण मग तिच्या लक्षात आले अँपवर बुक केल्यावर खूपदा गाडीचे मालक स्वतः देखील ड्रायवर म्हणून येतात. तसेच असणार. त्याचे रुबाबदार देखणेपण लक्षात राहण्याजोगे होतेच.

पुढचे चार-पाच दिवस ऑफिसमध्ये खूपच काम होते. दांडियाला जाणे शक्य नव्हते. शनिवारी मात्र त्यांच्या ग्रुपने ठरवले. आज नक्की जायचे. उद्या सुट्टीच आहे.
गडद जांभळ्या रंगाचा, मखमली अंगाचा अनारकली ड्रेस, त्यावर जाळीची ओढणी, कानात मोठ्या खड्यांचे झुमके आणि हातभर खड्यांच्या बांगड्या घालून सावी तयार झाली.

टॅक्सी बुक करताना सावीला अमनची आठवण आली. तिने कॉल लावला. अमनने “गुड इव्हिनिंग सावी मॅम” म्हटल्यावर तिचा चेहरा उजळला. म्हणजे त्याने आपला नंबर सेव्ह करून ठेवला होता तर!
तो म्हणाला,” गिव्ह मी फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स. मी तुम्हाला पिकप करायला येतो.”
वीस मिनिटांनी त्याचा फोन आल्यावर ती खाली उतरली तेव्हा तिच्यासाठी टॅक्सीचे दार उघडून तो वाट पाहत होता.

आपल्यावर रेंगाळलेली त्याची नजर तिला जाणवली.
“ .आज तो चांदरात जमीं पे उतर आई है।” असे ओठातल्या ओठात म्हणत् त्याने गाडी सुरू केली.
“ चौदहवी का चांद हो तुम…जान-ए-बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो”
टॅक्सीत गाणे सुरु होते. त्याने आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला,”अगर आप बुरा न मानो तो कुछ कहना चाहता हु” तिने फोनवर ईमेल वाचता वाचता “हां “म्हंटले. तो म्हणाला,” आज तो आप गजब की खूबसूरत लग रही हो.. सच में चौदहवी का चाँद “ सावीच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. “शुक्रिया जी शुक्रिया!” म्हणत ती पुढच्या इमेल चेक करू लागली.

आपल्या दिसण्याचं कौतुक होणं तिच्यासाठी नवं नव्हतंच. नवं होतं ते अमनने कौतुक केल्यावर तिला जे वाटलं ते. काहीतरी नवे, छान, हवेहवेसे मनात फुलत होते.
“हिअर यु आर” त्याच्या आवाजाने तिने मान वर करून पाहिले तर गरब्याचे ठिकाण आले होते. “कितनी जलदी आ गये!” गुगल पे करत ती म्हणाली आणि खाली उतरली.

तिच्याकडे बघत अमन म्हणाला,”आय विल बी वेटिंग फॉर यू ऍट टेन “
दांडिया खेळतानाही अमनचे पिंगट डोळे आपल्याला पहात आहेत असा सतत तिला भास होत राहिला. दांडिया खेळण्यापेक्षाही दहा वाजण्याची आणि दांडिया संपण्याची तिला आज उत्सुकता वाटत होती. दांडिया संपल्यावर ते सगळे बाहेर आले. तेव्हा अमन तिच्यासाठी वाट पाहत उभाच होता.

टॅक्सीत बसल्यावर कुठे जायचे ते सांगायची आवश्यकता नव्हतीच. आज पुन्हा गप्पा रंगल्या. आज दांडीयाचा शेवटचा दिवस होता. “उद्या दसरा. दशहरामें रावण वध होता है ना सावीजी.. धर्म का अधर्म पर, सत्य का असत्य पर, प्रकाश का तमस पर विजय “
“ आपको तो बहुत मालूम है दशहरे के बारे मे”

अचानक टॅक्सीच्या इंजिन मधून खरखर आवाज येत आचके देऊन टॅक्सी बंद पडली.“क्या हुआ जानेमन? नाराज हो गई क्या?”असे टॅक्सीला म्हणत अमन खाली उतरून, बॉनेट उघडून चेक करायला लागला. सावी पण खाली उतरली. समुद्रावरून येणारा थंडगार वारा दांडिया खेळून दमलेल्या तिच्या शरीराला सुखावत होता. मुंबई शहरातले सतत चमचमणारे दिवे ट्राफिक कमी झाल्याने निवळल्यासारखे वाटत होते.समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत टॅक्सीला पाठ लावून उभी असलेली सावी आपल्याच विचारात रंगून गेली होती. मनात अमनचे ‘जानेमन’ हे शब्द का कोणास ठाऊक पण रुंजी घालत होते.

“चलिये हुजूर, सवारी तयार है” म्हणत फडक्याला हात पुसून अमनने बॉनेट बंद केले आणि टॅक्सीचे दार उघडले. सावी मनात म्हणाली,” जानेमन को मनाना तो कोई आपसे सिखे।”

“आप चाहो तो आगे बैठ सकती हो।” असे अमनने म्हटल्यावर क्षणभर सावी घुटमळली. पण मग पुढच्या सीटवर येऊन बसली. त्याने लावलेल्या अत्तराचा मंद सुगंध तर मागे बसल्यावर देखील येत होता. त्याची बोलतानाची अदब मागच्या सीटवरून देखील जाणवत होती. पण त्याच्या शेजारी बसल्यावर जाणवले ते त्याचं देखणेपण, भरदार देहयष्टी आणि बोलण्यात रंगून गेलेला चेहरा.
गप्पांमध्ये कळले की गाडी त्याचीच होती. ड्रायव्हर नसेल आणि त्याला वेळ असेल तेव्हा अधूनमधून तो स्वतः चालवायचा. त्या निमित्ताने नवे लोक भेटतात, ओळखी होतात असे त्याचे म्हणणे होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्षे नोकरी करून तो आता एमबीए करत होता. त्याच्या थिसीसचा विषय होता,’ ग्रीनर फ्युचर.’

घराशी टॅक्सी थांबली. गुगल पे करायला तिने फोन हातात घेतला. “आज रहने दिजीये प्लिज.. “ असे म्हणत त्याने तिला थांबवले.
“अरे असं कसं? तुम्ही घ्यायला आलात हेच पुष्कळ झालं की. आता टॅक्सीचं बिल तरी घ्या.”
“O.k. एक काम करते है, ज्यूस सेंटर जाके ज्यूस पिते है उसका बिल आप देना “

ज्यूस सेंटर मधून निघताना हॅपी दसरा.. म्हणत तो पुढे म्हणाला, “दशहरा है इसलिये हमे खुशी भी है और थोडी मायूसी भी”
सावीने विचारले,”का बरं?”
“दांडिया नही होगा तो आप कैसे मिलोगे?”
खळखळून हसत सावी म्हणाली,”दांडिया नहीं तो क्या हुआ? कहीं तो जायेंगे ही ना ..तब आपको जरूर याद करेंगे”
“जहेनसीब जी शुक्रिया “ मिस्कील हसत तो पुढे म्हणाला,” याद करेंगे याने उसके पहले हमे भूल पाओगे क्या?”

सावीकडे ह्याचे उत्तर नव्हतेच. त्याची नजर चुकवत सावी लिफ्टकडे वळली. आजचा चंद्र काही वेगळाच वाटत होता.अंथरुणावर पडल्या पडल्या सावीला आजची संध्याकाळ पुन्हा पुन्हा आठवत होती. मग कधीतरी तिला झोप लागली आणि स्वप्नात होता तो पुन्हा अमनच.

दिवाळीसाठी सावी गावी गेली होती. कित्येक दिवसांनी आई-बाबा भाऊ भेटले. त्यांच्याकडून लाड करून घेण्याची मजा आगळीच होती. मुंबईच्या वेगवान आयुष्यात, नोकरीच्या रोजच्या धावपळीत, मायेच्या माणसांपासून दूर राहिल्यानंतर आता गावाकडचे हे शांत जीवन खूपच सुखाचे वाटत होते. दिवाळीची पहाट उजाडली. आज नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान. सुगंधी तेल, उटणे, गरम पाण्याने अंघोळ आणि त्यानंतर दिवाळीचा फराळ.. वर्षानुवर्षे अशीच साजरी होणारी ही आनंदी सकाळ. सुगंधी तेलाचा वास उटण्याच्या अंघोळीनंतरही गेला नव्हता आणि त्या ओढाळ गंधलहरींवर सावी तरंगत होती.

इतक्यात आईने हाक मारली. “तेवढा दिवाळीचा फराळ मंदिरात ठेवून येतेस का सावू? “ फराळाच्या ताटावर विणलेला रुमाल घालून सावी निघाली. मंदिरात देवापुढे ताट ठेवून परत येताना मग तिला पहाटेपासून पहिल्यांदाच फोन बघायला वेळ मिळाला. ‘हॅपी दिवालीचे’ मेसेजेस अनेक होतेच पण तिचे डोळे मात्र एक खास मेसेज शोधत होते. तिच्याही नकळत!
अमनने लिहिले होते,”दीपावली की शुभकामना। ये रात चाहे अंधेरी हो लेकिन दिये का उजाला आपका जीवन सुखमय करे .. हमेशा”
“ धन्यवाद, आपको भी दिवाली की बहुत बहुत शुभकामनाए” आता सावीचा दिवाळीचा आनंद शतगुणित झाला होता. केवळ एका मेसेजने इतका फरक पडू शकतो?! पडला होता खरं!

सावीला जास्त सुट्टी नव्हतीच. दुसऱ्या दिवशी पहाटे सावी मुंबईला यायला गाडीत बसली. स्टेशन येण्याआधीच तिने टॅक्सी बुक करु पाहिली तर दुप्पट तिप्पट रेटस. मग सावीने अमनचा नंबर फिरवला. कधीही फोन कर सांगितले त्याचा आपण गैरफायदा घेतोय का काय असं क्षणभर तिला वाटलं. सावी गाडीतून उतरली तेव्हा तिथे अमन हजर होता.

सावीला पाहताच त्याचा उजळलेला चेहरा, प्रसन्न हास्य पाहून त्याला फोन करण्यात आपण चूक केली नव्हती असे सावीला मनापासून पटले. ह्या दिवाळीच्या आनंदात एक अनामिक हुरहूर वाटत होती ती अमनच्या आठवणीने आणि तो रेंगाळणारा तेलाचा सुगंध होता तो अमनच्या तेलाचा होता हे तिच्या लक्षात आले. काय घडते आहे हे? काय मनात उमलते आहे? ती विचारात रमली होती.

शेजारी बसलेला अमनदेखील आज काहीसा गप्प होता. रस्ताही रिकामा होता. टॅक्सी थांबलेली तिच्या लक्षात आलीच नाही.
“इतक्या लवकर आपण घराशी पोहोचलो?”
“चाहो तो और दो चक्कर लगाये?” अमनने हसून विचारले.
तिने झटकन टॅक्सीचे दार उघडले. सामानाला ती हात लावणार तोच अमन म्हणाला,” हमारे होते हुए आप क्यो तकलीफ उठायेगी?” तो वरपर्यंत तिला सोडायला आल्यावर त्याला घरात बोलावणे, कॉफी आणि फराळ हे ओघाने आलेच. जाताना ‘दिवाली मुबारक हो’ म्हणत त्याने केलेले हस्तांदोलन जास्तच रेंगाळले होते. त्याच्या रुंद तळव्याचा उबदार स्पर्श कसले तरी आमंत्रण देत होता असे सावीला वाटले.

दिवाळीच्या सुट्टीनंतर सावीचे ऑफिस जोरात सुरु झाले होते. एक प्रॉडक्ट लाईव्ह जाणार होता म्हणून तयारी चालू होती. रोज ऑफिस मधून घरी यायला उशीर होत होता. सावीसाठी ही नोकरी आणि करिअर खूप महत्त्वाचं होतं. छोट्या गावातून आलेली सावी मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वतःला सिद्ध करू पाहत होती.

ठरलेल्या दिवशी प्रॉडक्ट लॉन्च व्हायलाच हवा होता. टेस्टिंग टीम रोज नवे बग्ज शोधत होती. ह्या अनपेक्षित अडथळ्यांनी अजून उशीर होत होता. आज काही झालं तरी हे पूर्ण करायचे या निश्चयाने सावी काम करत ऑफिसमध्ये बसली होती. सगळं काम संपवून तिने घड्याळात पाहिले तर रात्रीचे बारा वाजत आले होते.
“अरे बापरे इतका उशीर?” तिने अमनला फोन केला. ऑफिसचा पत्ता सांगून,”आप इधर आ सकते हो क्या?” असे विचारताच “ शुअर! एनीथिंग फॉर यू सावी” अमन म्हणाला.अमन खरंच अर्ध्या तासात हजर झाला. त्याने पहिल्यांदाच मॅम किंवा सावीजी ऐवजी ‘सावी ‘म्हटलेलं तिच्या लक्षात आलं.

पुढचे दिवस वेगवान होते. संध्याकाळी मंतरलेल्या होत्या. रोज सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी तो न्यायला यायचा आणि परत येताना घ्यायला यायचा. त्याच्याबरोबर भरपूर हिंडून सावी रात्री उशिरा घरी परत यायची. म्हणजे अमनच तिला सोडायचा. दोघांना एकमेकांशिवाय दुसरे काहीही सुचत नव्हते.

“असे हिंडताना टॅक्सीच्या बिझिनेसचे नुकसान होते आहे.” सावी म्हणाली. त्याने पटकन सांगितले,” उसकी फिकर मत करना .. ये तो … साईड बिझिनेस आहे. आपने नोटीस किया? अब टॅक्सी रास्तेपर उतरती है तो सिर्फ आपके लिये। अब दुसरे किसी के लिये हम टॅक्सी नहीं चलाते।”
सावीला इतके महत्व आत्तापर्यंत कोणीच दिले नव्हते. सावी सातव्या अस्मानात तरंगत होती.

ऑफिस आणि अमन ह्याशिवाय बाकी सगळ्यांशी संपर्क अगदी शून्यावर आला आहे हे सावीच्या लक्षातच आले नव्हते. गावाकडे घरी ऑफिसमध्ये सध्या खूप काम आहे असे तिने सांगितले होते. त्यामुळे घरचे देखील फोन करत नव्हते.

अशाच एका रंगलेल्या क्षणी अमन म्हणाला,“आपके जैसी काबिल और कॉन्फिडंट लडकी हमने आजतक देखी नहीं | ब्युटी और ब्रेन्स का ये कॉम्बिनेशन हम पे छा गया हैं। पता नही आपने क्या जादू किया है?आपके सिवा हमे कुछ दिखता ही नही”

“एक्स्क्यूज मी .. ये जादूवाला डायलॉग तो मेरा होना चाहिये ना? अमन, आपके सिवा तो मेरी कुछ दुनिया ही नहीं रही”

“सावी, लेट्स टेक धिस रिलेशन टू नेक्स्ट लेवल. लेट्स मेक इट ऑफिशियल .”
“ आप शादी के लिये प्रपोज कर रहे हो?”
“ आय एम टॉकिंग अबाउट निकाह “
“व्हॉट्ट …निकाह???“
“हा सावी.. हमारा पुरा नाम हैं अमानुल्ला. हमे तो निकाहही करना होगा .. और उसके लिये आपको सावी से सकीना होना पडेगा”
“ओह अमन, आप का अमन ये हिंदू नाम, आपकी हिंदू त्योहारोंकी इतनी जानकारी मुझे कभी लगा ही नहीं की आप अमानुल्ला होंगे।”
“ये जानकारी तो हमें हमारी अम्म्मीजान से मिली। वो भी पहले हिंदू थी। तो … कब करें हम निकाह?”
“अमन, लेट मी डायजेस्ट धिस. ये सब अभी अभी पता चला हैं।. . .. मुझे सोचने के लिये वक्त लगेगा।”
“जानेमन, सोच लिजिए। हमें वैसे तो कोई जल्दी नहीं हैं, लेकिन सच कहु तो आपके बिना अभी एक पल भी रहना मुश्किल है। आप हमेषा के लिये हमारी होने का हमे बेसब्रीसे इंतजार है।”
याच्यावर सावी काय उत्तर देणार? ती गप्पच बसली.

दुसऱ्या दिवशी सावीच्या ऑफिसची पार्टी होती आणि तिची एक कलीग सावीच्या घरी येणार होती. म्हणून अमनशी भेट होऊ शकली नाही. प्रेमभरी शायरी मात्र अमनकडून चॅट मधून सतत पोचत होती.

त्याचे भुरळ घालणारे व्यक्तिमत्व, त्याची अदब, त्याची बोलण्याची अदा, तिच्यासाठी कधीही, कुठेही येण्याची, काहीही करण्याची तयारी, त्याला असणारे तिचे कौतुक, ते व्यक्त करण्याची त्याची आकर्षक पद्धत सगळ्याचीच मोहिनी सावीवर होती. श्रीमंत, सुशिक्षित, तिच्यावर जीव टाकणाऱ्या अमनमध्ये तिचे मन गुंतले होते. पण त्याने दिलेल्या नव्या माहितीने मात्र तिची द्विधा मनःस्थिती झाली होती.

न राहवून तिने अमनला फोन लावला.
“ कैसी हो जानेमन? आपकी आवाज सुनने के लिये तो दिल तरस गया था… दो दिन नहीं, हमें लगा ...जैसे दो साल बीत गये। “
त्या दिवशी गाडीत बसताच सावी अमनला म्हणाली,”आज बाहेर नको, घरीच जाऊ या.”

अमन तर खूशच झाला. त्याचे डोळे चमकू लागले.
घरी पोचल्यावर कॉफी पित पित सावी म्हणाली,”अमन, हमें बडा आश्चर्य होता हैं आप जैसा हँडसम आदमी इतने साल कुंवारा कैसे रहा?”
आपण सगळी माहिती सांगूनही सावीने आपल्याला फोन केला, इतकेच नाही तर घरी बोलावले, त्यामुळे अमन निर्धास्त झाला होता. आता सावी आपलीच झाली असा त्याला विश्वास वाटत होता. “अरे अभी आपसे क्या छुपाना? एक निकाह तो हो चुका था .. एक लडका भी है हमें, लेकिन बादमे हमारी बेगम नखरे दिखाने लगी .. तो दे दिया तलाक हमने नीलिमा को”
“ ओह .. तो उनका नाम नीलिमा था!”
“ हां .. वो भी आपके जैसी हिंदू ही थी.. डॉक्टर थी वो .. हमारी पहचान हो गयी और जल्दही प्यार में बदल गई। और ऊस दिन आपने कोड बताया ७८६२, तो हमें लगा ये उपरवाले का इशारा है -७८६ नंबर और २ याने ..आप ही हमारी दुसरी बेगम होगी। “ “अमन, हमें आपके पास्ट से कोई ऐतराज नहीं ..लेकिन ये सावी से सकीना बनना हमसे नहीं होगा ।”
“ अरे, जानेमन, सिर्फ निकाह के लिये वो करना हैं .. यकीन मानो..सकीना होने से कुछ बदलाव नहीं आयेगा ..आपकी जिंदगी जैसी हैं वैसीही रहेगी… बाकी ना आपको परदा रखना होगा .. ना नमाज पढना होगा।”
“ तो फिर निकाह क्यू करना हैं? हम कोर्ट मॅरेज करेंगे।”
“ वो नहीं हो सकता।”
“ अमन, तो फिर आप हिंदू हो जाईये .. अमानुल्ला से अमन हो जाईये .. सिर्फ शादी के लिये .. यकीन मानो… बाकी आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं होगा .. ना आपको पूजा करनी होगी..ना व्रत रखना होगा।”

आता मात्र अमन .. नव्हे अमानुल्ला चिडला. “खामोश .. हमें काफीर बनाने की सोच भी कैसे सकती हो। ऐ लडकी, सून .. अगर हमारी बात ना मानी तो हमारे पास तुम्हारी ऐसी ऐसी तस्वीरे हैं ..वो इंटरनेट पे दाल दूंगा .. ज्यादा होशियारी मत दिखाना। नीलिमा को भी हमने ऐसे ही सिधा किया था।”
“ अमन, लेकीन मैं नीलिमा नहीं, सावी हूँ ।”
“ मान जा सावी .. हमारा दिल आ गया हैं तुम पे”
“ अमन, दिल तो मेरा भी आ गया हैं .. इसीलिये तो कोर्ट मॅरेंज का बोल रही हूं ।
आता मात्र अमानुल्लाचे तेवर एकदम बदलले. “फिर से वोही बात? पागल लडकी ..दाल ही देता हूँ फोटोज इंटरनेट पे.”

त्याने मोबाईल बाहेर काढला. इतक्यात दार धाडकन उघडले. पोलीस इन्स्पेक्टर आत आले.
“ मिस्टर अमानुल्ला, ब्लॅकमेल करणे, धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करणे, बळजबरी विवाह करण्यासाठी धमकी देणे ह्या आरोपाखाली तुम्हाला अटक होत आहे. “
“हा ..हा ..इन्स्पेक्टर ..तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे?”
फ्लॉवर पॉट मध्ये दडवलेला व्हिडीओ कॅमेरा बाहेर काढत इन्स्पेक्टर म्हणाले,” हा बघ पुरावा. इथून झालेले चित्रीकरण डायरेक्ट आम्हाला येत होते आणि ते तिथे रेकॉर्ड देखील झाले आहे. म्हणून तर आम्ही वेळेवर इथे पोचू शकलो. काल सावी मॅडम सोबत घरी आली ती त्यांची सहकारी मैत्रीण नव्हती तर आमच्या डिपार्टमेंट मधील ऑफिसर होती. सावी आणि तिने मिळून काल हे सगळे सेटिंग करून ठेवले. “

पोलीस अमनचे मनगट धरून त्याला नेत असताना सावी म्हणाली,”मिस्टर अमानुल्ला, आपण पहिल्यांदा भेटलो त्या दिवशी माझ्या पर्समध्ये एकही पाचशेची नोट नव्हती हे मला नक्की माहिती होते. आणि दुसरे म्हणजे त्याच दिवशी, माझ्याकडे बघण्याच्या नादात माझ्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात नीलिमा देखील आहे, ह्याकडे तुमचे लक्षच गेले नाही. तिची हकीकत तर मला आधीच माहिती होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणारा, ब्लॅकमेल करून, धर्म बदलून लग्न करायला लावणारा आणि नंतर मुलगा होताच छळ करून तिला तलाक देणारा .. तो नराधम तूच आहेस असा तिने मला लगेचच मेसेज केला होता. तेव्हापासून आमचे प्लॅनिंग सुरु होते. नीलिमाच्याकडे पुरावा नव्हता. तो सावीने मिळवला.

खरे तर दुसऱ्या भेटीच्या वेळी तू म्हणालास ना ‘आज जमीपर चांदरात उतर आई है ..ती कयामत होती रे.. तुझ्याच डावात तुला गुरफटवून सपशेल हरवणारी. आता जेलमध्ये बस उरलेली गाणी म्हणत. मुली भोळ्या असायच्या, त्या तुमच्यासारख्यांच्या डावाला फसायच्या हा भूतकाळ झाला. आता आम्ही सावध सजग झालो आहोत. “
-वृंदा टिळक

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle