त्यानंतरचे दिवस - ९

पुन्हा एकदा हायवेचा वार्‍याचा काहीही न विचारता होणारा झंझावाती स्पर्श अनुभवताच माझं डोकं जागेवर आलं. तोवर एका धुंदीतच सगळं चाललं होतं.
झर्‍याजवळून उठून पुन्हा पायवाटेने चालत आम्ही कधी डायनिंग एरियात आलो, बसलो , खाल्लं, दियाशी बोललो आणि निघालो हे सग्ळं नंतर आठवलं. ब्रेकफास्ट मस्त होता.

पण त्या झर्‍याजवळून उठताना जग माझ्यासाठी बदललं होतं. त्यानंतर मी आणि अंकित एकमेकांशी फार कमी बोललो.
जास्त बोलण्याची गरज त्या वेळी तरी नव्हती. एक तरल , अलवार अदृष्य तलम मलमल तरंगत आम्हाला लपेटून येत होती. आत्ता या क्षणी जगात कसलेच प्रॉब्लेम्स नाहीत असं वाटत होतं.

अंकित जवळ असूनही अजून जवळ हवासा वाटत होता. आवडलेल्या माणसाला आपणही हवेसे असणं हे इतकं परिपूर्ण फीलींग आहे की मग काहीही लागत नाही इतर. ड्रेसेस, अ‍ॅक्सेसरीज, कॉस्मेटिक्स, पार्टीज, अवॉर्ड्स, एफबी इन्स्टा चे लाईक्स .. कुठलीही दुसरी गोष्ट त्या फीलींग इतका सॅटिस्फाईड हाय देऊ शकत नाही.

माझ्या बिल्डिंगखाली पोचल्यावर मी उतरले आणि काय बोलायचं हे न कळून तशीच उभी राहिले. अंकित फक्त हसला, " मेसेज करतो नंतर. नाहीतर आज दोघाना ऑफिसला उशीर होईल."

मी वर आले तेंव्हा शिवानी रेडी झाली होती अल्मोस्ट.
" काय मॅडम कुठं पत्ता ? "
आणि मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणते , " भ र पू र एक्सरसाईझ झालेला दिसतोय आज. एका दिवसात महिन्याचा कोटा संपवला कि काय. एकदम ग्लो करतोय चेहरा "
शक्स! " हो जरा लौकर गेले ना. मग अंकित भेटला. आणि आम्हि ब्रेकफास्टला गेलो. " मी एका दमात सांगून टाकलं. उगच लपाछपी नको.
" हं ... ते कळलं. दिसलं मला गॅलरीतून. ठिके मी जाउ की थांबू? १५ मिनिटात रेडी होणार असलीस तर थांबते. पण गॉसिप मात्र संध्याकाळीच. " ती डोळा मारत म्हणाली.

संध्याकाळी पाय पसरून बसलो होतो तेंव्हा शिवानी ला सगळा किस्सा सांगितला.
" वाव. सॉलिड रोमँटिक आहे की पोरगा. मला वियर्ड वाटलेला जरा आधी. पण नीट विचार करून चालू आहे सगळं. आता मला जास्त काळजी वाटेना तुझी. तरीही हाच असं नाही, कोणत्याही मुला बरोबर रिलेशन मधे असताना स्वताला जपून असावं प्रत्येक मुलीने.
आपल्याला साबोताज करायची पॉवर कुणाला कधीच द्यायची नाही. " ती शून्यात बघत फिलसोफी झाडत म्हणाली.

" सिस्टर शिवानी, मी काळजी घेईन, आपण नि:शंक रहा" मी नाटकी पणाने म्हणाले.
" तुझं नाही मला माझं पडलंय. तुम्ही पॅशनेट व्हाल मग भांडाल, रडारड कराल तेंव्हा खांदा माझा ओला होणार आहे. तो कमीत कमी व्हावा यासाठी सांगतेय. त्यातून मी साईटला गेले की रात्री अपरात्री ग्रीफ कॉल्स नको आहेत मला. अर्थात अपडेट्स सगळे हवेत. आणि चांगलेच हवेत."
" यु हॅव साईन्ड अप फॉर दॅट लाँग बॅक स्वीट्स " मी म्हणाले पण ही नसणार तेंव्हा माझी मला खरंच काळजी होती.
आणि तिचं जाणं एक आठवड्यावर आलं होतं.

अंकितबरोबर वेळ घालवू वाटत होता पण खूप फास्ट नको होतं सगळं. एका पेसने झालं तर बरंय. दोघांना हळूहळू समजाऊन घ्यायला वेळ मिळेल. आत्ताच्या इंटेन्सिटीवरून तर भीतीच वाटत होती.
हा एकटेपणा उत्सुकता आणि शंका दोन्ही वाढवणारा होणार होता. आणि इच्छांचे तुफान येणार होते.

शिवानी जायचा दिवस आला. आम्ही बर्‍यापैकी सॅड मूड मधे एकमेकीना बाय केलं. रोज कॉल्स होणार होतेच. अपडेट्स दिले घेतले जाणार होते.
मी अंकितला मी अजून सांगितलंच नव्हतं शिवानीच्या ऑनसाईटचं. चॅट आणि प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांमधे तो विषयच येऊ नये याची मी खबरदारी घेत होते. माझ्याच मनात एक चोर बसला होता ना!
तरीही आम्ही बराच वेळ एकमेकांशी कनेक्टेड असायचो त्यामुळे अवघड होत चाललं होतं ते प्रकरण.

पुढच्याच आठवड्यात अंकितने मला विचारलं की त्याच्या एका मित्राचा बर्थ डे आहे आणि मला जायला आवडेल का?
"कुठे जायचंय? मी विचार करून सांगते. "
असं मी त्याला म्हटलं खरं पण मनात हुरहुर सुरू झालीच होती. आत्तापर्यंतच्या आमच्या भेटी फक्त दोघांच्या होत्या. आता मात्र त्याच्या मित्रांची आणि माझी ओळख होणार होती. ही एक थोडी ट्रिकी स्टेप होती.

मित्रांची आणि मैत्रिणींची मतं आपल्याला किती इम्पॅक्ट करतात याचा अनुभव मी शिवानी आणि अक्कीकडून व्यवस्थित घेतला होता. शिवाय मी स्ट्रॉंग आहे. पण अंकित आहे का हे पण महत्त्वाचं होतं.
त्यातून शिवानी गेलेली मी अजून त्याला सांगितलं नव्हतं त्याचा पण थोडा गिल्ट होता. पण एक्साईटमेंट होतीच.

असं म्हणतात ना की तुमचे मित्र कसे आहेत त्याच्यावरून तुमची पण ओळख होते. अंकितला ओळखायचा हा अजून एक चांगला मार्ग होता.

मग ठरल्याप्रमाणे शुक्रवारी आम्ही अलयच्या बर्थडे पार्टीला गेलो. हा अंकितचा आधीच्या डान्सिंग ग्रुप मधला मित्र. तोच ग्रूप होता. बरीच मुलंमुली होती. बरीच म्हणजे दहा-बारा तरी. डान्स करणारीच मुलं असल्यामुळे डान्सफ्लोर असलेली जागा निवडली होती. मी डान्समध्ये त्या सगळ्यांमध्ये एकदम ज्युनियर होते.

त्यातून क्लासमध्ये आम्ही अधून मधून एकत्र डान्स करायचो पण तिथं आमचं सिक्रेट खरंच सिक्रेट होतं. इथे मात्र अलयला तर माहिती होतंच की . आणि बाकीही काही लोकांना नक्कि माहीत असणार होतं. कदाचित सगळ्यांनाच. आता हे काही मी अंकितला विचारलं नाही. जरा बावळटच वाटलं असतं ते. जो होगा देखा जायेगा.

ऑफिसातून वेळेवर येऊन तयार झाले.
एकदम सिंपल लाइट ग्रीन रंगाचा लेसी टॉप आणि डेनिम , सिंगल पिंक पर्ल चे ड्रॉप. गळ्यात पण एक तसाच मोठा सिंगल पर्ल. हातात दोन पर्ल्स असलेलं ब्रेसलेट आणि अगदी लाईट मेकप. सोनेरी गुलाबी रंगाची छोटिशी स्लिंग आणि त्याच रंगाचे हील्स. हे हील्स मी वीकेंडला ऑफिस मैत्रीणीबरोबर मॉलमधे जाऊन आणले होते.

अंकित मला न्यायला आला होता. मी लिफ्ट मधून बाहेर आले आणि त्याला बघून जे काय झालं ते झालं.
पांढरा लिनन शर्ट, फोल्ड केलेल्या बाह्या, डार्क खाकी ट्राउजर्स. जेल्ड हेयर, हातावर टाकलेलं ब्राऊन स्लीवलेस जॅकेट आणि पोनी नाही.. मॅन बन. नोप. उफ्फ! हा अख्खी संध्याकाळ असा दिसणार होता? मी नाही जात याच्याबरोबर.
आणि वर तो मी लिफ्ट मधून बाहेर आल्याबरोबर तो मी त्याच्यापर्यंत पोचेपर्यंत माझ्याकडे एकटक पहात होता.

मी जवळ पोचले आणि तो म्हणाला, " धिस इजंट फेयर. यु नो? इतना इनोसंट, इतना प्यारा दिखना मना है अभीसे. "
आधीच माझी हालत वाईट त्यात हे ऐकल्यावर मी आपोआप खाली पाहिलं.
"एक बात बताऊं?"
" हम्"
"हमारे यहांके लडके सच कहते है, तुम मराठी लडकिया सचमे बहोत क्लासी दिखती हो. "
ऑलमोस्ट इश्श म्हणणार होते. श्या! मॉडर्न लाईफ ने हा शब्द उगच गायब केलाय. गालांनी ते काम केलं असावं.
मी मागं बसत असताना अंकित हळु आवाजात म्हणाला , " आज बहोत मुश्किल होनेवाली है"

आम्ही तिथे पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यांनी आम्हाला ग्रीट केलं. मुलांनी अंकितकडं मिनिंगफुल नजरा टाकल्या. मुलींनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून घेतलं.
पण थोड्या वेळात सगळं सेट झालं. मी कम्फर्टेबल झाले. कारण अभ्यास आणि काम या दोन्ही गोष्टींचा कॉमन थ्रेड नव्हताच गप्पात. अतिशय विविध रँडम विषयांवर आम्ही गप्पा मारल्या.

अंकितचं लक्ष मी बोर होते का, मी कम्फर्टेबल आहे का याकडे होतं. विचारत पण होता मला अधून मधून. नंतर नंतर त्याने माझ्याकडे मान वळवली की पब्लिक, " हां हां, ठीक है वो, हम नही सता रहे उसे " म्हणायचं.
त्यावर तो हसायचा. कत्ल के बहोत से तरीके थे और जनाब उनमेसे सब जानते थे..

बर्थडे बॉय अलय एकदम हँडसम होता अर्थात आत्ता या क्षणाला अंकित इतका कुठलाच मुलगा मला छान वाटत नव्हता. अलय अंकितचा जवळचा मित्र. वॅलेंटाईन ला कुछ अलग करने की आयडिया याचीच.

काही वेळानं सगळे डान्स करायला उठले. आणि त्यांनी फ्लोरला ऑलमोस्ट आग लावली. विजा सळसळाव्यात असा डान्स करत होते सगळे. मला तर एकदम याला बघू का तिला बघू असं झालं. सगळा ग्रुप एकत्रच डान्स करत होता . मध्येच दोन ग्रुप व्हायचे आणि परत एकत्र व्हायचे.
मध्येच बर्थडे बॉय अलय आणि अजून एक मित्र अंकितला म्हणाले की एक कपल डान्स व्हायलाच हवा.

आता मात्र परीक्षा होती. मी म्हटलं होतं ना क्लासमध्ये जरी डान्स झाला असला तरी तिथं आम्ही फक्त क्लासमधले दोन स्टुडंट्स होतो.
इथं म्हणजे त्याचे मित्र आम्हाला प्रोस्पेक्टिव्ह कपल म्हणूनच बघत होते.
मी इतकी टेन्स झाले. पण अंकितने माझा हात पकडला. आणि त्याच्या डोळ्यात पाहताच एकदम रिलॅक्स झाले मी. फक्त पापण्यांची एक हालचाल 'मी आहे ना" म्हणणारी. आणि सगळा भोवताल विसरून त्याच्या तालात मर्ज झाले मी.

या लोकांनी ठरवून बॉलीवूड नाईटसाठी प्लॅन केला होता. गाणं वाजायची वाट आम्ही सोडून सगळे बघत होते पण अख्खं मिनिट पूर्ण शांतता होती. मी पण गाणं का वाजत नाहीय याचा विचार करत होते. ड्रेस कोड असावा असं बहुतेकांनी केलेलं ब्लॅक नेव्हीब्लू किंवा डार्क ब्राऊन ड्रेसिंग. त्यात मी एकटीच लाईट ग्रीन कलरचा टॉप घातलेली होते.

त्यांच्या ग्रुप मधले सगळे पट्टीचे डान्सर्स आमच्या भोवती उभे होते. अगदी तयारीत .
आम्ही दोघेही डीजे कडे बघायला लागलो. तर अलय तिथेच उभा होता. त्या शांततेच त्याचा हळू पण स्पष्ट आवाज आला. "द स्टेज इज यूअर्स गाईज. " आणि हळूहळू काहीतरी गुंगी चढावी तसं गाणं वाजू लागलं, कहते हे खुदा ने इस जहां मे सभी के लिये..

त्या बीट्सवर अंकितने मला हळुवार लीड करायला सुरू केलं. बचाता आमच्या क्लासमध्ये आत्ताच थोडं बेसिक सुरू झालं होतं. पण बाकी सगळे प्रो होते. अंकित मला सोपं जाईल अशा स्टेप्स घेत होता.
त्याच्या पॉईज कडे बघू की माझ्या स्टेप्स नीट होत आहेत याकडे लक्ष देऊ? असं सुरुवातीला झालं खरं. पण मी नंतर एकदम फ्लोई झाले.

हळुवार पण अतिशय उत्तम मीटर मधलं ते गाणं चढत गेलं, शब्द भिनत गेले.

"तू हम सफर है फिर क्या फिकर है "
म्हणत असताना अंकितने एका क्षणात हातावर मला अलगद तोललं आणि दुसऱ्या क्षणात त्याच्यापासून दूर केलं.
थोडंसं दूर पण समोरासमोर त्या अर्धक्षणात .. त्याचवेळी त्याचे अर्जवी डोळे पुढच्या ओळीबरोबर लिप सिंक करून म्हणत होते

"जीने की वजह ही यही मरना इसीके लिये.. "

हळुवारपणे एकावर एक मजले बांधत पत्त्यांचा बंगला उभा राहावा तसा शेवटच्या गिरकीने डान्स संपला. आमच्या आसपास फेर धरणारे त्याचे मित्र टाळ्या वाजवत जवळ आले. "यु गाईज रॉकड इट टुडे.. वॉट केमिस्ट्री! "
आणि मग हळूच थोडे पांगले आसपास.
काही क्षण त्या आसमंतात फक्त मी, अंकित आणि रात्रीच्या आकाशात गावाबाहेरच्या डोंगरावरून तार्‍यांचा, नक्षत्रांचा, तारकामंडलांचा खच दिसावा तसं त्या नाचातल्या असंख्य क्षणार्धांचं एकमेकांशी जोडलं गेलेलं चमकतं जाळं इतकेच होतो.

काही वेळाने अलय माझ्याशी बोलायला आला. "कशी आहेस रसा? खरंच बोर नाही ना झालीस? अपार्ट फ्रॉम द डान्स.. " त्याने अंकित कडे पाहिलं.
मी नाही म्हटलं. आणि पुढे म्हटलं "नाव खूप छान आहे तुझं."
"खरंच? सांग बरं काय अर्थ आहे माझ्या नावाचा?" तो म्हणाला.
बाजूची मैत्रीण , " अरे ये सबको पूछता है लेकीन किसिको नही आता" म्हणाली.
अलय हसला.
मी म्हटलं, जो संपत नाही तो. चिरंतन.
तो आश्चर्यचकित होत हसला. "Really? Someone I met, knows this for the first time. Wow.. "
"अंकित, लकी यु " अलय त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
अंकितचा चेहरा एकदम आक्रसला. एकच क्षण. मग पुन्हा हसरा झाला.
" चला मी तुमचा फार वेळ घेत नाही. एंजॉय गाईज. " म्हणत अलय थोडासा बाजूला सरकला.
मग यथावकाश जेवणं झाली. हे अकरा नंतर कधीतरी जेवणं मला मनापासून आवडत नाही. पण काय करणार? जास्त भूक पण नव्हती.
अजूनही आम्ही त्या डेझमधेच होतो. निरोपाची बोलणी चालू होती.
इतक्यात माझा फोन वाजला. शिवानीचा फोन. तिला महिती होतं आज मी पार्टीला जाणार आहे. मी पोचले असेन अशा अंदाजाने तिने फोन केला होता.
मी स्व तःला एक्स्क्युज करत बाहेर आले. शिवानीला पटकन सांगितलं की अजून निघतोय इथून. घरी गेले की फोन करते.
इतक्यात अंकित आलाच. किती आनंदी दिसत होता तो!
" ऑफिसका फोन था? "
" नाही. शिवानीचा. सांगितलं तिला थोड्या वेळात पोचते म्हणून." योग्य वेळी सावरून इतकंच बोलले.
" ठीक है चलो. सच मे लेट हुआ है ना तुम्हे"
मी बसत असताना कुणीही आजूबाजुला नसताना पण तो कुजबुजत म्हणाला , " आज का सब से मुश्किल काम. तुम्हे घर छोडना. "
" थोडा जल्दी निकलते तो एक लाँग राईड पे चल्ते पर अब लेट हुआ है. फिर किसी दिन"

- क्रमशः

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle