ऊन

ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

फोन आपल्याच मातोश्रींचा असतो जीच्याबरोबर सकाळी पेल्यातल्या वादळाची नांदी झालेली असते . ह्म्म्म असा मनाशीच बोलून फोन उचलला जातो . पलीकडून प्रेमळ आवाज येतो . पेल्यातल वादळ अजूनही आपल्या डोक्यात असतंच . त्यामुळेच पलीकडच्या आवाजात एक आर्जवयुक्त सावधानता असते . ( इतक्या वर्षात माता आपल्याला ओळखू लागलेली असतेच . शेवटी तिचीच नाळ वगैरे ) आपल्या धुमसत्या बाळीने परत राख घालून घेऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीने बोललं जातं . त्या मूळच्या प्रेमळ आवाजामुळे आपल्याही चेहऱ्यावर हळूहळू दुधाची साय पसरत जाते . एकदम झाले मोकळे आकाश फिलिंग येतं . नकळत बर वाटायला लागत . हवं असलेलं विचारून फोन ठेवला जातो.
इथे मात्र आपल्या मनात श्रावणाच मोकळं , स्वच्छ , लख्ख ऊन पसरलेलं असत ...

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle