ट्रिपचे अनुभव

अथिरापल्लीचे अद्भुत

हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्‍याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( :इश्श: ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .

अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

भीमबेटका - एक गूढ अनुभव

काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!

मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

Subscribe to ट्रिपचे अनुभव
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle