नवजागर

नवजागर २०१७ - आई

‘आई’ ह्या दोन अक्षरी शब्दात केवढं तरी आपलं विश्व सामावलेलं असतं. आई हे एक अजब रसायन असतं. मुलींना लग्न झाल्यावर, व स्वतः आई झाल्यावर खर्‍या अर्थाने आईपण कळायला लागतं. 'थोर आई' म्हटलं की आपल्याला आठवते जिजाबाई शिवाजीसारख्या महापुरूषाला घडवणारी! त्याच काळातील सामान्य अशी हिरकणीसुध्दा असामान्य असं दिव्य करून जाते ते आईपणाच्या बळावर. सामान्यातल्या अश्या कितीतरी असामान्य आया असतील, त्यांच्या बाबतीत आपल्याला ‘नाही चिरा, नाही पणती’ असं म्हणावं लागेल. माझ्या आईच्या निमित्ताने अश्या समस्त अनामिक आयांसाठी ही शब्दरूपी पणती उजळण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Keywords: 

उपक्रम: 

नवजागर २०१७ - मारायला दिली नाही माझी लेक तुला!

हा लेख मी यापूर्वी एका मराठी संस्थळावर लिहिला होता. त्यानंतर तो माझ्या ब्लॉगवर आणला. आणि आज इथे मैत्रीणवर प्रसिद्ध करत आहे.

<<<<<<

"आज आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला कायद्याची जाण आहे. म्हणून कुणी आपला फायद घेऊ शकत नाही. पण माझं हृदय अशा स्त्रियांसाठी तुटतं ज्या अशिक्षित आहेत. त्याना कायदा माहित नाही. नवर्याने, सासूने मारलं की रडायचं इतकंच माहिती आहे. अशा स्त्रियापर्यंत आपल्या संस्थेचं काम पोचलं पाहिजे. त्याना आपली मदत झाली पाहिजे..."

Keywords: 

उपक्रम: 

नवजागर २०१७ - मुलाखत : स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे

(मिसळपाव.कॉमवर पूर्वप्रकाशित मुलाखत नवरात्रीच्या निमित्ताने मैत्रीणवर आणते आहे.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!

Keywords: 

उपक्रम: 

नवजागर २०१७ : काकूस पत्र

प्रिय काकूस,

अनेक अनेक नमस्कार. पत्र लिहीण्यास कारण की आज तुझा ८१वा वाढदिवस आणि आज आम्ही तो सर्व जवळची मंडळी साजरा करणार आहोत. तुझ्या वाढदिवसाची चर्चा नुसतीच तुझ्या घरी नाही, तर आमच्या घरीही सुरू होती. काय करायचं?, तुम्हा लोकांचे काय प्लान आहेत? वगैरे वगैरे...

मग अचानक गेल्या आठवड्यात विद्यावहिनीचा फोन आला ठरलं, की आज ‘तुझा’ वाढदिवस साजरा करायचा. विचार करता करता लक्षात आलं की ८१ वर्षे, बापरे! किती हे मोठं वय... मी तुला किंवा तू मला माझ्या जन्मापासून ओळखत आहोत, पण तरीही तुझा उत्साह बघितला की मला अजूनही खरं वाटत नाही की तुझं वय ८१ वर्षे आहे.

Keywords: 

Subscribe to नवजागर
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle