चित्रकला व रंगकाम

बाप्पा डूडल

||श्री गणेशाय नम:||

नमस्कार.

हौशी चित्रकला सुरु असते अधूनमधून. बस-ट्रेन प्रवास, कंटाळवाण्या मीटिन्ग्ज, फोन कॉल्स दरम्यान बरेचदा काहीतरी खरडलं जातं, ते कधीतरी बरं जमलेलं असतं. ते कागद, रायटिन्ग पॅड्स जपून ठेवते मग. हल्ली फोनवर पटकन फोटो काढता येतो ते बरंय. हे अशासाठी की ते बरं जमलेलं कधीतरी कुठेतरी पुन्हा वापरता येईल म्हणून.

मी अशी बरी जमलेली इथे देत जाईन. आवडतील अशी आशा. तुम्हाला पुढे ती भरतकाम, विणकाम, फॅब्रिक पेन्टिन्ग, इतर हस्तकला इ. साठी वापरायची असतील तर अवश्य वापरा.

सुरुवात म्हणून हे बाप्पा डूडल पोस्ट करत आहे.

कथाकली पेंटींग

मी हे पहिल्यांदाच ट्राय केलेय.

११ बाय १४ इंच कॅन्व्हास वर अ‍ॅक्रेलिक् पेन्टींग

painting.jpg

ह्या चित्रात नायक नायिके सोबत मागे खलनायक आहे.

त्यांच्या विशिष्ठ वेषभूषेबद्दल आणि कथाकली बद्दल थोडेसे लिहितेय...

काही स्केचेस व पेंटींग्ज

मी ना खूप बाबतीत अर्धवटराव आहे. मला लिहायला, चित्र काढायला, रंगवायला, मेहेंदी काढायला, फोटो काढायला, गायला, नाचायला नुसतं आवडतं. पण काहीच, कुठलीच गोष्ट अगदी भन्नाट जमत नाही. सगळं नुसतं जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन. ही मी काढलेली चित्रं/स्केचेस्/पेंटींग्ज..

मायबोलीवरील एका चित्रकाराने हॉटेल वैशालीचे अतिशय अप्रतिम पेन स्केच काढले होते. ते पाहून मी फार स्फुरीत होऊन वगैरे कॉपी करायचा प्रयत्न केला होता! कॉपीच आहे, पण फार आवडती कॉपी आहे माझी.. :) माझ्या इथल्या स्वयपाकघरात मी लावून ठेवली आहे ही फ्रेम. :)

पाने

Subscribe to चित्रकला व रंगकाम