मॅगीच्या वर्कशॉपमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अॅनिमेशन शिकताना सुरुवातीला 15 दिवस चित्रकला शिकवली गेली. मला टेक्निकली चित्रकलेचे शिक्षण नव्हते. सो ते 15 दिवस खूप शिकायला मिळाले. त्या वेळी काढलेली ही स्केचेस.
शिकाऊ पातळीवरचीच आहेत, फार काही छान नाहीत. पण शेअर करावी वाटली या निमित्ताने. गोड मानून घ्या
बर्याच मैत्रीणींना माहीत असेलच तरीपण परत एकदा सांगते.
मध्यंतरी आं.जा वरील एका पोस्टने आमचे डोके सटकले. तर ते सटकलेले डोके ताळ्यावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न...
Julio Cesar नावाच्या ब्राझिलियन आर्टिस्टची चित्र पाहण्यात आली, कुठलाही फोटो बघून त्या माणसाचं व्यंगचित्र काढण्यात त्याची हातोटी आहे आणि ती चित्र फोटोपेक्षा अफाट सुंदर आहेत.
त्यातलंच हे एक चित्र माझ्या डोक्यात घर करून राहिलं आणि शेवटी उतरवलंच कागदावर..