चित्रकला व रंगकाम

माझे रंगकाम

मैत्रीणवरच जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले( थँक्स लोला!), तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते! हे ते पहिले चित्र.

color3.jpg

Keywords: 

कलाकृती: 

वॉटरकलर आणि काही क्राफ्ट सुद्धा

bookmark.jpg
लहानपणापासून वॉटरकलर खूप आवडायचे. एलिमेंटरी आणि इंटर्मीजिएट च्या सरावामुळे तर वेडच लागले लँडस्केप चे.. मग कॉलेज, मित्रमैत्रिणी, ऑफीस, नवरा या सगळ्या पसार्यातून अज्जिबात वेळ मिळाला नाही.. पण जमेल तसा वेळ स्वत:ला देऊन केलेल हे काम!! बर्याच्श्या कॉपीज आहेत (मिलिंद मुळीकांच्या वॉटरकलर मधून.. वॉटरकलर चा देव माणूस Praying )
आणि काही क्राफ्ट सुद्धा.
पहिलीच पोस्ट आहे.. शुद्धलेखनास दिवे घ्या :confused:

Keywords: 

कलाकृती: 

नर्तिका आणि गिचमिड

ही नर्तिका. फ्रेम केल्यावर फोटो काढलाय त्यामुळे डाव्या बाजूला काच चमकली आहे.
dancer.jpg

पानभर असलेल्या गिचमिडीतून काही तुकडे बाजूला काढून एअत्र करुन फोटो काढले.

coll.jpg

coll2.png

हे एका आख्ख्या पानाचे सँपल!

p1.jpg

कलाकृती: 

किंचित चित्र

मी काही चित्रकला शिकले नाही. पण आवड फार. त्यातून कागदावर पेन्सिल,रंगीत पेन्सिलीने चितारलेली ही काही चित्र

कलाकृती: 

माय आर्ट इज डूडलिंग… काही नवीन डूडल्स

बुकमार्क्स २ :

-----------------------------------------
मैत्रीण : ही वेबसाईट सुरु होत असताना काढलेलं हे डूडल. प्लूनी आजारी होते आणि डोक्यात 'मैत्रीण' चे विचार होते...

कलाकृती: 

अ‍ॅन्ग्री बर्ड आणि इतर

हा बघून काढलाय. मूळ पक्ष्यात नजर थोडी खाली होती, काढताना तो समोर बघतोय रागीटपणे असं झालंय.

angry.jpg

हा हॅपी डूडल-

happy.jpg

फारच जास्त वेळ मिळाला होता कधीतरी रन्गवायला....

HD2.jpg

कलाकृती: 

अडीच सफरचंदं आणि एकच(+१) प्याला! (रंगीत अ‍ॅड केलाय)

ही दोन पेन्सिल स्केचेस म्हणजे "चित्रं काढायचं" म्हणून नीट वेळ काढून बसून काढलेली आहेत. पेन्सिल आवडतं माध्यम आहे पण रंगीत पेन्सिलीने जास्त काही केलेलं नाही. ही सफरचंदं पहिलीच!

apples2.jpg

wcup.jpg

ड्रोगॉन.. Blushing
drogon.jpg

पेय रंगीत-

कलाकृती: 

बाप्पा डूडल

||श्री गणेशाय नम:||

नमस्कार.

हौशी चित्रकला सुरु असते अधूनमधून. बस-ट्रेन प्रवास, कंटाळवाण्या मीटिन्ग्ज, फोन कॉल्स दरम्यान बरेचदा काहीतरी खरडलं जातं, ते कधीतरी बरं जमलेलं असतं. ते कागद, रायटिन्ग पॅड्स जपून ठेवते मग. हल्ली फोनवर पटकन फोटो काढता येतो ते बरंय. हे अशासाठी की ते बरं जमलेलं कधीतरी कुठेतरी पुन्हा वापरता येईल म्हणून.

मी अशी बरी जमलेली इथे देत जाईन. आवडतील अशी आशा. तुम्हाला पुढे ती भरतकाम, विणकाम, फॅब्रिक पेन्टिन्ग, इतर हस्तकला इ. साठी वापरायची असतील तर अवश्य वापरा.

सुरुवात म्हणून हे बाप्पा डूडल पोस्ट करत आहे.

कथाकली पेंटींग

मी हे पहिल्यांदाच ट्राय केलेय.

११ बाय १४ इंच कॅन्व्हास वर अ‍ॅक्रेलिक् पेन्टींग

painting.jpg

ह्या चित्रात नायक नायिके सोबत मागे खलनायक आहे.

त्यांच्या विशिष्ठ वेषभूषेबद्दल आणि कथाकली बद्दल थोडेसे लिहितेय...

काही स्केचेस व पेंटींग्ज

मी ना खूप बाबतीत अर्धवटराव आहे. मला लिहायला, चित्र काढायला, रंगवायला, मेहेंदी काढायला, फोटो काढायला, गायला, नाचायला नुसतं आवडतं. पण काहीच, कुठलीच गोष्ट अगदी भन्नाट जमत नाही. सगळं नुसतं जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन. ही मी काढलेली चित्रं/स्केचेस्/पेंटींग्ज..

मायबोलीवरील एका चित्रकाराने हॉटेल वैशालीचे अतिशय अप्रतिम पेन स्केच काढले होते. ते पाहून मी फार स्फुरीत होऊन वगैरे कॉपी करायचा प्रयत्न केला होता! कॉपीच आहे, पण फार आवडती कॉपी आहे माझी.. :) माझ्या इथल्या स्वयपाकघरात मी लावून ठेवली आहे ही फ्रेम. :)

पाने

Subscribe to चित्रकला व रंगकाम
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle