इतर

हळद्या

आमच्या घराबाहेरच्या हिरव्या परिसरात अनेक पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात.त्या सगळ्यात एक लक्षवेधी पक्षी येतो जो आला की घरातल्या व्यक्तींना/बच्चे कंपनीला हाका मारून तो दाखवण्यासाठी जमवले जायचे. माझी कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी धडपड चालू असायची. पिवळा धम्मक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हा हळद्या याचे क्वचित होणारे आगमन आमच्यासाठी एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे असायचे. सुरुवातीला हा हळद्या फोटो काढायला जाम भाव खायचा.

कलाकृती: 

बाप्पा मोरया!!

Whatsapp वर video बघून मुलांनी एक ध्यानमुद्रेतला गणपती केला. त्याचा आकार योगायोगाने, घरी असलेल्या टीलाइट स्टॕड साठी एवढा मस्त बसला कि तसे अजुन वेगवेगळ्या मुद्रेतले 4 गणपती करायचे ठरले.
एक पुस्तक वाचणारा, एक पेटी वाजवणारा, एक तबला वाजवाणारा आणि एक वज्रासनातला असे एकुण ५ बाप्पा केले व त्यांनीच रंगवले.
अशा तर्हेने गणेशोत्सवाची आणि उन्हाळी सुट्टीची सांगता झाली..

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

घरगुती प्ले डो/ क्ले

लागणारे जिन्नसः

मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.

कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण जरा पातळ वाटू शकते. अज्जाबात घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.

Keywords: 

कलाकृती: 

पाणथळीचे पक्षी

मागील आठवड्यात उरण पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.

काही पक्षांची नावे माहीत नाहीत ती जाणकार देतीलच.

१) चित्रबलाक - Painted Stork

Photo:

कलाकृती: 

इंडिआना जोन्स आणि खजिन्याचा शोध

मागच्या वर्षीची माईन क्राफ्ट ट्रेझर हंट पार्टी मुलाच्या मित्रांमधे चांगलीच हिट झाली आणि तो पार्टी फीवर उतरत नाही तोवर मुलाची पुढची डिमांड आली, मला पुढच्या वर्षी ईंडिआना जोन्स पार्टी हवी आहे आणि पुन्हा ट्रेझर हंट हवे आहे.

मुलाची डिमांड ऐकून आधी Vaitag झाले पण कुतुहल म्हणून गूगल केले तर खूप आयडिया मिळाल्या, आणि मग मी तो चॅलेंज स्विकारला :talya: . बजेट मधे ईंडिआना जोन्स थीम पार्टी करण्याचा.

या वेळी इन्वीटेशन ईमेल न करता हँड डिलीवर केले
IMG_0930.JPG

Keywords: 

कलाकृती: 

माझ्या आनंदाचं कारण

आज मला खुप मस्त वाटतंय... कारण???
हो हो कारण आहेच तर....
मागे मी काही दागिने बनवलेले... त्यातील बरेचसे मैत्रिण वरील मैत्रिणींनी विकत ही घेतले. बनवलेल्यांपैकी ४ सेट्स महाग होते अर्थात quality एकदम बेस्ट. पण घरातुन, " ह्या खोटे दागिने २-२००० ला कोण घेणार.. तुच घाल आता ते " असा आहेर जाऊबाईंकडुन मिळालेला. नाही म्हटलं तरी मनाला लागलेलंच
पण परवाच एक मैत्रिणीने माझे ३ सेट्स एक हाती घेतले. माझा आनंद गगनात, मनात आणि बाकी कुठ्ठे ही मावत नाहीये. म्हणुन ईकडे ही शेयर करतेय.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

दागिने - स्वनिर्मित - मिनू

नवरात्र चालू आहे आणि लवकरच दिवाळी सुद्धा येईल. खरेदी चालू झाली असेल ना? साड्यांवर मॅचिंग दागिने नकोत का मग? बघा बरं आवडताहेत का? कोणाला हवे असतील तर सांगा. वेगळे कलर सुद्धा मिळतील. आत्ता जे तयार आहेत ते इथे अपलोड केलेत. जसजसे बनवेन तसे इथे अपडेट करेन.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

लाराने केलेले DIY - inspiration board

रायगडनं तिच्या भाच्यांना विचारलं की अमेरिकेहून काय पाठवू? झालं! लारादेवींनी एक मोठ्ठी लिस्ट करून तिला पाठवली. लिस्ट म्हणजे केवळ क्राफ्टच्या सामानाची. भेट मिळाल्यावर जाम खुष झाली ती कारण ती केव्हाचा शोधत असलेला रोज गोल्ड स्प्रे होता.

तोच स्प्रे वापरून तिनं हा नेहमीचा रायटिंग बोर्ड एका इन्स्पिरेशन बोर्डमधे रुपांतरीत करून तिच्या अभ्यासाच्या खोलीत लटकवला आहे. एका साध्या पॅडला रोझ गोल्ड रंगाच्या स्प्रेनं स्प्रे पेंटिंग करून घेतलं.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

Subscribe to इतर
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle