palebhaji

चाकवत गरगटं

माझ्या आईची चाकवत गरगट्याची रेसिपी अशी:
चांगला ताजा बघून चाकवत आणणे. जाड, मोठ्या पानांचा आणलेला तिला आवडत नाही. मध्यम, मध्ये दाबली तर कटकन मोडणारी पाने असलेला असला तर मस्त.
निवडून घेतलेला चाकवत, अख्खे शेंगदाणे, थोडीशीच डाळ(हे पुलंच्या भाषेत वाचायचं झालं तर कोंबडीत मसाला कसा हवा, शराबी डोळ्यात सुरमा असावा तसा. म्हणजे भाजी चाकवताचीच वाटायला हवी, डाळीची किंवा शेंगदाण्याची नको) :)
आणि चवीला मीठ असं सगळं ती सरळ कुकरला लावून घेते. चाकवत लगेच शिजतो, जास्त शिट्ट्याची गरज नाही. मग रवीने ताक करतो तसा घोटून बारीक करायचा तो.

पाककृती प्रकार: 

Subscribe to palebhaji
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle