सप्टेंबर २०१५ - श्रीगणेश

मधुबनी गणपती

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : ३०० GSM चा आहे.

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.

या स्टेप्स :

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सॄजनाच्या वाटा - श्रीगणेश

श्री गणेशाचे काढून दिलेले चित्र रन्गवले आणि स्वतः काही काढावेसे वाटू लागले.

मी स्वतःहून काढलेले पहिले-वहिले चित्र. यामागची प्रेरणा आहे 'गणराज रन्गी रन्गतो हा मैत्रीणवरचा उपक्रम.

साध्या पेन्सिलीने काढले व फॅबर कॅसल क्रेयॉन्सने रन्गवले.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पॉलिमर क्लेचं गणपती पेंडंट

लेकीनं - लारानं - बनवलेलं हे पॉलिमर क्लेचं गणपती पेंडंट. सध्या नुसतंच आहे. हेडपिन लावून मग बेक केलं की पेंडंट म्हणून वापरता येईल.

इंटरनेटवरच्या कोणत्याश्या गणपतीच्या फोटोवरून लारानं हे बनवलं आहे. केशरी रंगाची पॉलिमर क्ले लाटून त्यातून गणपतीच्या कोलाजचे तुकडे एका टूलनं कापून घेतले आणि दुसर्‍या चौकोनी पॉलिमर क्लेच्या तुकड्यावर चिकटवले आहेत.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

माझे गणपती बाप्पा! आणि अरिनचे लेगो मखर

आमचं माफक सृजन!

हे माझे गणपती बाप्पा - मागे कधीतरी काढलेले. बाकी काही चित्र-बित्र काढायची मी हिंमत करत नाही. पण गणपती बाप्पा उदार मनाने सर्व माफ करतील म्हणून हिंमत केली. :rollingeyes:

Ganapati bappa_0.jpg

हे २ वर्षापूर्वी मुलाने (त्यावेळी ६ वर्षे) गणपतीकरिता बनवलेले लेगो मंदिर मखर
makhar.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to सप्टेंबर २०१५ - श्रीगणेश
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle