March 2016

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- लाल देठांची कोशिंबीर

कोणत्याही भाजी/पालेभाजीचे देठ. जे आपण खातो. लाल हवेत म्हणजे यात माठ-पोकळा, आपला रेड चार्ड आला. तर ही चार्डाच्या देठांची कोशिंबीर. अगदी सोपी.

साहित्य-
चार्डचे देठ- चिरुन वाटीभर
भाजलेल्या तिळाचं कूट- १ चमचा
तिखट
मीठ
साखर
दही
फोडणी- तेल, हिंग, मोहरी, जिरे.

कृती-
चार्डचे देठ चिरुन मग वाफवू शकता किंवा वाफवून मग मॅश करु शकता. झाकण ठेवून फार शिजवले तर रंग बदलेल! अगदी लगदा होऊ देऊ नये. मायक्रोवेव्हमध्ये केले तरी चालेल. मग त्यात तिळाचं कूट, चवीला तिखट, मीठ, साखर घालून कालवावे मग दही घालून मिसळावे.
वरुन हिंग-मोहरी-जिर्‍याची फोडणी द्यावी.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

१) Autism.. स्वमग्नता..

तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात  व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून  हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या  मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

Keywords: 

आरोग्य: 

न सुटलेले कोडे

(दोन जुने लेख- खरं तर अनुभव आहेत, पण इथल्या मैत्रिणींनाही आवडतील म्हणून टाकतेय. एक आज, एक नंतर)

सकाळी उठले तीच एका मंजुळ आवाजाने. तसा नेहमी येत असे, पण आज जरा जास्तच जवळून
अन खणखणीत. वृटिव्हSS, वृटिव्हSS, वृटिव्हSS
अन बाहेर हॉलमध्ये आले तर चक्क
टेरेसच्या बांधावर दोन बुलबुल साद घालत बसले होते. आधी टेरेसवरच्या बागेत सगळ्या
झाडांची पाहणी त्यांनी केली.
IMG_4301.jpg

लेख: 

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- आठवडा ३

ब- लई भारी लई भारी! Dancing
मु.- काय आता? नेमेचि येतो मग शुक्रवार. यावेळी काय?
ब- अरे आता मज्जा एकदम, बघ काय लिवलंय!-

"दोन आठवडे छान रंगीत हेल्दी पदार्थ बनवलेत ना? कंटाळा आला का? तर आता जर बदल करु. रंगीत नको! यावेळी वापरायच्या आहेत पांढर्‍या भाज्या किंवा फळे! आतून-बाहेरुन कश्याही असोत, वापरायचा भाग पांढरा हवा. करायचं काय? तर वडे, पकोडे, वड्या, भजी, कबाब, कटलेट, पॅटीज, कोफ्ते!!"

मु- अरे वा! शेवटी नेहमीच्या वाटेवर गेले म्हणायचे! 'हेल्दी खाऊया' वगैरे चाललं होतं, त्याचं काय झालं?

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle