March 2016

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- पालक चिकू स्मूदी

आयुष्यात पहिल्यांदाच रेस्पी वगेरे लिहितीय.. फार बोअर झालात तर आवरा म्ह्णा हवं तर!!!

साहित्यः

१) पालक : ४-५ पाने (मोठी)
२) चिकू : ३ लहान साईझ चे
३) खवलेले खोबरे : १ वाटी
४) नारळ पाणी
५) दालचिनी
६) वेलची
७) साखर : २-३ चमचे

IMG_20160320_204502314.jpg

कृती:

तर , देवाचे नाव घ्या अन सुरु करा

१) पालकाची पाने चिरुन घ्या
२) चिकु चा गर काढा
३) पालक + चिकू मिक्सर ला फिरवा
४) त्यात खोबरं , नारळ पाणी , दालचिनी ,वेलची सगल अ‍ॅड करा

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

काही म्युरल्स

 हे काही म्युरल्सचे प्रयत्न!


एका गाणाऱ्या जेष्ठ मैत्रीण कम मावशीसाठी. थर्माकोल वरती टॉईनचा दोरा, साधा दोरा, मणी, रंग वापरून.

कलाकृती: 

स्किल वापरून बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी : www.skillproducts.com

मैत्रीणींनो आज एक छानशी बातमी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. गेले दोन वर्षं जी संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती तिला आता मूर्त स्वरूप आलं आहे.

मी एक इ-कॉमर्सची वेबसाईट सुरू केली आहे : www.skillproducts.com

Keywords: 

कलाकृती: 

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- आठवडा २

मुळा: या! काय बातमी आणलीत?
बटाटा: नवा रंग, नवा खेळ!
मुळा: अरे देवा! काय पेयं, काय पिळून काढलं सगळ्यांना. बरं झालं आपण नव्हतो! बरं, मुद्द्याचं सांगा, फार बडबड नको.

--------------
बटाटा:
आठवडा -२
रंग - लाल, लाssलेलाल
पदार्थ - चटणी, लोणचे, कोशिंबीर!
नियम- तेच
मार्किन्ग सिस्टीम - तीच

मुळा: तेच आणि तीच नको, पुन्हा सांगा नीट!
-------------

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स - गाजर कोशिंबीर

आज मैत्रिण वर रनर्स क्लब वर लिहायला आले आणी हि घोषणा पाहिली...

मावशींना गाजराची कोशिंबीर करायला सांगितले होतेच त्यालाच थोडा ट्विस्ट दिला , तेवढाच मार्क नको जायला :winking: :ड

साहित्य

१.५ वाटी गाजराचा किस,
१.५ स्पु ओटस ची पावडर
मोहरी , लाल मिरची
दही , साखर मीठ

कृती
१. दही फेटून त्यात ओटस ची पावडर घातली , ते मिक्स करुन मग गाजराचा किस , मीठ साखर घालून परत मिक्स केले
तेल न घालता मोहरी आणी मिरची नुसतीच परतून घेतली आणी वरुन घातली ..

दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क

Keywords: 

ImageUpload: 

पृथ्वीचे पाणिग्रहण (अॅनिमेटेड व्हिडिओसह)

(एक जुनी कविता)

जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
तव लग्नाची खबर-बात ||१||

मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी ||२||

वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची ||३||

घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री ||४||

थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
पोचू लागल्या गावोगावी
तव लग्नाच्या अक्षत-राशी ||५||

मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष

कविता: 

रंग खेळू चला- ईट युअर कलर्स- टॉमॅटोची चटणी

ईट युअर कलर्स - रंग लाल

टॉमॅटोची चटणी

साहित्य

टॉमॅटो - ३
कांदा - अर्धा बारीक चिरुन
लसूण पाकळ्या - ५ ते ६
तेल - १ मोठा चमचा
फोडणीसाठी- हिंग, मोहरी, कढीपता( ४ ते ५ पाने),
लाल तिखट - २ चमचे
मीठ - चवीनुसार

कॄती - दोन टॉमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, कढीपत्याची फोडणी करावी. मग त्यात कांदा , लसूण पाकळ्या ठेचून परतावा. त्यानंतर टॉमॅटो घालून परतावे. टॉमॅटोला सुटलेले पाणी आटले की तिखट , मीठ घालून, ढवळावे व गॅस बंद करावा. थंड झाल्यावर ग्राईंडरमधून फिरवून घेणे.

ही पारंपारीक चटणी तयार आहे.

मी केलेले अ‍ॅडीशन

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

स्वरॉव्स्की क्रिस्टल आणि अँटिक कॉपरचे कानातले

मी काही वर्षांपूर्वी जरा दागदागिने करायला शिकले. मैत्रिणीकडे रहायला गेले होते मग थंडीच्या दिवसात दुपारी काहितरी उद्योग म्हणून शिकले. त्यानंतर एक छोटे प्रदर्षन्/सेल पण केले. प्रतिसाद बरा होता पण माझेच मन उडाले. उरलेले मटेरियल अजुन आहे. कधी कधी मैत्रिणींना भेट म्हणून करुन दिले तर तेवढेच राहिलेय आता काम. त्यातलाच हा एक पिस. मला अजुन तो पूर्ण वाटत नाही म्हणून वापरायला काढला नाही. ते रिकामे होल आहेत तिथे काय केले तर चांगले दिसेल ते कळत नाहिये. सुचवा तुम्हला काही वाटले तर. अजुन बरेच फोटो आहेत. बहुदा कुठेतरी फ्लिकरवर वगैरे. डाऊनलोड करुन टाकेन इथे.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle