May 2016

देवभूमी भेट

मैत्रिणिंनो, नुकताच मी देवाभूमीचा ट्रेक करून आले, त्याचा हा फ़ोटोरूपी वृत्तांत.
मला छान छान काही लिहिता येत नाही. त्या प्रयत्नांत फोटो पण टाकायचे राहून जातील या भीतीने मी हा मधला मार्ग घेतलाय. खरेतर प्रत्येक ट्रिप-ट्रेकनंतर मी ठरवते फोटो तरी टाकयचे, पण राहूनच जाते. यावेळी मात्र तुमचा आग्रह मानून मी मनावर घेतलंय.
लग्नानंतर ही आमची पहिलीच मोठी ट्रिप. मला हिमालयातच जायचे होते. आधी काश्मीरचा बेत ठरवला. पण नवरा म्हणाला, 'नुसते गाडीत बसून काय फिरायचे? तुला तुझा आवडता परिसर मला दाखवायचा होता ना? मग तिकडेच जाऊ या की.'

Keywords: 

देवभूमी २

आमचा पुढचा टप्पा होता ऊखीमठ. साधारण सात तासांचा प्रवास होता. सगळा रस्ता डोंगरातला असल्याने 'घाटातली वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ' असा प्रकार होता. सतत इतके तास बसमधे, तेही अशा रस्त्यावर जरा त्रासाचे, म्हणून आम्ही ब्रेक-जर्नी करायचे ठरवले. तसेही वाटेतली दोन ठिकाणे परत बघायची मला उत्सुकता होतीच. आणि नवर्‍याने 'तू ठरव काय ते' असे जाहीर केल्याने त्याची संमती होती.

Keywords: 

अजूनही चांदरात आहे..!

आज अचानक नवीनच काहीतरी जाणवलं. तुझ्या माझ्या अनेक क्षणांमधलं चंद्राचं लोभस अस्तित्व. खूप वेळ खोल विचार करत गेले तसं चंद्राचं प्रतिबिंब अधिकच ठळकपणे दिसू लागलं फक्त आपल्या दोघांच्या भावविश्वातलं. तसं पाहिलं तर या जगात आपण सतत आपापल्या व्यापातापांनी, माणसांनी वेढलेले. सतत एखाद्या भट्टीतली आग भगभगत रहावी तसा रोजचा व्यवहार, रोजची कामं, कर्तव्यं धगधगत असतात आणि तू, मी आणि आपल्यासारखे असंख्य तपस्वी ऋषीमुनी 'मां फलेषु कदाचन' (अर्थात हे जास्तच उदात्तीकरण झालं, पण 'करायचं म्हणून') वृत्तीने कर्माच्या समिधा त्या कर्तव्ययज्ञात अर्पण करत असतो.

Keywords: 

मनातले काहीतरी

प्रसंग - १

५ वीची शाळा नुकती सुरु झाली होती. नवीन शाळा, दर तासाला बदलणारे शिक्षक, एकटीने सुरु केलेला बसचा प्रवास सारेच अप्रुपाचे.
असाच एक प्रसंग - बसने शाळेतुन घरी येतानाची नेहमीचीच गर्दी. चुकुन बसायला जागा मिळाली. मधे एका स्टॉपवर पुढच्या दाराने एक आजी चढतात. शाळेत, घरी शिकवल्याप्रमाणे पटकन उठुन आजींना बसायला जागा दिली, पण आजींचा त्या जागेवर बसायला नकार. डोळ्यातल्या पाण्याला कसेबसे थोपवत प्रवास पूर्ण करुन घरी येइपर्यंत चेहरा नीट करायचा प्रयत्न सुफळ.

प्रसंग - २

Keywords: 

आधारगट: 

हुरहूर

बरसायची वाट पाहून
जिवाची काहिली व्हावी...
आणि येतो येतो म्हणत
त्याने नुसतीच हूल द्यावी!

आता नाहीच बरसणार
म्हणत मनाची तयारी करावी;
तेव्हाच नेमकं त्याला
बरसायची हुक्की यावी...

मन पुन्हा हळवं हळवं,
बेटं तयार त्याच्या भेटीला...
परत ऊन पावसाचा
खेळ त्याच्या वाटेला!

खर सांग, तू ढवळ्या
नि पाऊस पवळ्या आहे ना?

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - २

बेकरी प्रॉडक्ट्स सोबत माझा मजेदार खेळ सुरु असतो. ठरवलं तर बिस्कीटं, ब्रेड, खारी, केक, नानकटाई अशा चविष्ट गोष्टींपासून मी आरामात दूर राहू शकते पण एखाद्या बिस्किटाची किंवा केकची चव आवडली तर मात्र एखादा बाईट घेऊन सोडणं महाकठीण काम होतं. त्याचा पॅक संपल्या शिवाय चैन पडत नाही

Keywords: 

कलाकृती: 

वसंतोत्सव लई भारी

१९७४ मध्ये माझा चुलत भाऊ उच्च शिक्षणासाठी हॉलंडला गेला होता. परत आल्यावर त्याच्याकडून अ‍ॅमस्टर डॅम शहराचे वर्णन ऐकले होते. व त्याने बहिणी साठी आणलेल्या बारीक विंडमिलचे डिझाइन असलेल्या नाजून चेन मधील पेंडंट व कानातल्यावर एक नजर फार आसूसून टाकली होते. इथे एकदा जायलाच पाहिजे ते तेव्हा पासून मनात होते. ती सवड आत्ता मिळाली २०१६!!!!

Keywords: 

टाकाऊतून टिकाऊ : मेणबत्ती

चहाचा मग आतून जरा काळा दिसायला लागला म्हणून तो बाजूला पडला होता. पूर्णपणे पांढरा असल्याने बाहेरून रंगवून त्याचा पेनस्टँड वगैरे करावा म्हणून जपून ठेवला होता.

माझ्या कडे असलेल्या कँडलजार मधील सुगंधित मेणबत्ती पेटायला त्रास होत होता कारण वात छोटी आणि आजूबाजूला मेण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरं त्याचा सुगंध इतका मस्त आहे की ते मेण तसंच टाकून द्यायला जीवावर येत होतं.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle