May 2016

आर्किऑलॉजिस्टची दैनंदिनी: ओनामा

खरंतर ही लेखमालिका पूर्वप्रकाशित आहे. मायबोली आणि माहेरच्या दिवाळी अंकात मिळून लिहिलेल्या चार लेखांचे पाच भाग झाले. पण तरीही आज मीच खूप दिवसांनी एका रेफरन्ससाठी मी हे भाग चाळले म्हणून सहज इथेपण टाकावेसे वाटले. ज्यांनी तिकडे वाचले नसतील त्यांनी बघा इथे वाचून आवडताहेत का ते......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ओनामा

युकेतील भटकंती - प्रेक्षणीय स्थळांची नोंद, सल्ले, रहाण्याच्या जागा इ.

जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.

तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.

१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.

२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.

३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.

Keywords: 

पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - आईने केलेले काही नमुने

माझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.

ही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.

Keywords: 

कलाकृती: 

पोपट झाला रे ...

रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्‍या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.

अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)

माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.

Keywords: 

लेख: 

परंपरा वगैरे

२०११ सालच्या गणेशोत्सवात मायबोलीवर हा लेख लिहिला होता. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१४मध्ये मे महिन्यात हा लेख ब्लॉगवर टाकला. आज तोच लेख मैत्रिणींबरोबर शेअर करावासा वाटतोय. पाच वर्ष झाली, पण संदर्भांमध्ये विशेष काही फरक पडलेला नाहीये.

******************************************

http://asachkahibahi.blogspot.in/2014/05/blog-post.html

काल 'मदर्स डे' प्रीत्यर्थ फेसबुकावर चिक्कार आई-मुलींचे (मुलीच बरं का! कुठल्याच मुलाचा आईबरोबरचा फोटो माझ्या पाहण्यात आला नाही) फोटो पाहिले. सगळेच फोटो एकदम मस्त!

Keywords: 

लेख: 

आईने विणलेले रुमाल

आईने क्रोशाने विणलेले काही रंगीत दोऱ्यांचे रुमाल.
जोडी आहे प्रत्येकाची. आणि मग त्यांचा क्लोजअप.

IMG_20160516_084612.jpg

IMG_20160516_084618_0.jpg

IMG_20160516_084521.jpg

IMG_20160516_084525.jpg

Keywords: 

कलाकृती: 

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - १

शाळेत असताना कधीतरी 'टाकाऊ पासून टिकाऊ' सदरातली कृती वाचून वस्तू बनवायचं वेड लागलेलं. घरात येणारे विविध प्रकारचे पॅकेजिंगचे कागद, खोकी अशा विविध उपयोगी वस्तू गोळा करुन ठेवायच्या आणि कधी आकाशकंदील तर कधी तोरणं असं काही ना काही बनवलं जायचं. मागच्या वर्षी लेकीला तीची सगळी खेळणी आणि ती स्वतः बसू शकेल अशी टॉय कार हवी होती. :) एका मोठ्या खोक्यापासून तीला हवी तशी कार बनवली आणि त्यानंतर अपसायकलिंगच्या छंदाने पुन्हा डोकं वर काढलयं.त्यातल्या काही प्रयोगांचे हे फोटो. माझ्या या छंदाच्या नुतनीकरणास कारणीभूत ठरलेली टॉय कार पावसाने भिजून गेल्याने तीचा फोटो नाही पण त्यानंतरच्या प्रयोगांचे फोटो आहेत.

Keywords: 

कलाकृती: 

दागिने - स्वनिर्मित - वल्लरी

गेले पावणे दोन वर्षे मी हाताने बनवलेल्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय करते आहे. फेसबुकवर अवनि आर्ट नावाने माझे पेज आहे. https://www.facebook.com/avaniarts

मी बनवलेले काही ज्वेलरी पीसेस तुम्हाला पाहण्यासाठी इथे टाकत आहे.

Wire work experiments

1.

PhotoGrid_1504439398893.jpg

१. प्लास्टिक आणि ग्लास बीड्स

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle