September 2016

शिवणाचे सोपे उद्योग

इथं एकूण शिवणाबद्दल हल्ली बरंच बोललं जातंय. घरात मशीन असणं ही संधी, सोय आणि चैन सगळं आहे. दुरूस्त्यांपासून, रिसायकलिंग ते नवीन क्रिएटिव गोष्टी सगळं लिहीता यावं म्हणून हा धागा.
बऱ्यापैकी मोठं काम असेल. स्पेशल असेल किंवा इमोशनल व्याल्यू जास्त असेल तर नवा धागा काढा. जनरल छोट्या प्रोजेक्टसना प्रोजेक्ट करायला हा वापरू.
डिस्कस करू, चुका दुरूस्त करू, फिनेस कशी आणायची ते बोलू. टीपा देऊ.
जसं की आज मी 10 मिनीटात एका स्टोलचा स्कर्ट करून टाकला. त्या स्टोलचा वापर कमी आणि फॉल आवडेलसा नव्हता. पण रंग आणि प्रिंट आवडतं होतं. सो हा प्रयत्न.

Keywords: 

मोर हवा तर

मोर हवा तर..............

मोर हवा तर, स्वतःच मोर झालं पाहिजे ना!

सत्य, शिव, सुंदराला

करताना आवाहन

स्वतःच कणखर व्हावे;

असत्याला, असत्य म्हणण्याइतके

अ-शिवाला संपवुन टाकणे पेलण्याइतके;

असुंदराची भलावण पाहताना

त्यांचा सल बाळगण्याइतके;

आपल्यातल्या शिवाला
होवुदे प्रकट

मर्ढेकरांच्या मुरारीकडे

मागण्या अनंत,

पण खरचं,

भंगु दे काठिण्य माझे

आम्ल मनीचे जावु दे

विवेकाच्या जिवंत झर्‍यात

मालिन्य सारे वाहुन जा वु दे

Keywords: 

‘टाईमपास’ आणि ‘महर्षी ते गौरी’ ---

पहिल्याच भेटीत हा लेख इथे का द्यावासा वाटला? ह्यात उल्लेखलेली पुस्तके आता तशी जुनी झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. इथल्या बर्‍याचशा मैत्रीणींची ती वाचूनही झाली असतील. तसेच, सोशल साईट्सवर अनेक मैत्रिणी भेटल्या ज्या निव्वळ स्त्री म्हणून नाही तर माणूस म्हणून मोकळेपणे लिहितात, वावरतात. स्त्री असण्याचा अडसर मानत नाहीत. तरीपण, आज स्त्रियांचा वावर अनुभवताना प्रकर्षाने जाणवते की स्त्रीला मोकळे होण्यासाठी आवश्यक असणारे मानसिक स्वातंत्र्य ज्यांच्याकडून मिळाले त्यांच्याविषयी पुन्हा-पुन्हा वाचले गेले पाहिजे. आणि म्हणूनच हा लेख इथे देत आहे......

अश्रू--

अश्रू--

तू बोलत होतीस भडाभडा, मनातली सगळी भडास उतरवत होतीस
होता तो आरसा तुझ्या मनाचा
तुझ्या बोलण्यातून मला दिसणारा...
तुझे मन भयचकित कधी स्वत:च्या वागण्याने
तर कधी उद्विग्न इतरांच्या प्रतिसादाने
किती महत्त्व असते ना या साऱ्याला
मी बोलले - ते वागले
ते बोलले - मी वागले
मनभर पसरत राहतात
बोलण्या-वागण्याचे साद-पडसादही
निसटून पुढे जात असतो वेळ
आपले जगणेही....
किती जागा द्यायची अशा क्षणांना
आपल्या इवल्याशा मेंदूत अन देहकुडीत?
क्षण तर संपलेला अन आपण त्यात अडकलेले
कशासाठी?
इतकं का आपलं आयुष्य कवडीमोल आहे
की ते टाकायचं संपवून
अशा बेचैन करणाऱ्या निरर्थक क्षणांमध्ये?

आसाममधील वीरांगना: कनकलता

वयच काय होतं तिचं! खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं, असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय, व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय.

Keywords: 

लेख: 

स्पेंटिंग्ज- १

हां तर जायचं बरंच आधी ठरलं होतं हे तर माहिती आहेच तुम्हाला. राजेश हीरल बरोबर मी मागच्या वर्षी हिमाचल ट्रिप केलेली. आणि हीरलबरोबर गोवा वुमेन्स ड्राईवपण. त्यांच्या मुलीला स्पेनमधल्या एका युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशन मिळाली हा स्पेनचा ट्रिगर. तिला तिकडं सेटल करून पुढं अँडाल्युशियाची ट्रिप असा प्लॅन होता. आम्ही तिकिटं बुक केली मुंबई-मद्रिद रिटर्न. विजा वगैरे उरकलं. मग दोन भेटी, अनेक कॉल्स आणि असंख्य वॉटसॅप मेसेजेस मधून गावं आणि तारखा ठरल्या. अयरबीएनबी अपार्टमेंटस बुक झाले. मीनवाईल, इतर मित्रमैत्रिणींशी बोलून माझं हे ठरलं की बार्सेलोनाशिवाय स्पेन अपूर्ण आहे.

आसाममधील वीरांगना : सती जयमती

केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला ओ की ठो कळत नाही, पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक अखमीया स्त्रीच्या मनात जिच्याविषयी हे गाणं आहे तिच्याबद्दल - 'जयमती'बद्दल, अपार माया व श्रध्दा आहे. तेव्हापासून माझ्याही मनात कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक-दुकाने, वाचनालय शोधले, पण कुठे काही साहित्य मिळेना. मग गुवाहाटीला गेले असताना श्री.

Keywords: 

लेख: 

उत्खनन - गौरी देशपांडे

अलिकडेच उत्खनन पुन्हा एकदा वाचलं, तेव्हा जाणवलेल्या काही गोष्टी लिहिते. अजून कोणाला या पुस्तकाबद्दल काही प्रतिसादात लिहायचे असल्यास लिहा, मग आपण ते हेडरमध्ये अपडेट करू.

सुरुवात पुस्तकाच्या माहितीपासून करते.
उत्खनन - गौरी देशपांडे
किंमत- रु. ७०/-
११४ पाने, मौज प्रकाशन

आत्मचरित्रांत न सापडणार्‍या रिअल लाईफ-स्टोरीज.... सोशल डायरी - सई तांबे

फेसबुकवरील एका मैत्रीणीने विमान उतरताना मुंबई कशी निळी दिसते असा एक फोटो टाकला होता. ही निळाई होती टर्पोलिनच्या शीट्सने आच्छादलेल्या झोपडपट्टीची!

माझा रोजचा जा-ये करण्याचा नवा बदललेला रस्ता पहिल्या दिवशी कुतूहलाने नीट बघून घेतला. दुसर्‍या दिवसापासून तिकडे नजर वळेनाशी झाली, कारण तिथे इतकी घाण आहे आणि त्या घाणीतच माणसांची घरं आहेत, अशीच आच्छादलेली, तुटक्या दारांची, खिडक्या असलेली- नसलेली. आपल्या एसी गाडीतून फिरताना नजर बंद करता येऊ शकते, पण वासाचं काय? एअर-फ्रेशनर किती मारणार? आणि त्याला मागे सारून नाकात घुसणारी घाण कशी टाळणार?