December 2016

कुर्ता

परवा कधीतरी चुकून तो कुर्ता ड्रायक्लीनला दिला गेला
सिल्क चा सुंदर गडद गुलाबी रंगाचा
आवडत्या स्टोर मधून घेतलेला
तो कुर्ता आवडायचा भयंकरच
जपायचे पण खूप त्याला
खास प्रसंगालाच वापरायचे
नंतर व्यवस्थित काढून जरास ऊन दाखवून
पुन्हा इस्त्री बिस्त्री करून जागेवर ठेवला जायचा
कसा दिला गेला की या रोजच्या कपड्यामध्ये ?
परत आला धोब्याकडून तर,
त्याच्या त्या सुंदर गडद गुलाबी रंगाची शेड बदलेली,
त्यावर ऑफव्हाईट दोर्यांनी केलेलं भरतकाम,
त्याचाही रंग बदलला आहे वाईट नाही दिसत आहे खर तर;

कविता: 

DP

'तुझा DP Kiss '
त्याचा message पाहुन
तिला वाटलं लिहावं,
का नसणार?
चुरगाळलेल्या कुर्त्यात
गडद झालेल्या ओठांत
धुसरलेल्या डोळ्यांत
विस्कटलेल्या केसात
उष्ण श्वासात
White musk च्या सुगंधात
तूच तर दरवळतोएस ना
माझ्या अस्तित्वात!
मग वाटल नकोच हे
तिनेही मग reply केला
'Thnx Kiss '

पाने