December 2016

माझ्या आनंदाचं कारण

आज मला खुप मस्त वाटतंय... कारण???
हो हो कारण आहेच तर....
मागे मी काही दागिने बनवलेले... त्यातील बरेचसे मैत्रिण वरील मैत्रिणींनी विकत ही घेतले. बनवलेल्यांपैकी ४ सेट्स महाग होते अर्थात quality एकदम बेस्ट. पण घरातुन, " ह्या खोटे दागिने २-२००० ला कोण घेणार.. तुच घाल आता ते " असा आहेर जाऊबाईंकडुन मिळालेला. नाही म्हटलं तरी मनाला लागलेलंच
पण परवाच एक मैत्रिणीने माझे ३ सेट्स एक हाती घेतले. माझा आनंद गगनात, मनात आणि बाकी कुठ्ठे ही मावत नाहीये. म्हणुन ईकडे ही शेयर करतेय.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

नोबेल विजेत्या कार्याची तोंडओळख.

तसं आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ऐकून माहिती असतंच की, नोबेल पारितोषिक हा संपूर्ण जगातील अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्युत्तम कामगिरी, अथवा संशोधन केल्याबद्दल ही पारितोषिके दिली जातात. 'आल्फ्रेड नोबेल' या स्वीडीश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्यूपत्रात या पारितोषिकांची तरतूद करून ठेवली आहे, वगैरे... वगैरे...

Keywords: 

उपक्रम: 

वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: योशिनोरी ओह्सुमी!

लेखिका - धारा

Osumi_wiki
चित्र सौजन्य : Tokyo Institute of Technology

नोबेल पारितोषिक विजेते : योशिनोरी ओह्सुमी (Yoshinori Ohsumi)
विभाग : वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र
जन्म : ९ फेब्रुवारी, १९४५ (सध्या वय : ७१ वर्षे)
देश : जपान

Keywords: 

उपक्रम: 

भौतिकशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: डेव्हिड थाउलेस, डंकन हॉल्डन, मायकेल कोस्ट्लिर्ट्झ

लेखिका - धारा


मायकेल कोस्ट्लिर्ट्झ, डंकन हॉल्डन, डेव्हिड थाउलेस (डावीकडून क्रमाने)
चित्र सौजन्य : Diario Chaco

नोबेल पारितोषिक विजेते : डेव्हिड थाउलेस, डंकन हॉल्डन, मायकेल कोस्ट्लिर्ट्झ
विभाग : भौतिकशास्त्र
देश : अमेरिका

डेव्हिड थाउलेस, (पारितोषिक श्रेय : १/२) (David J. Thouless)
जन्म : २१ सप्टेंबर १९३४ (सध्या वय : ८२ वर्षे)

Keywords: 

उपक्रम: 

स्वप्नांची निळाई

स्वप्नांना वगळून रात्र सोसली आहेस कधी?
निळाई गिळून टाकतो काळोख
हट्टाने मग मनातला एकेक तुकडा जोड़ायचा
ठिगळाचा pattern स्वप्न म्हणून खपेल का?
काळोखाला भेदणारी निळाई सापडेल का?
पहात रहायच मिटल्या डोळ्यानी
जाग येतेच कधितरी
पण काळोख असतोच वर खाली
डोळे फाडून बघत रहायच
टक्क!
ठिगळाचा pattern बनवत रहायच
दिवस उजाडे पर्यन्त
स्वप्नांना वगळून दिवस मात्र सोसायचा
हसत हसत ढकलत रहायचा
मनात एकेक तुकडा साठवायचा
एका नवीन रात्री साठी
एका नव्या निळाईसाठी

कविता: 

शांततेचे २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन!

लेखिका - धारा

Juan_Manuel
चित्र सौजन्य : http://www.asianews.it

नोबेल पारितोषिक विजेते : ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन (Juan Manuel Santos Calderón)
विभाग : शांतता
जन्म : ऑगस्ट १०, १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
देश : कोलंबिया

Keywords: 

उपक्रम: 

अर्थशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: ऑलिव्हर हार्ट आणि बेंट हॉमस्ट्रॉम

लेखिका - धारा


बेंट हॉमस्ट्रॉम आणि ऑलिव्हर हार्ट
चित्र सौजन्य : ndtv.com

नोबेल पारितोषिक विजेते : ऑलिव्हर हार्ट(Oliver Hart) आणि बेंट हॉमस्ट्रॉम (Bengt Holmström)
विभाग : अर्थशास्त्र
देश : अमेरिका

ऑलिव्हर हार्ट, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : ९ ऑक्टोबर १९४८ (सध्या वय : ६८ वर्षे)

बेंट हॉमस्ट्रॉम, (पारितोषिक श्रेय : १/२)
जन्म : १८ एप्रिल, १९४९ (सध्या वय : ६७ वर्षे)

Keywords: 

उपक्रम: 

मुंबई ट्रीप

मुंबई ट्रिप च्या प्लॅनिंग साठी धागा.. इकडे सुटा सगळ्या!!!

तर २१ तारिख नक्की झाली आहे.. पुण्याहून डेक्कन क्वीन ने मुंबईस प्रयाण , न त्याच दिवशी राणीने परत असा प्लॅन आहे..

आता पर्यंत कन्फर्म झालेल्या पुण्याच्या मै :

१) अवनी_जयंती
२) प्रफे
३) आशुडी
४ ) वर्षा
५) गुब्बी / शु.कु.
६) चना
७)सन्मी

आता पर्यंत कन्फर्म झालेल्या मुंबई च्या मै :
१) मंजूडी
२) मुग्धानंद
३) स्नेहश्री
४) सृष्टी सांवत
५) कविन
६) आरती.

दुष्ट

दुष्ट शब्द आला आज भेटायला...
खाडकन् थोबाडात मारली माझ्या
म्हणाला
अग दुष्ट या शब्दालाही मर्यादा असते काही
काही क़ायदे असतात दुष्टपणाचे!
तू ज्याला सारखी दुष्ट म्हणतेस
तो कधीचा ओलांडून गेलाय तुला
तुझ्याशी दुष्ट वागावं इतकिही तू
उरली नाहियेस आयुष्यात त्याच्या
दुष्ट म्हणायचच असेल तर म्हण स्वतःलाच
किती छळ स्वतःचा?
इतका त्रास तर त्यानेही दिला नसेल तुला

हरिद्वार ऋषिकेश

फेब्रुवारी 2017 मध्ये सकुसप दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, जमल्यास डेहराडून असा प्लान आहे. दिल्लीत मी अभ्यास करणार, तेव्हा लोक्स टीपी करणार 2 दिवस आणि मग पुढचा प्रवास.
तेव्हा टीपा, राहायची ठिकाण, बघीतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे असं सगळं येऊ द्या.
लेकरू 3 वर्ष आणि ज्येना सोबत आहेत.

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle