January 2017

नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती हवी आहे.

मातोश्रींच्या डोक्यात अचानक र्मदा परिक्रमा करायचे आले आहे. तिला मनापासून फिरायला आवडते. एकटीच असल्याने कोणी चांगली कंपनी मिळाली की तिचे बेत आखणे सुरू होते. अजून छान चालते फिरते आहोत तो पर्यंत भारत फिरणे ही इच्छा! परवा एका नर्मदा परिक्रमेचे पत्रक मला पाठवून याला मी जाऊ का अशी विचारणा झाली आहे. मी ते पत्रक बघितले तर मला काही गोष्टी खटकल्या म्हणून तिला मी थोडी माहिती काढते असे सांगून थोपवले आहे. तर मला थोडी माहिती हवी आहे.

Keywords: 

The Great Gambler - ट्रॅफिक अवेअरनेससाठी शॉर्ट फिल्म

मंडळी... एक बातमी...
*श्री राघवेंद्र चित्र* प्रस्तुत
आमची शॉर्ट फिल्म *‘द ग्रेट गॅम्बलर’* ही *अवॉर्ड विनर* ठरलीये..

रोड सेफ्टीवर तुमची गोष्ट ३ मिनीटांमध्ये सांगायची होती.. मजा आली आमची गोष्ट सांगताना... 

तुमच्या शुभेच्छा पाठीशी होत्याच.. 
पण प्रेमही असंच ठेवा...
*आवर्जुन फिल्म पहा आणि कळवा..*

https://m.youtube.com/watch?v=OSpC88wWurA&feature=youtu.be

तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय.. 

सस्नेह
*सायली, रविंद्र*
टीम ‘द ग्रेट गॅम्बलर’

Keywords: 

आवडते रोमँटीक चित्रपट

तुमचे आवडते रोमँटीक, फिल गुड, chick-flick, mushy इत्यादी चित्रपटांची यादी द्या! मला असले मुव्हीज लावून दोन तास डोकं बाजूला ठेवायला फार आवडते. तुमच्या लिस्टीतून काही न पाहिलेले मिळतील..

माझे काही आवडते.

१) नॉटींग हिल
२) मेड इन मॅनहॅटन
३) शॅल वी डान्स?
४) स्लीपलेस इन सिअ‍ॅटल
५) यु हॅव्ह गॉट मेल
६) द वेडींग डेट
७) रहना है तेरे दिल मे

अजुन आठवले तर लिहीन..

मी, न्या नी .... दंगल भाग 2 (फोटो व फाइटच्या लिंक सहीत)

https://www.maitrin.com/node/1426 भाग १

फाईट म्हणजे एक पर्व असत... फाईट डीक्लेयर झाली कि मुलांची वजन तपासा मग वेट गृप पहा ... बोर्डर लाईनला असली मुल तर त्यांना आधीच्या वेट गृपमध्ये आणायचा प्रयत्न करा...पण उपासमार बिलकूल नाही... अटलिस्ट वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा. आम्ही कायमच वजनामुळे आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या मुलीच्या समोर येतो.

Keywords: 

लेख: 

काळा

एक काळा जावळाचा
एक डोळियाचा काळा
एक आकाश झुम्बरी
दाटे मेघीयाचा काळा

बाकदार भुवईचा
एक मोरपिशी काळा
मीटझुकल्या पापणी
एक कासाविशी काळा

किर्र शर्वरी रानात
गूढ घुमणारा काळा
अमावसी रातीमध्ये
चमचमणारा काळा

तटीनीच्या रात्र काठी
लहरत गूढ काळा
रात सागर किनारी
उचंबळे हूड काळा

एक हरीची सानिका
तिचा सुरमय काळा
एक राधिका बावरी
तिचा हरीमय काळा

दुष्ट अनामी भीतीचा
भयदायी मिट्ट काळा
कधी भूताचा खेताचा
करणीचा कुट्ट काळा

सावलीचा सोबतीचा
सवे चालणारा काळा
खोल मनाच्या तळ्यात
कधी सलणारा काळा

ब्रम्हांडास व्यापणारा
भव्य भीमरूपी काळा

पाणथळीचे पक्षी

मागील आठवड्यात उरण पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.

काही पक्षांची नावे माहीत नाहीत ती जाणकार देतीलच.

१) चित्रबलाक - Painted Stork

Photo:

कलाकृती: 

बुक मार्क

हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी?
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये?
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.

कविता: 

बुकमार्क्स - हस्तकला

आत्ता मैत्रीणीवर आले तेव्हा श्यामलीचा बुकमार्क हा धागा दिसला...
मी म्हटलं अरे चला आणखी कुणी बनवले ते बघुया..पण ती हस्तकला नव्हती हे नंतर कळलं :ड सुंदर लिहिलयसं श्यामली..

तर माझ्या रिकाम्यापणाचे, कंटाळा आले कि करायच्या उद्योगातला हा प्रकार इथे देतेय.. इथ बरीच वाचक मंडळी दिसतेय त्यांना कदाचित भावेल..

तर I am a book dragon (not a book worm..but a dragon). या छंदासोबत स्वतःच्या पुस्तकाविषयीचा पझेसिव्हनेस माझ्याबरोबर इतरांना सुद्धा खाऊन टाकतो.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle