February 2017

आपलाचि संवादु आपणासि : मी कशी

आपलाचि संवादु आपणासि असंच हे सगळं लिखाण. कधी आयुष्याकडे वळून बघेन,,कधी मनात डोकावेन, कधी विचारांना तपासून बघेन, जसं जमेल तसं स्वत: लाच शोधत जाईन. आता हे इथे का लिहिणार? तर कधी कधी काही पोस्ट वाचताना जाणवतं, की इथूनच मी जात होते, गेले होते, धडपडले होते, तेव्हा कोणी हात दिला, नाही दिला, कधी माझी मीच शोधत, सापडवत, तयार करत गेले होते. ते सगळं वाचताना एखादीला जरी एक वाक्य उपयोगी पडलं तरी? पडेलच उपयोगी असही नाही, पण वाचायला आवडलं तर, म्हणून इथे लिहितेय.

लेख: 

बिन तात्पर्याची गोष्ट (नाटुकले - लहानग्यांचे)

[सोसायटीच्या नाटकांच्या स्पर्धेसाठी स्क्रिप्ट निवड करण्यासाठी जमलेली मुले]
[सोसायटीचं आवार...मुलं घोळका करुन काहीतरी डिस्कस करतायत. बरेच हातवारे...मतभेद वगैरे व्यक्त करुन झाल्यावर शेवटी मेजॊरिटी विन्स म्हणत निर्णय घेऊन रुद्रच्या बाबांकडे मदत मागायला रवाना होतात]
(रुद्रचे बाबा शिक्षक + लेखक आहेत)
(मुलं रुद्रच्या दारावरची वेल वाजवतात..रुद्रचे बाबा दार उघडतात..मुलं आत येतात)
रुद्रचे बाबा: आज काय सगळ्या मुलांचा मोर्चा माझ्या घरावर का?
रुद्र: मोर्चा काय रे बाबा! आम्ही तुझी मदत मागायला आलोय
बाबा: काय? कांदाभजी की वडपाव? कसली पार्टी उकळायचा बेत आहे आज?

Tu Stree......

तू स्त्री....
साक्षात रूप तू देवीचे
प्रतीक तू अभिमानाचे
सन्मान तू स्त्री जन्माचा
वरदान तू या निसर्गाचे !

तू कन्या....
लक्ष्मी तू प्रत्येक घरची
नका विझवू वंशाची ज्योती
उजळत राहते आपुल्या ममतेने
तिच्या ओंजळीत प्रगतीचे मोती !

तू पत्नी....
प्रेमाची पूर्ती करणारी अर्धांगिनी
संसारास देणारी सुखाची संजीवनी
प्राणाहून प्रिय तुला प्रेमाचे घरटे
विश्व सजविणारी तू स्वामिनी !

तू माता....
ईश्वराचा लाभलेला सुरेख अंश
मायेचा एक अथांग सागर
जीवनास लाभलेला अनमोल आशीर्वाद
ह्रदयात निरंतर राहणारा आदर !!!!

तू बहीण....
आईपरी माया, अतूट प्रेमाची छाया
जणू जीवाभावाची सखी

Keywords: 

Infatuation

Infatuation- एका शब्दात conclude केलंस
कारण..
कारण तू कधी पाहिलंच नव्हतंस
खिडकीत बांधलेल्या wind chins सारखा
हसतोस ना
तेव्हा माझ्या चेहऱ्यावर उमटत जाते अगणित रंगांची आतिषबाजी
किणकिणणाऱ्या लोभस निरागस हसण्याने
धरत जाते हळुवार खपली
मला मुळापासून हादरवणाऱ्या जखमेवर
तुला दिसत नाही
मला जाणवत राहतं
तू बोलतोस ना
मेंडोलीनवर.. त्याच्या तारांवर
बरसात होते सुरांची !!
माती जसा पाऊस साठवते
तसा खोल खोल झिरपत राहतो आवाज तुझा
आणि मग तुझ्या भाषेत बोलणारी मी -
Infatuated !

तुझ्या लहान-सहान गोष्टीत
गुरफटताना पाहिलंयस मला?
रेशमाचा एकेक धागा गुंतत जावा
अन कशिदा व्हावा

पाऊस

पुन्हा पाऊस कोसळतोय बाहेर!
आणि इथे आत नुसता आठवणींचा पाऊस
बाहेरच्या पावसापेक्षाही मुसळधार कोसळतोय!
तुझे नी माझे कितीतरी पाऊस सहज कवेत घेत....
तुला आठवतं आपण पहिल्यांदा एकत्र पावसात भिजलो होतो....
पावसापेक्षाही तुझ्या सहवासाने येणारा शहारा!
नंतर जसं काही व्यसनच लागलं पावसाचं....
दरवेळी नव्याने पाऊस अनुभवायचं....
आणि मग कितीवेळा त्या कोसळणार्‍या धारांमधे हरवून जायचो आपण...
स्वत:ला विसरून.....
आणि अचानक एके दिवशी पाऊस रुसला माझ्यावर...
आता इथे कायमचाच दुष्काळाचा मुक्काम आहे!
माझं भेगाळलेलं मन वाट पहातंय पावसाची
तू म्हणशील, की इतका आठवणींचा पाऊस आहे की.....
पण तुला माहीत आहे ना....

आई तू कुठे आहेस ?

आई तू कुठे आहेस ?
मला अशी सोडून गेलीस,
एकटेपणाची शिक्षा दिलीस,
तुझ्या आठवणीने घरही रडतंय,
तुझ्याशिवाय जगणंही अडतय !

आई तू कुठे आहेस ?
तुझी खूप आठवण येते,
मनाला खोल जखमा देते,
तुझ्या हाकेची आता कशी ऐकू साद ?
कसा लाभेल आता तुझा आशीर्वाद ?

आई तू कुठे आहेस ?
तुझ्या कुशीत मी झोपायचे,
तुझा पदर धरून चालायचे,
दुखायचे मला तर तुझ्या डोळ्यांत पाणी,
आठवतात मला तुझी अंगाई गाणी !

आई तू कुठे आहेस ?
हरवून गेली आपुलकी माया,
दुरावली तुझ्या ममतेची छाया,
माझ्या वाट्यास आला फक्त एकांत,
झाला सगळ्या सुखाचा अंत !

आई तू कुठे आहेस ?
तू खूप सोसल्यास यातना,

जिम्या,

इथली पत्रं आणि पाळीव प्राण्यांच्या गप्पा वाचून माझ्या जिमोबा बोक्यासाठी पत्र लिहावंसं वाटलं.
IMG_20160823_220035.jpg

जिमुड्या,

आहेस कुठे रे तू? मला तुझी किती प्रचंड आठवण येत्ये माहित्ये का तुला? तुला येते का कधी माझी आठवण? अमोलची? आपल्या घराची? तुझ्या ह्या आवडत्या जागेची? बाकी सोड, आपल्या पॅमची तरी आठवण येत असेलच ना.. तुम्ही दोघं किती मज्जा करायचात आठवतंय ना?

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle