February 2017

गर्ल्स डे आऊट इन लंडन

चला चला राणीच्या राज्यातल्या मैत्रिणींनो आत्ता आपण भेटलेच पाहिजे Party अशी माधुरीची हाक आली आम्हांला,मग काय विचारता.. थंडी, वारा, पाऊस या सगळ्याचा विचार करत करत आम्ही समस्त युकेवासी मैत्रिणी "हो हो भेटायचेच" असा निश्चय करून तयारीला लागलो. :hhh: भावनाने लगेच ४ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवून टाकला. मग आमची चर्चा कोण कोण येणार, कोण काय खाणार, कोण नक्की किती लेअर्स घालणार अशा अनेक वळणांचा प्रवास करू लागली. दिवस ठरला, सगळ्या तयार झाल्या आणि मग चर्चेने एकदम मध्ये अल्पविराम, स्वल्पविराम मोड ऑन केला.

लेख: 

घरगुती प्ले डो/ क्ले

लागणारे जिन्नसः

मैदा ३ वाट्या
मीठ दिड वाट्या
पाणी ३ वाट्या
तेल ३ टिस्पून
लिंबू सत्व १ टेबलस्पून
खाद्य रंग.

कृती:
पाणी, लिंबूसत्व आणि तेल एकत्र गरम करून घ्यावे.
तोवर मीठ व मैदा व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
तीन मोठ्या वाट्यांमधे ( बोलमधे) वेगवेगळा खाद्य रंग घ्यावा (आपल्या अंदाजाने). प्रत्येकी एक एक वाटी उकळलेले पाणी त्यात टाकावे व रंग पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावा.
प्रत्येक बोल मधे दिड वाटी मैदा-मिठाचे मिश्रण टाकावे. चमच्याने ढवळून एकत्र करावे.
सुरवातीला हे ढवळलेले मिश्रण जरा पातळ वाटू शकते. अज्जाबात घाबरायचे नाही.. मिनिटभरात ते घट्ट होऊ लागते.

Keywords: 

कलाकृती: 

"बघतोस काय मुजरा कर"

महाराष्ट्र म्हटले कि मराठी माणूस... आणि मराठी माणूस म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज...... त्यांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले कर्तृत्व आपल्या सर्वांनाच माहितीच आहे.... अगदी लहान असल्यापासून आपण इतिहासात वाचत आलो आहोत... ते अगदी जीव जोखिमेत घालून हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंत.... मला काही फारसे इतिहास सांगायचं नाही आता, महाराजांनी जिंकलेले, घडवलेले किल्ले, गड़ सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, जंजिरा आणि खूप काही, आता आपल्यासाठी पिकनिक स्पॉट झाले आहेत....

लेख: 

ImageUpload: 

वैष्णोदेवी मंदीर दर्शन- कटरा- माहीती हवी आहे

हाय,

बरीच भटकंती वाचली पण मला हवी असलेली माहीती मिळाली नाही, म्हणुन हा नवा धागा.
आम्ही दोघे व अजुन ४ सिनीअर सिटीझन्स मिळुन वैष्णोदेवी दर्शनाचा प्लान करत आहोत. एप्रिल मधे पहिल्या आठवड्यात जाणार आहोत. राहण्याची काही बुकिंग्स श्राईन बोर्ड च्या साईट वर केली, पण २ दिवस पटनी टॉप ला ही रहाण्याचा विचार आहे. ऑनलाईन बुकिग्स साठी हॉटेल च्या साईटस पाहिल्या, पण मागे एक्दा काल्का च्या हॉटेल चा अनुभव भयंकर आहे, साईट वर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असला प्रकार होता, ३ स्टार असुनही. त्यामुळे लगेच बुकिंग करायला धजावत नाहीये.
कोणाच्या माहीतीत एखदे चांगले हॉटेल आहे का?

Keywords: 

ढोकळा - रेसिप्या, चर्चा, आधारगट वगैरे

कोणाला ढोकळा कसा जमतो त्यानुसार एक एक शब्द निवडा टायटलमधून. :)

पाककृती १ : माधुरी

१.५ कप चना डाळ, १ कप उडद डाळ, १ कप मुगडाळ, १ कप तांदूळ धुवून, ५-६ तास किंवा रात्रभर भिजवून, वाटून आणि मग फर्मंट करून छान हलके जाळीदार
ढोकळे होतात. करतांना त्या बॅटर मध्ये मी हि मी, आलं लसूण पेस्ट पण घालते आणि वरून जिरं-मोहरी-हि मी-कडिपत्ता-तीळ ची फोडणी.

छान फर्मंट झालं की दही किंवा इनो घालायची गरज नाही. पण थंडी मध्ये जर नीट फुलून नाही आलं तरच मी थोडं इनो घालते.

पाककृती २ : मंजुडी

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle