December 2020

सोबत

सोबत
त्यांची सोबत म्हणजे
एक खंबीर आधार
एक संरक्षक ढाल
कोणत्याही परिस्थितीचा झेलण्या वार
त्यांची सोबत म्हणजे
एक काटेरी कुंपण
सुखदु:खांस सम्मानपूर्वक जपणं
मजबूत विश्वासाची गुंफण
त्यांची सोबत म्हणजे
साक्षात् नैसर्गिक उपचार
विनामूल्य रोग्याची सेवा
असाध्य रोगाचाही घ्यावा समाचार
त्यांची सोबत म्हणजे
रोज संध्याकाळी फिरणं
जमेल तसा बाजार करणं
आल्याबरोबर चहापान करणं
त्यांची सोबत म्हणजे
'टाईम्स आॅफ इंडिया' हाती
पदार्थातील कोथिंबिरीवर प्रिती
ओठांवर अन्नपूर्णेची स्तुती
त्यांची सोबत म्हणजे
एकोणपन्नास वर्षांचा सहवास
घड्याळाशी मैत्री खास
अचानक ....सोबतीविना प्रवास

सुपारीचे भटजी/बटू (रुखवत)

भाच्याच्या मौंजीसाठी रुखवत म्हणून आज सुपारीचे भटजी/बटू केले.
पहिल्यांदाच केले. थोडं यु ट्यूब थोडं स्वतःचं डोकं! नवऱ्याने असिस्टंट म्हणून पुष्कळ मदत केली :)
साहित्य: सुपारी, काजू, काडेपेट्या, कागद, कार्डबोर्ड, दोरा, लेस!!

IMG_20201213_215907__01.jpg

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

प्रिगादी प्रागादी पिप्पारकोगीद

नोव्हेंबर महिना उजाडला की आमच्या इटुकल्या शहरातली पिटुकली दुकानं सज्ज होतात ख्रिसमच्या तयारीला. सुंदर सुंदर ख्रिसमस ट्री, कलात्मक वेष्टनात सजवलेले मार्झिपान(१), निरनिराळे 'अडवेंट कॅलेंडर्स'(२) यांच्या जोडीला हवेत मंद असा 'पिप्पारकोक' अर्थातच 'जिंजरब्रेड' बिस्किटांचा घमघमाट. कुरकुरीत अशी हि बिस्किटं खायला जितकी चविष्ट तितकच त्यावर केलेलं कलात्मक नक्षीकामही बघत रहावं असं.

लेख: 

उंच माझा झोका! Breaking Through : Isher Judge Ahluwalia

इशर! भारतीय अर्थशास्त्राच्या क्षेत्रातली एक चमकती चांदणी! काहीजण बुद्धीमत्तेसोबत उत्तम नशिबाचंही वरदान घेऊन येतात खरे. त्याला मेहनतीची/ चिकाटीची जोड  दिली की  घडत जातो एक विस्मित करणारा प्रेरणादायी प्रवास!

Keywords: 

लेख: 

रेड स्विस चार्डाची भाजी

रेड स्विस चार्डची जुडी/जुड्या- गरजेप्रमाणे, फोडणीचं साहित्य- तेल, हिंग, हळद, मोहरी. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ.

रेड स्विस चार्ड गरजेप्रमाणे आणून पानं, देठं स्वच्छ धुवून दोन्ही बारीक चिरावीत. पसरट आणि मोठ्या पॅनमध्ये तेल घालून हिंग, हळद, मोहरीची फोडणी करुन त्यात हिरव्या मिरच्या आणि लसणीच्या चकत्या किंवा ठेचलेला लसूण परतावा. त्यावर चिरलेला चार्ड आणि देठ घालून परतून झाकण घालून वाफ काढावी. गच्च शिजवायची गरज नाही तसंच चार्ड पटकन शिजतो. मीठ घातलं की झाली भाजी तयार.
इतर पालेभाज्यांसारखीच ही पण भाजी शिजल्यावर चोरटी होते.

पाककृती प्रकार: 

नव वर्ष

नववर्ष स्वागत

जाऊ देना मला
वाजले की बारा
ऐकून ढोल ताशे
जीव होई घाबरा

आज मध्यरात्री वचन देते तुला
फिरुनी नाही येणार भेटायला
घड्याळ-काटे एकरुप या क्षणाला
विलग होतील पुढच्या क्षणाला

नवाच उद्भवलाअसाध्य रोग
संस्कार थोरांचे होते वाचवाया
पिडिले बहु, परि जिवित राखाया
आकांक्षा सर्वे संतु निरामया

उद्यमी बनविले घर बसल्या
कामधंदा बसवून छंद जोपासला
रसनातृप्ती शरीरसंपदा साधत
यात्रा-सहलींचा खर्च वाचविला

माझ्या मनी नसे किंतु,परंतु
तूही नको बुरे-भले चिंतू
जे शक्य ते दिधले, हेच सत्य
जाण बा,क्षमा करी माझा मंतु

नव्याचे कर स्वागत सहर्षे
जीव ओतून रमावेस

कविता: 

नविन वर्षाच्या शुभेच्छा !!

माझ्या लेकीने नविन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे पिटुकल अ‍ॅनिमेशन बनवलं आहे. आवडतय का बघा :)

इथल्या सगळ्या मैत्रीणींना खूप खूप शुभेच्छा !!

Keywords: 

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle