एक कबुली सुरवातीलाच देते. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही. किंबहुना :) सोयीस्करपणे दोन्हीही आहे. आस्तिक असणं तुलनेनं सोपं असतं. एखाद्या सर्व-शक्तिमान ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या शक्तीवर विश्वासानं सगळं काही सोपवलं की आपण निर्धास्त. अशा वेळी विरोधी भूमिका घेणा-यांकडे पाठ फिरवून त्यांना हुर्र्ऽऽऽ करायला जमलं की झालं. पण तरी कधी काही चुकार प्रश्नांचे भुंगे सतावतात, कोड्यात टाकतात, त्रास देतात, आपल्या श्रद्धास्थानाच्या अस्तित्वावर शंका घेण्यास भाग पाडतात.