तुझमे तेरा क्या है - ९

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289

तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306

तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318

तुझमे तेरा क्या है - ६
https://www.maitrin.com/node/3460

तुझमे तेरा क्या है - ७
https://www.maitrin.com/node/3522

तुझमे तेरा क्या है - ८
https://www.maitrin.com/node/3711

पुढे चालू

अनिरुद्ध येतोय?! मी स्वप्नात तर नाहीये ना? मी स्वतःशीच खात्री करून घेतली. शेवटी माझ्या जाण्याचा दिवस उजाडला. आई बाबांनी किमान शंभर तरी सूचना दिल्या होत्या. निनाद मला सोडायला एअरपोर्टवर येणार होता त्यामुळे त्यांची काळजी थोडी कमी झाली होती. आम्ही एअरपोर्टवर वेळेत पोहोचलो. मी आत जाण्याआधी निनादला बाय म्हणताच होते तितक्यात अनिरुद्ध तिथे आला, त्याला बघताच निनादच्या चेहऱ्यावरचे भाव लक्षात येण्याजोगे बदलले होते. मी जरा डोळे वटारुनच त्याच्याकडे बघितलं तर तो चल बाय. मेसेज कर पोहोचल्यावर म्हणून निघालासुद्धा.
“हाय मीरा”
“हाय” आणि माझे शब्दच थांबले.
पांढराशुभ्र बिझनेस कॅज्युअल शर्ट, त्यावर फिका निळा पुलओव्हर आणि कॅज्युअल ट्राउसर्स घालून तो माझ्याकडेच हसून बघत होता. देवा! हा माणूस पुढचा आठवडा माझ्यासोबत असणार आहे. सतत! मीरा, कसं होणार तुझं? त्याला दिवसातले काही तास बघणं तुझ्या हृदयाचा ठोका चुकवायला पुरेसं आहे तर तो सतत सोबत असणं म्हणजे ठार होणार तू बहुतेक! स्वत:च्याच विचारांचं मला खुद्कन हसू आलं. त्याने प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे पाहिलं.

पूर्ण फ्लाईट मी जणू हवेत तरंगत होते. माझी आयुष्यातली पहिली फ्लाईट असल्यामुळे त्याने प्रत्येक क्षणी माझी मदत केली होती. त्याचं हसणं, बोलणं, एखादी गोष्ट समजावून सांगायची पद्धत सगळं माझ्यासाठी सुखद होतं. प्रत्येक वेळी त्याने माझ्याकडे पाहिलं कि माझा श्वास अडकायचा. झुरिकला उतरेपर्यंत मी जणू एखादं स्वप्नच बघत होते.
आम्ही त्या क्लायंट कंपनीबरोबर मिटींग्स केल्या त्यांना आमच्या साॅफ्टवेअरची प्रेसेंटेशन्स दिली आणि फायनली दे वेअर हॅपी विथ आवर वर्क. त्या दिवशी लुझानला येऊन चार दिवस होऊन गेले होते. या चार दिवसात काम सोडून काहीही केलं नव्हतं आम्ही. त्या दिवशी सगळ्या मिटींग्स संपल्यावर आम्ही तसे लवकरच म्हणजे दुपारीच रिकामे झालो होतो. नाहीतर हॉटेलवर पोहोचायलाच रात्र होऊन जायची त्यामुळे डिनर क्लायंटस बरोबरच व्हायचं. आज लवकर हॉटेलवर आलेय तर लंचला बाहेर पडूया असा विचारच करत होते तोपर्यन्त रूममधला फोन वाजला.
“हॅलो...”
“हाय मीरा. अनिरुद्ध बोलतोय.”
“हाय..” मी याचा कसा काय फोन? काय बरं बोलू आता अशा विचारात.
“आर यू बिझी?”
“अम्म.. नाही..”
“ओके.. जेवायचा काय प्लॅन आहे? मी बाहेर जातोय जेवायला. एक दोन क्लायंट आहेत सोबत. वूड यु लाईक टू जॉईन?”
मी हो म्हटलं आणि आवरायला लागले. तोपर्यंत परत त्याचा फोन आला त्या क्लायंट्सचं येणं कॅन्सल झालं होतं. म्हणजे आता आम्ही दोघेच असणार होतो. म्हणजे आता कॅन्सल का? माझ्या मनात येईपर्यंतच त्याने विचारलं,
“सो... काय करूया? कॅन्सल?”
“...” हो मला म्हणायचं नव्हतं आणि नाही म्हणणं धारिष्ट्याचं ठरलं असतं.
तोही काही बोलेना. एकदोन क्षण असेच गेले.
“लेट्स गो” दोघे एकत्रच म्हणालो आणि हसू आलं मला.
हॉटेल लॅाबीत भेटायचं ठरलं. मी मगाशी घातलेलाच ड्रेस घालावा का असा विचार करत होते, कारण मगाशी ऑफिसचे इतर लोक असणार म्हणून मी थोडा फॉर्मल ड्रेस घातला होता. मग मला अचानक तो ड्रेस आठवला, शर्वरी आणि मी शॉपिंगला गेलो होतो तेंव्हा तिने हट्टाने घ्यायला लावलेला. दॅट रेड ड्रेस. तो घालू कि नाही हा विचार करण्यातच १० मिनिटे घालवली मी. पण तो ड्रेस?! जास्त होतंय मीरा. मी कॅज्युअल्स घालून बाहेर पडले. लॅाबीमध्ये आले तर अनिरुद्ध आधीच तिथे आला होता. त्याचं लक्ष हातातल्या मोबाईलमध्ये होतं. मस्त ब्लू कॅज्युअल शर्ट घातलेल्या त्याच्याकडे बघतच राहिले मी. माझ्याकडे लक्ष जाताच तो पुढे आला.
”वूड यु लाईक टू सी लुझान विथ मी?”
मी ब्लॅंक!
“मी आधीही इथे आलोय त्यामुळे बऱ्यापैकी फिरलोय. माझ्या आवडत्या शहरांमधलं एक आहे हे शहर. मला आवडेल तुला हे शहर दाखवायला. तुला?”
“हम्म?!”
“तुला आवडेल का? खरंतर चालेल का?” त्याच्या डोळ्यात प्रश्न होते.
माझ्या डोळ्यात त्याच्या सगळ्या प्रश्नच एकच उत्तर होतं. हो!

आम्ही निघालो. जवळच्याच एका रेस्तराॅंमध्ये जेवून पुढे निघालो. अगदी मनाला येईल तसं भटकत होतो. अनिरुद्ध आधी तिथे आला होता त्यामुळे त्याला बरेच रस्ते माहित होते. किती सुंदर होतं ते शहर. लुझानचं कॅथेड्रल खूप प्रसिद्ध होतं सो तिकडे जाउया असं ठरवलं आम्ही. कॅथेड्रलला जाताना चालत जाणार होतो.
“मीरा, यु नो व्हॉट, एखाद शहर ट्रेन्स, बसेस मधून नाही ओळखता येत. त्याच्या रस्त्यांवरून चाललं कि त्या शहराच्या गल्ल्या तुमच्याशी बोलायला लागतात.”
अनिरुद्धची सतत काॅमेंट्री चालू होती. मी त्याला इतकं भरभरून बोलताना पहिल्यांदाच बघत होते.
“तुला वाटलं असेल कि हा माणूस इतकं कसं काय बोलतोय. पण प्रवास मला नेहमीच बोलतं करतो. प्रवास माझा छंद आहे असं नाही म्हणणार मी. फॉर मी इट्स लाईफ! माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो.”
त्याला असं बोलतं पाहणं माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट होती.

कॅथेड्रल एका टेकडीवर वसलेलं होतं. त्याच्या जवळ आल्यावर तो चढ अजूनच तीव्र झाला. आमच्याकडे दोन पर्याय होते. आलोय त्या रस्त्याने चालत वर चढणे नाहीतर पायऱ्यांनी जाणे. त्या लाकडी पायऱ्या बऱ्याच जुन्या असाव्यात. मला अचानक जाणवलं कि मी या सुरेख शहराचे खूप फोटोज काढलेत पण माझे स्वतःचे फोटोज खूप कमी आहेत त्यात. सेल्फी काढू का? अनिरुद्धला कसं विचारणार ना माझे फोटोज काढ म्हणून. मी मोबाईल पर्समधून काढला आणि सेल्फी घ्यायच्या नादात लिटरली धडपडलेच. त्या स्विस भूमीला साष्टांगच घडणार होता माझा. पण मला जाणवलं कि मी अजून हवेतच आहे. कोणीतरी सावरलंय मला. अनिरुद्धच्या हातांचा बळकट विळखा माझ्याभोवती पडला होता आणि त्याने मला खाली पडण्यापासून अलगद रोखलं होतं. तो माझ्याकडेच पाहत होता.
“सॉरी...आय मीन थँक्यू” मी बाजूला होत म्हटलं आणि त्या नादात पुन्हा पुढची स्टेप न बघितल्यामुळे परत धडपडले. पुन्हा त्याने माझा हात धरला आणि मला सावरलं. पण मला सावरताना त्याचाही तोल गेला, त्याने कडेच्या रेलींगचा आधार घेतला म्हणून बरं नाहीतर दोघेही साफ आपटणार होतो.
आणि आम्ही दोघेही हसायला लागलो.
“आर यु ओके? शुअर?” त्याने मिश्किल हसतच विचारलं.
“आय ॲम फाईन. आय ॲम सॉरी.” स्वतःच्या वेंधळेपणावर हसण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता.
एक दोन क्षण असेच गेले. त्याचे डोळे. मीरा स्टॉप! यु नो यु कॅन नॅाट विन विथ हिम. पण खरंच त्याच्या नजरेत काहीतरी होतं जे नेहमी माझ्या हृदयात एक कळ उठवायचं. तो पापणी न लावता माझ्याकडे बघत होता. मी निग्रहाने बाजूला व्हायचा प्रयत्न केला पण अजूनही माझा हात त्याच्या हातातच होता. मी तो सोडवायचा प्रयत्न केला पण त्याने तो सोडला नाही. माझा दुसरा हात त्याच्या छातीवर टेकला होता. त्याच्याजवळ अजून एक क्षणही जास्त थांबले तर माझ्या मनातली खळबळ त्याला माझ्या डोळ्यात सहज दिसेल याची मला भिती वाटत होती. त्याच्याबद्दल मला जे वाटतंय ते मी त्याला कसं सांगणार होते?
“अनिरुद्ध..” माझ्याकडे त्याला ‘मला जाऊदे’ असं कसं सांगावं यासाठी शब्द नव्हते.

“जो उनकी आंखों से बयाॅं होते हैं...
वो लब्झ शायरी मे कहाॅं होते हैं...
पुन्हा शायरी..

तो जणू काहीतरी शोधत होता माझ्या डोळ्यात. मी सरळ पायाखालच्या लाकडी पायऱ्यांवर नजर खिळवली.
“चल.” म्हणून माझा हात तसाच हातात ठेवून तो चालायलाही लागला. कॅथेड्रलला पोहोचेपर्यंत त्याने माझा हात सोडला नाही. त्याच्या हाताचा तो उबदार स्पर्श माझ्या मनावर नक्षी रेखत होता. पुढच्या सगळ्या पायऱ्या आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. मी त्याच्यासोबत अशी निघाले होते जणू तो जिकडे नेईल त्याच रस्त्याने मला जायचं होतं. माझ्यासाठी ती आजच्या दिवसातली मी घालवलेली सर्वात सुंदर वेळ होती.

कॅथेड्रलवरून सगळ्या लुझानचा अप्रतिम नजारा दिसत होता. तिथे बेंचेस होते त्यावर बसून शांत बघत राहिलो दोघे समोर दिसणारं ते सुंदर शहर.
“मीरा...”
मी उत्तरादाखल नुसतंच हूं केलं.
“तू चीज फॉण्ड्यू खाल्लंयस का कधी? दे से इफ यु हॅवन्ट इटन फॉन्ड्यू देन व्हॉट यु डिड इन युअर स्विस ट्रिप? जायचं का आज संध्याकाळी? मला एक फेमस रेस्तराॅं माहित आहे तिथे जाऊ. येशील?”
मी काही उत्तर देणार इतक्यातच त्याचा मोबाईल वाजला. सॉरी म्हणून त्याने फोन घेतला आणि जरा लांब जाऊन बोलत उभा राहिला. बऱ्याच वेळानंतर त्याने फोन ठेवला.
“रा चा फोन होता.”
“रा???” मला आठवलं हा रागिणीला रा म्हणतो.
“रागिणी. यु नो हर राईट? तिच्या प्रोजेक्ट्मधे काही इश्यूज चालू आहेत सो तिला हेल्प हवी होती”
“ओके” तो विषय तिथेच थांबला.
पुढे अजून भटकलो. संध्याकाळी हॉटेलला आलो.
रूम मध्ये जाताना “मीरा, डिनरचं लक्षात आहे ना? सी यू” असं म्हणून एक काळजाचा ठोका चुकवणारी स्माईल देऊन अनिरुद्ध गेला.
मी रूममध्ये येऊन फ्रेश झाले.
रात्री कोणता ड्रेस घालावा असा विचार करत होते. मी आणि अनिरुद्ध पहिल्यांदाच दोघेच डिनरला जाणार होतो. इज इट अ डेट? मी स्वतःशीच हसले.
इतक्यात फोन वाजला. अनिरुद्धचा होता.
त्याला डिनरला येता येणार नव्हतं. कारण रागिणीने उर्फ रा ने त्याला मगाशी ज्या शंका विचारल्या होत्या त्याची अनिरुद्धने दिलेली सोल्युशन्स तिला इम्प्लिमेंट करता येत नव्हती आणि ती करायला अनिरुद्ध तिला इथे बसून मदत करणार होता. माझा मूडच गेला. त्याला आत्ताच मदत करायला हवी होती का? पण ती रा आहे ना. त्याची खास मैत्रीण. खरंच ती त्याच्यासाठी इतकी स्पेशल आहे?
मीरा... काय चाललंय तुझं? यु आर जेलस. तू जळून लाकूड झालीयेस! अनिरुद्धने दुसऱ्या कोणा मुलीला महत्व दिलेलं सहन होत नाहीये तुला. बरं नाही हे. तुला तर माहीतही नाहीये कि हे नक्की काय आहे. आणि अनिरुद्धलाही खरंच काहीतरी वाटतंय का तुझ्याबद्दल.

कम अॅान मीरा. गेट रेडी, गेट ड्रेस्ड अँड गो फॉर युअर डिनर. अनिरुद्ध सोबत नसला म्हणून काय झालं तू स्वतः जाऊ शकतेसच ना. आज चीज फॉन्ड्यू ट्राय करायचच. बस म्हणावं तुझ्या ‘रा’ बरोबर काम करत. मला त्याचा राग येत होता पण मनात अजूनही वाटत होतं कि त्याने यावं. मी तो रेड ड्रेस घातला, छान तयार झाले. हॉटेल रिसेप्शनला सांगून एका चांगल्या फॉन्ड्यू रेस्तराॅंचं डिनरचं बुकिंग करायला सांगितलं आणि निघाले. तिथे पोहोचले. टेबल आधी बुक केल्याने थांबावं लागलं नाही. ऑर्डर दिल्यावर जरा शांत झाले. एकटीनेच असं जेवणं कसंतरी वाटत होतं मला.
“हाय.. मे आय?” कोण आहे म्हणून मी वर बघितलं.
ब्लॅक सूट घालून चक्क अनिरुद्ध उभा होता माझ्यासमोर.
त्याला तिथे बघून मला किती आनंद झाला होता हे कुणीही सांगू शकलं नसतं पण मी इतक्या सहज त्याला माफ करणार नव्हते.
“येस” मी आवाजात शक्य तितका कोरडेपणा ठेवत म्हणाले.
“आय ॲम साॅरी मीरा. प्लिज रागावू नकोस” त्याच्या आवाजात आर्जव होतं.
पण मी ठरवलं. नाही. मिस्टर अनिरुद्ध. नो. तू असा दरवेळी जिंकू शकत नाहीस. मी नाहीच हरणार या वेळी. मी सरळ आलेल्या चीज फॉन्ड्यूकडे लक्ष वळवलं. गरम चीज पोटात गेल्यावर खरंतर माझा मूड ड्रास्टिकली बदलला होता पण अजूनही मी अनिरुद्धशी काहीच बोलले नव्हते.
ते रेस्टॉरंट लेकपासून जवळ होतं.
“मीरा, प्लिज माझ्याबरोबर चल. तुझं लेकही बघून होईल आणि प्लिज यू नीड टू गिव्ह मी ऍटलीस्ट वन चान्स टू एक्सप्लेन.”

मी काही न बोलता त्याच्या बरोबर चालायला लागले.
तळ्याच्या कडेने आम्ही चालत होतो. त्या संथ पाण्यावर लहान लाटा उमटत होत्या. त्यांच्यावर आजूबाजूच्या दिव्यांच्या सावल्या नाचत होत्या. आम्ही न बोलता चालत होतो. अचानक माझ्या हाताला त्याच्या हाताचा ओझरता स्पर्श झाला.
“मीरा... आय ॲम सॉरी. मी रा ला कमिट करायला नको होतं आपला जेवायचा प्लॅन आधी ठरला असताना. पण दोस्ती मे करना पडता है यु नो. आणि रा ला मी नाही म्हणूच शकत नाही.” असं म्हणून त्याने माझ्याकडे बघितलं. मुद्दाम. डिवचल्यासारखं.
माझ्या डोक्यात गेलं होतं हे सगळं आता.
हम्म... ती तुझी खास मैत्रीण आहे. तिच्यापुढे मी कोण? जाऊदे. मी का चालतेय याच्याबरोबर? याला काही फरक पडलेला नाही मला राग आलाय त्याचा. मीच मूर्ख आहे. का त्याच्यात जीव अडकवून बसलेय? का त्याच्या बोलण्यात मला हवी ती उत्तर शोधत बसते मी?
“अनिरुद्ध मी निघते.” असं म्हणून मी मागे फिरून चालायला लागले.
“मीरा....”
“व्हॉट?” मी कावूनच मागे बघितलं त्याच्याकडे.
तो माझ्याजवळ चालत येत म्हणाला,
“एक विचारू? नक्की कशाचा राग आलाय तुला? रा चा मला फोन आला त्याचा कि त्यामुळे मी आपला प्लॅन कॅन्सल केला त्याचा?”
“यु नो व्हॉट?! यु आर राईट! मला राग यायचा काही संबंधच नाहीये ना. कोण तू माझा? आणि मी कोण आहे तुझी? कुठल्या हक्काने रागावू तुझ्यावर?” माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिथे त्याच्यासमोर उभं राहणं अशक्य झालं होत मला. मी जवळच्याच एका बेंचवर जाऊन बसले आणि तोंड हातांनी झाकून घेतलं. मला रडायचं नव्हतं त्याच्यासमोर.
“मीरा...प्लिज..” त्याने त्याचा हातरुमाल पुढे केला होता. मी त्याने डोळे पुसले. आणि मला जाणवलं रागात काय बोललोय आपण! आता ते शब्द परत घेता येणार नव्हते. मी माझ्या मनात चाललेल्या खळबळीची जवळपास कबुली दिली होती त्याला.
आत्ताच्या आत्ता इथून गायब व्हावं असं वाटत होतं मला कारण मी जे बोलले त्यानंतर त्याच्याकडे पाहण्याची माझ्यात हिम्मत नव्हती.
काही क्षण असेच शांततेत गेले. मी उठणार इतक्यात त्याने माझा हात धरून मला परत खाली बसवलं.
“खरंच कोण आहे मी तुझा? का इतक्या हक्काने रागावतेस माझ्यावर? का तुझे डोळे मला शोधतात? का माझी बेपर्वाई तुला दुखावून जाते?”
“अनिरुद्ध प्लिज मला जाऊदे.” माझ्याकडे त्याच्या प्रश्नांची उत्तर नव्हती. माझेच प्रश्न त्याने माझ्यावरच बाण बनवून सोडले होते.
“इकडे बघ मीरा...” असं म्हणून त्याने अलगद माझी हनुवटी आपल्या हाताने उंचावली.
“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय.” त्याने त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या आणखी जवळ आणला.
तो आता माझ्या इतक्या जवळ होता कि माझ्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू जातील कि काय अशी मला भीती वाटली.
“बोल मीरा. कोण आहे मी तुझा” तो पुढे झुकला. मी भावनातिरेकाने डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ टेकले. तो क्षण माझ्या आजूबाजूचं सगळं जग थांबलं होतं. त्याचा उष्ण श्वास माझ्या कपाळावर जाणवत होता. माझ्या मनावर त्यानं अलगद त्याचं नाव कोरलं होतं. मी त्याची झाले होते. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं, तो माझा होता. माझा अनिरुद्ध. पण मला जे कळलंय ते मला त्याला सांगता येणार नव्हतं. मी पापण्या उचलून त्याच्याकडे पाहूच शकत नव्हते. मी उठले पण त्याने अजून माझा हात सोडला नव्हता. तोही उठला.
“अनि.. प्लिज.. सोड” त्याने चमकून माझ्याकडे पाहिलं.
“मीरा...” त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं, मी त्याला अशी हाक मारल्याचं. मी माझा हात सोडवून घेतला आणि तिथून निघाले त्याच्या मागून येणाऱ्या हाका न ऐकता.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle