ला बेला विता - १६ - the end

"माझ्या प्रेमात.." ती स्वतःशीच पुटपुटली "आणि मी त्याला निघून जायला सांगितलं, कायमचं" पुढच्याच क्षणी रडक्या चेहऱ्याने नुपूराकडे बघत ती कसंबसं म्हणाली.

नुपुरा तिच्या तोंडाकडे बघतच राहिली. "अगं काय, काय चाललंय हे नक्की? हे कधी झालं? आत्ता इथे? " तिचे प्रश्न थांबतच नव्हते. "का केलंस तू असं?" तिचे हात घट्ट धरत नुपूराने विचारलं.

"मी आंधळी झाले होते, मला वाटलं-" पुढे तिला बोलायची गरजच नव्हती. तिला काय वाटलं ते नुपूरापर्यंत व्यवस्थित पोहोचलं होतं.

"आय एम सो सॉरी नुपूर, मी तुझ्यावर संशय घेतला. पण बिलिव्ह मी, मला तू कधीच चुकीची वाटत नव्हतीस. अभि तुझ्यापासून दूरदूर रहात होता आणि तुझं मन इतकं नाजूक झालं होतं. आणि असीमला मी तेवढा ओळखलाच नव्हता ग, मला वाटत होतं तो तुझ्या भोळेपणाचा, नाजूक मनाचा फायदा घेईल. तू मला म्हणालीस ते बरोबर आहे. माझ्यात ती टीनेजर बेलाच कुठेतरी त्याच्याबद्दल ग्रज ठेऊन होती. पण डोन्ट वरी, आता तिला मी हिमालयात पाठवून दिलंय!" ती जीभ दाखवत म्हणाली.

"मॅड आहेस तू एकदम! तरी बरं तुला इतकी वर्षे ओळखतेय त्यामुळे मला कल्पना आहे तुझ्या मॅडनेसची!" नुपूरा तिचा कान पिळत म्हणाली. "आता उशीर करू नको बेल्स. त्याला असं वाटायला लावू नको की तुझं त्याच्यावर प्रेमच नाहीये. कारण तुझं प्रेम आहे, हो ना? स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आत्ता लगेच जाऊन त्याला भेट आणि सांगून टाक!" नुपूरा तिचे खांदे धरून हलवत तिला सांगत होती आणि अभिषेक नुसताच मै कहां हूं लुक देत दोघींकडे बघत उभा होता!

तिने हाच सल्ला असीमला त्याच्या बाबांना भेटताना दिला होता. खरं आहे आता वेळ घालवून उपयोग नाही. तिने इतका मूर्खासारखा विचार केल्याची तिला लाज वाटत होती आणि तो किती चिडला असेल, कसा रिऍक्ट करेल याची भीतीही. त्याने नाहीच ऐकून घेतलं तर? तिने त्याला असं अचानक जायला सांगणं हा त्याच्यासाठी जबरदस्त धक्का असणार. किती हर्ट झाला असेल तो. तिला आता खूप भीती वाटायला लागली.

तो बाबांच्या आधी निघून गेला म्हणजे त्यांच्या घरी नसणार. पहिल्याच दिवशी इतक्या नाजूक पर्सनल गोष्टी तो बाबांशी बोलणार नाही. कुठे शोधू आता त्याला... आणि अचानक तिला त्याचं वाक्य आठवलं, 'जगावरचा राग ओसंडून जायला लागला की लपून बसायची जागा होती ही.' ओ गॉड, प्लीज प्लीज हा तिथेच असूदे. . "मला निघायला हवं." ती अचानक म्हणाली. "नुपूर तू प्लीज इथलं सगळं मॅनेज कर. आईबाबा आणि सगळेजण इथून मीना मावशीकडे रहायला गेलेत त्यामुळे त्यांचं टेन्शन नाहीये. मी उद्या जाईन मावशीकडे. "

"डोन्ट वरी यार, तू नीघ लगेच." नुपुरा तिला घाई करत म्हणाली.

"अरे हो आणि काँग्रॅच्युलेशन्स गाईज!!" ती पुन्हा वळून दोन्ही हात पसरून दोघांना मिठी मारत म्हणाली. "आपण प्लॅन करून प्रॉपर सेलिब्रेट करू, उद्या ठरवू" म्हणून दोघांकडे हसून बघत ती बाहेर पळाली.

निघताना तिने त्याला दोनतीनदा कॉल केला पण त्याचा नंबर प्रत्येकवेळी नॉट रीचेबल होता. शेवटी पार्किंगमधून कार काढून सुसाट हायवेला लागायला तिला जेमतेम दहा मिनिटं लागली. गुड! याच स्पीडने गेले तर टेकडीवर पोचायला हार्डली अर्धा तास म्हणजे साधारण दहा वाजतील. इतका वेळ असेल का तो तिथे? टेकडीचा रस्ता पूर्ण रिकामा होता आणि दोन्ही बाजूच्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या वाऱ्याने जोरजोरात हलत होत्या. रस्त्यावर कुठेही दिवे नव्हते म्हणजे वर असायची तर शक्यताच नव्हती. घाबरू नको बेला, तुला वरपर्यंत पोहोचूनच थांबायचं आहे. स्टिअरिंगवरची मूठ आवळून ती स्वतःलाच बजावत होती.

शेवटचा चढ पार करून तिची गाडी एकदाची वरच्या पठारावर पोहोचली. हेडलाईटच्या उजेडात तिला त्याची कार लांबवर पार्क केलेली दिसत होती. "हुश्श! इथेच आहे तर. गुड जॉब बेला." स्वतःशी हसत ती म्हणाली. पण वाटेत इतके दगड धोंडे होते की तिची कार त्यात घालायची तिला इच्छा नव्हती. तिने कार होती तिथेच पार्क केली. हातात सेलफोनचा टॉर्च ऑन करून ती खाली उतरली.

उतरल्या उतरल्या प्रचंड थंडी आणि वाऱ्याने तिला एकदम हूडहूडीच भरली. तिचा असून नसल्यासारखा ड्रेस आणि पायातल्या हील्स तिथे चालायला अगदीच अयोग्य होत्या. त्या काळोखात तिला असीम कुठेही दिसत नव्हता. सेलच्या प्रकाशात कशीबशी कुडकुडत, धडपडत चालताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती बारीकशी किंकाळी फोडून उतारातून एखाद फूट खाली घसरली. भीतीने तिच्या घशातून आवाजच निघत नव्हता. नशिबाने हातातला फोन तसाच होता. त्या उजेडात तिने आजूबाजूला बघितलं तर तो काहीतरी कामासाठी खणलेला उथळसा पाचसहा फूट खोल वाटणारा चर होता. त्या भुसभुशीत चिखल मातीत पाय घसरून तिला बाहेर निघता येत नव्हतं. असीम येत का नाहीये अजून, त्याने नक्कीच माझा आवाज ऐकला असेल. ती जीव मुठीत धरून वाट बघत होती.

अचानक वरून त्याचा हाय बेल्स! म्हणून आवाज आला म्हणून तिने फोनचा फोकस वर करून पाहिलं. तिथे जमिनीत पाय घट्ट रोवून, हाताची घडी घालून असीम उभा होता. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तरी तो खूप चिडून काहीतरी करेल असं वाटत होतं. तिला त्याच्या थंड चेहऱ्यावर, डोळयावर उजेड टाकायची भीती वाटत होती. न जाणो त्यात काय दिसेल.

"आता काय हवंय तुला" त्याने थंडपणे विचारले.

"मला बोलाय-- आं" बोलणं संपायच्या आत किंचाळत ती अजून खाली घसरली पण चाचपडणाऱ्या हातात एक वेल सापडल्यामुळे  ती अजून पूर्ण पडली तरी नव्हती.

"हूं" फक्त एक श्वास सोडत त्याने वाकून तिच्या दिशेने हात पुढे केला आणि तिचा हात घट्ट धरून तिला खेचून वर घेतलं. पण ती वर त्याच्या शेजारी पोहोचताच तिचा हात सोडून दिला. तिला त्याच्या रागाबद्दल जे वाटत होतं त्याचा हा पुरावाच होतं. तो भयंकर चिडून गप्प झाला होता.

"असीम..." ती त्याच्याकडे तोंड करून उभी रहात बोलू लागली पण कुठून सुरू करायचं आणि कसं बोलायचं हेच तिला सुचत नव्हतं. तिचा श्वास रोखला गेला होता. हा तर खड्ड्यात पडण्यापेक्षा त्याच्या इतक्या जवळ उभं राहण्याचा साईड इफेक्ट होता. त्याच्या शरीराची ऊब तिला जाणवत होती. काळोखात बाकी काहीच दिसत नव्हतं आणि हातातला फोन वर धरून त्याचा चेहरा बघायची तिची हिम्मत होत नव्हती.

एकदम पुढे होत त्याने तिच्या हातातला फोन खेचून घेतला आणि टॉर्चचा उजेड तो तिच्या पायापासून हळूहळू वर घेऊन जाऊ लागला. तिच्या तुटलेल्या हील्स, जरासे खरचटलेले गुडघे, काट्यामुळे एकदोन ठिकाणी फाटलेली टूल, आणि ड्रेस, हात, पाय, खांदे सगळीकडे पडलेले गवताचे हिरवट डाग दिसत होते.

"तुझा ड्रेस पूर्णच खराब झाला." तो तिच्या गळ्याशी उजेड थांबवत बाकी काहीच रिऍक्ट न करता म्हणाला.

"खड्ड्यात गेला तो ड्रेस!" ती आता डोळ्यावर पडणाऱ्या उजेडात नाक डोळे आक्रसून बघत म्हणाली.

"क्वाइट लिटरली!" तो ओठ मुडपून म्हणाला.

"इथे कशाला आलीस बेला?" त्याने पुन्हा रागाने विचारलं.

आणि अचानक सगळं सोपं झालं होतं. "तुला सांगायला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." ती प्रत्येक शब्द स्पष्ट आणि ठामपणे उच्चारत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा फोकस जरासा हलला. तिला त्याचा चेहरा दिसत नसला तरी तिचं म्हणणं त्याच्यापर्यंत पोचलंय हे पलीकडे पसरलेल्या शांततेवरून कळत होतं. "आय लव्ह यू असीम! आय रिअली लव्ह यू. मला मान्य आहे मी तुला जायला सांगितलं, माझ्या आयुष्यातून जायला सांगितलं पण मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. माझं डोकं ठिकाणावर नव्हतं. मी तुला अचानक नुपूराबरोबर बघितलं आणि मला वाटलं-"

"नुपूरा!" राग आणि अविश्वासाने त्याने दोन्ही हात हवेत उडवल्यामुळे पुन्हा फोनचा फोकस इकडेतिकडे डचमळला.

"मला मदत हवी होती तेव्हा मी नुपूराकडे गेलो होतो का? की माझे वडील आणि मी यातली दरी नुपुराने सांधून दिली? की मी नुपुराच्या घरी तो एक अमेझिंग दिवस घालवला?" तो खूप मोठ्याने बोलत होता.

"नाही, नाही. मला माहितीये मी चूक केली." आता ती पटापट बोलायला लागली. "मी अक्षरशः आंधळेपणाने काहीही विचार केला. माझ्या मनात कुठेतरी जुना तू लपून होतास. एवढ्या महिन्यात आपण इतके कमी भेटलो की मला तुला पूर्ण जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही.  तुझ्याशिवाय माझे दिवस रात्र मला खायला उठत होते. प्रत्येक वेळी मला नवा नवा तू दिसत होतास आणि माझ्याच इनसिक्युरिटी आणि जेलसीने माझा कंट्रोल घेतला होता. मला समजतच नव्हतं मी काय वागतेय ते. मी तुला जसं वागवलं त्यासाठी आय एम एक्सट्रीमली सॉरी. मला कळतंय मी तुला किती दुखावलंय. पण विश्वास ठेव मला असं कधीच वागायचं नव्हतं. मी तुला कधीच हर्ट करणार नाही, असीम. आय लव्ह यू!" तिच्या डोळ्यातून आता पाणी गालांवर ओघळायला लागलं होतं.

"अँड आय लव्ह यू , यू क्रेझी इडियट!" त्याने फोन खिशात टाकला आणि पुढे होत दोन्ही हातांनी तिला ओढून मिठीत घेतलं. त्यांना आता उजेडाची गरज नव्हती. अंधारात न चुकता त्याने तिला इतका वेळ किस केलं की वरचं टिपूर चांदणं तिच्या डोळ्यांसमोर गोलगोल फिरायला लागलं होतं. त्याच्या मिठीत तिचा श्वास थांबला होता, हाडं मोडून जातील असं वाटत होतं पण आज हे सगळं तिला हवं होतं. आता तिला बाकी कशाचीच जाणीव नव्हती. रात्र, थंडी, वारा कशाचीच तिला फिकीर नव्हती. त्याच्या मिठीतलं प्रेम आणि ऊब एवढंच तिला सुरक्षित ठेवायला पुरेसं होतं.

"तुला थंडी वाजतेय" तिच्या अंगावर आलेला काटा जाणवून तो म्हणाला. "आपण गाडीत बसूया" म्हणून त्याचं लेदर जॅकेट काढून तिच्या अंगावर घालत तो म्हणाला.

"माझ्याशी लग्न करशील बेला? लाईक हॅपीली एव्हर आफ्टर?" बॅकसीटवर पुन्हा तिला मिठीत घेऊन तिच्या मानेवर थंडगार नाकाचा शेंडा टेकत त्याने विचारले.

"लग्न नाही केलं तरी मी तुझ्याबरोबर नेहमीच हॅपीली एव्हर आफ्टर असेन" ती डोळे उघडून त्याच्याकडे बघत म्हणाली.

"पण मला करायचंय!" तो वर तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्याच्या ठाम आवाजातून त्याला ते किती महत्वाचं आहे ते जाणवत होतं. आईबाबांचं मोडलेलं लग्न, नंतर त्याचा बाबांशी दुरावा आणि इतक्या वर्षाचा एकटेपणा यातून त्याला आता एक स्वतःच म्हणता येईल असं माणूस हवं होतं. तिने उत्तर द्यायला तोंड उघडलं पण तो तिच्या ओठांवर बोट ठेवून म्हणाला, "श्श, आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे खरं तर शो नंतरच सांगणार होतो पण -" तिथे घडलेला प्रसंग आठवून, ती वेळ पुसून टाकल्यासारखी त्याने जोरात मान हलवली.

"मला कळतंय हे मागचे काही महिने तुला किती कठीण गेले असतील. आय हॅव हेटेड इट टू. मला प्रत्येक क्षणी तू बरोबर हवी होतीस. रोज रात्रभर मी जागा राहून स्वप्न बघायचो की रोज तुझ्या मिठीत झोपून सकाळी जाग येईल तेव्हा तू माझ्या बाजूला असशील तो दिवस कसा असेल..." तो तिचे हात हातात घेऊन तिच्याकडे तोंड करून बोलत होता.

"असीम.. आता ती त्याच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली, "मला माझी चूक आता कळलीय, मला आता आपण लांब राहिलो तरी तुझ्यावर पूर्ण विश्वास असेल." ती आता घाईघाईने बोलत होती. त्याचं बोलणं कुठल्या दिशेने जाणवून ती म्हणाली, "त्यासाठी तुला तुझं करीयर सोडून माझ्याबरोबर सेटल व्हायची गरज नाहीये. प्लीज डोन्ट स्टॉप बीइंग अ कॉमिक. ते तुझ्या रक्तात आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत मी तुला सोडू देणार नाही. तुला हवं तसं लग्न आपण करूच, आय वॉन्ट टू बी युअर वाईफ!"

"असं लग्न! ज्यात आपण वर्षातून धुमकेतूसारखे पाच सहा वेळा भेटू. वेडी मुलगी आहेस तू." तिच्या लूज होऊन घसरलेल्या फ्रेंच ट्विस्टमधल्या पिना एकेक करून काढत तो म्हणाला. "मला जे सांगायचं होतं ते वेगळं आहे, तुला आठवतंय पणजीला माझ्या एकदोन प्रॉस्पेक्टिव्ह मीटिंग्स होत्या असं मी म्हणालो होतो. ते एकदोन प्रोड्युसर्स आणि tv चॅनल हेडबरोबर डिस्कशन होतं. मी बरेच दिवस काही स्क्रिप्टसवर काम करतोय.."

"आणि त्यांनी ती accept केली!" ती उत्साहाने उतू जात म्हणाली.

"येस! आणि अजून आहे, जानेवारीपासून माझी स्वतःची एक सिरीज सुरू होईल. माझा स्वतःचा शो बेल्स! असिमेट्रिक! फायनली इट्स हॅपनिंग. मला खूपदा मुंबईला जावं लागेल पण इथे आपण एकत्र राहू शकू. बाकी माझ्या यूट्यूब चॅनलचं शूट मी इथूनच करू शकेन आणि स्टँड अप शोज कमी करेन. सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे आपण एकत्र राहू!" तो हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला.

एकत्र! अतीव आनंदाने तिचे डोळे भरून आले होते. एकत्र- हा शब्दच किती मस्त आहे! "असीम, आय एम सो हॅपी फॉर यू, फॉर अस!" ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली.

"मग? लवकरच आपण मिस्टर दिवाण एवढी वाट बघत असलेली नातवंडं त्यांना देऊ शकू." तो मिश्कीलपणे हसत म्हणाला. "असीम! तुझे बाबा आहेत ते. शो सम रिस्पेक्ट!" ती डोळे मोठे करून त्याच्या हातावर चापटी मारत म्हणाली. तो मजेत म्हणाला तरी तिच्या डोळ्यासमोर ती, तो, आईबाबा आणि मुलं अशी आनंदी इमेज दिसलीच. "चल जाऊन सांगून टाकू त्यांना" ती म्हणाली.

अंधारातही त्याच्या चेहऱ्यावरचं मोठ्ठ हसू तिला स्पष्ट दिसत होतं.

"ते त्यांना सांगूच, पण आधी-" त्याने तिला मिठीत जखडून टाकत खोलवर किस केलं. तिने डोळे मिटून घेत त्याच्यात स्वतःला झोकून दिलं.
"बेलिस्सीमा..  हे फक्त एपीटायझर होतं, मेन कोर्स अजून बाकी आहे." तो तिच्या कानात कुजबुजला.

"अँड आय कान्ट वेट.. खूप भूक लागलीय" ती हसत पुढे होऊन त्याच्या कानात कुजबुजली आणि पुन्हा एकमेकांच्या मिठीत ते हरवून गेले.

The end.

आळश्यांसाठी इटालियन शब्दार्थ:
La bella vita - A good life
Sei Bellissima - beautiful lady

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle