स्वातंत्र्यदिन २०१६

जलरंगात तिरंगा

मॅगी टिचरने शिकवलेलं जलरंग माध्यम फारच आवडायला लागलय :P
जमत काही नाही ते जाऊद्या Whew
तर मै चा हा उपक्रम समजल्या पासूनच ठरवलेलं कि जलरंगात तिरंगा काढूयात.

हा एक प्रयत्न केलाय
बघून हसू नका ग  68

large_20160815_144802-1-1.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगा - जलरंग चित्रे

जलरंग वर्कशॉपमधल्या होमवर्कचा गुलाब राहिलाच होता. टीचरने वॉर्निंग पण दिलेली :ड
तर आज तिरंगा उपक्रमाच्या निमित्ताने नारिंगी गुलाब करुन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय Cool
मॅगी तू बोललीस तसा अजूनही हात मुक्तपणे फिरत नाहीय. हात ग्राफिककडेच वळतोय. पण प्रयत्न करतच रहाणार. :)
Rose.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगी क्रोशे पाऊच

सगळ्यांच्या एंट्रीज पाहुन अगदी काही तरी करायचंच अस ठरवलं. दरवेळी मैत्रिण उपक्रमात सहभाग घेणं शक्य होत नाही वेळेअभावी, आज हाताशी वेळ होता आणि रंग हि होते आणलेले सो स्पेशल 'मैत्रीण' साठी केलेला हा प्रयत्न. नुसत्या शो च्या वस्तु पडुन राहतात काही तरी उपयोगी होणारं करावं इतकंच डोक्यात होतं. सुचत गेलं आणि करत गेले.

PicsArt_08-15-07.15.24.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगा : तीन ओळींची इपिगो

तिच्या हातात आता झेंडा होता.
रंकाळ्या जवळच्या राजवाड्यावर तो फडकवायला; ती धावत सुटली.
गात होतीच ती जोरजोरात, वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्...!

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगी पेपर ईअरिंग्ज

हे क्विलिंग स्ट्रीप्सने बनवेलेले तिरंगी एअरिंग्ज. आज मीच घातले आहेत
Ind day earrings.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगी हायकू

पहिल्यांदाच केलेली हायकू रचना गोड मानून घ्या :)

देठ केशरी, धवल पाकळ्या
मनस्वी गळून पडते हिरव्या तृणपात्यांवर
तीच असावी पहाट स्वातंत्र्याची..

Keywords: 

उपक्रम: 

पाने

Subscribe to स्वातंत्र्यदिन २०१६
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle