हस्तकला

स्किल वापरून बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी : www.skillproducts.com

मैत्रीणींनो आज एक छानशी बातमी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. गेले दोन वर्षं जी संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती तिला आता मूर्त स्वरूप आलं आहे.

मी एक इ-कॉमर्सची वेबसाईट सुरू केली आहे : www.skillproducts.com

Keywords: 

कलाकृती: 

काही म्युरल्स

 हे काही म्युरल्सचे प्रयत्न!


एका गाणाऱ्या जेष्ठ मैत्रीण कम मावशीसाठी. थर्माकोल वरती टॉईनचा दोरा, साधा दोरा, मणी, रंग वापरून.

कलाकृती: 

क्विलिंगची घड्याळे

दीड वर्शापूर्वी बहिणीला वाढदिवसाला काहीतरी वेगळी भेटवस्तू द्यावी असे डोक्यात होते. आणि नेटवर भेटवस्तू शोधता शोधता मला दिसली क्विलिंगची घड्याळे. किंमत होती १२०० ते १५०० अगदी माझ्या बजेटच्या बाहेर आणि . मग विचार केला, आपल्याला येतच क्विलिंग करायला, तर मग आपणच घड्याळ एक बनवुन द्यावे. आणि मग शोध सुरु झाला क्विलिंगसाठी मोकळ्या घड्याळाचा.

आणि फेविक्रिल हॉबी आयडियाजच्या दुकानात मिळालं एक घड्याळ. आणि भेट दिलं बहिणीला मी बनवलेलं क्विलिंगचं पहिलं घड्याळ. आणि ते पाहून तिच्याच ऑफिसमधल्या मैत्रिणींनी काही ऑर्डर्स दिल्या.

Keywords: 

कलाकृती: 

काच मण्यांची कर्णभूषणे भाग दोन.

अजून काही बनवली आहेत. फोटो फोन वरून काढले आहेत व धागे दोरे जे दिसत आहेत ते नीट सफाइदार पणे करण्याचे काम ही चालू आहे. वाढदिवसाची भेट.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

काच मण्यांची कर्णभूषणे

अमेझॉन वरून बीड ज्वेलरी मेकिंग किट मागवले व बसून काय काय बनवले आहे. अजून शिकतेच आहे. परवा एक मण्यांची ओळ केश्वीला बनवून दिली. खिळ्यावर टांगली की शोभेची दिसेल अशी.
पूर्वी पडदे असत असे काचेचे. एक सेट आहे. वीकांताला काय काय बनवत असते.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ...

मला कुंभारकाम करायला लागून जवळपास तीन वर्षे होत आली, पण अजूनही ते सगळे कालच सुरु केले आहे अशा तर्‍हेने झटापट चालू असते. घरात जिकडे तिकडे विचित्र आकारांची आणि रंगांची भांडी पडलेली असतात. चार लोक पोहे खायला आले तर चौघांना वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, आकाराच्या, ताटल्या अन् भांडी मिळतात. माझे बिचारे देवही त्यातून सुटले नाहीत. उदबत्तीचे घर, दिव्याखालची ताटली हे सगळे - अपना हाथ जगन्नाथ ह्या प्रकारात मोडणारे!

Keywords: 

कलाकृती: 

माझा पहीला अनुभव - पेपर क्विलींग वर्कशॉप

पिढ्यान पिढ्या रक्तातून धावणारे टिचिंगचे जीन्स आणि क्विलिंगने लावलेलं वेड. त्यात उन्हाळी सुट्टी म्हणजे मुलांसाठी मोकळा वेळ. माझ्या क्विलिंग उद्योगाचा पसारा लोकांपुढे यावा आणि अशा प्रकारची वर्कशॉप्स घेता येतात का याचाही ंदाज यावा म्हणून मी एका शनिवार रविवारी एक वर्कशॉप घेतलं. जाहीरात अर्थातच सुरवातीला अजाबात पैसा खर्चून पदर मोडून काही करायचं नाही म्हणून व्हॉटसॅप, इमेल इ. माध्यमातून केली. मेंबर्स तयार होणं, मग गळणं मग परत नवीन मेंबर मिळणं अस अगदी साग्रसंगीत होऊन माझं वर्कशॉप फक्त २ मुलं येऊन संपूर्ण झालं. २ च काय पण एक जरी मुल असतं तरी मी घेणार म्हणजे घेणारच यावर ठाम होते.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

Subscribe to हस्तकला
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle