tea

चहाबाज रे!! अमृततुल्य पेय

जसे अट्टल बेवडे असतात तशी मी अट्टल चहाबाज आहे, मला चहा कसाही कुठेही कधीही कितीही प्यायला आवडतो.
चहाची स्वता:ची काही खास रेसीपी असेल अथवा कुठे बाहेरगावी परदेशी प्यायलेला आठवणीतला चहा असेल तर रेसीपी आवर्जुन लिहा! चहाशी रिलेटेड एखादी चांगली वाईट आठवण असेल तर ती ही लिहा! चहा प्या, खुश रहा!
तो एक कप चाय हो जाये!! Thumbsup

Keywords: 

पाऊस = चहा!

पाऊस म्हणले की आठवतात ती पुस्तके! खिडकीशी बसून चहा पीत पाऊस बघणे यातच खरे सुख! हॉस्टेलला असताना माझी कॉट अगदी खिडकीशी होती. पडद्यांना खिळे मारायला परवानगी नव्हती म्हणुन फक्त काचेच्या दारे असलेल्या खिडक्या! सेमेस्टर सिस्टीममुळे अभ्यासाव्यतीरिक्त फार काही वाचायला वेळ मिळायचा नाही तरी एखादी कादंबरींका होईना वाचली जायची. कॉलेज नुकतेच चालू झालेले असायचे. मस्त पावसाची झिम्मड, भिजणारे गवत खिडकीतून बघताना चहा हा हवाच! मी पट्टीची चहाबाज वगैरे अजिबात नाही. रोज हवाच असे नाही, पण पाऊस आणि पुस्तक या काँबीनेशन बरोबर तो हवाच!

तर असा हा चहा! मी केलेल्या कपातून प्यायला या!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to tea
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle