February 2015

पुस्तकांबद्दल गप्पा !

सध्या काय वाचताय?
एखाद्या पुस्तकाबद्दल काही विशेष आवडले असेल तर मैत्रिणींना नक्की सांगा!

श्राव्यपुस्तके/ऑडिओबूक्स
न आवडलेली पुस्तकं
किंडल इबुक्स/अ‍ॅप/इरीडर बाबत

स्वीट टोमॅटोज!

भाग्यश्रीच्या खाद्ययात्रेत माझ्या प्रिय रेस्टॉरंटचं नाव वाचल्यावर मी २०१२ मध्ये लिहिलेला हा लेख आठवला. तो मैत्रिणींसाठी इथे देते आहे. आय होप तुम्हालाही आवडेल. :)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इडियॉक्रसी..!

असं म्हणतात माकडापासून आत्ताचा मानव विकसित झाला.. ४ पायांवरून २ पायांवर आला.. या इव्हॉल्युशन मधे शेपटीसारखे न लागणारे अवयव नष्ट झाले..

बाई गं बाई गं!

२०१३ च्या एप्रिलपासून पुढचे बरेच महिने मी काहीनाकाही कारणाने फिरतीवर होते. एकदा तर साधारण पावणेदोन महिन्यांनी घरात पाऊल टाकलं. ते पण ८-१० दिवसांकरताच.
एप्रिलच्या आधीही लेक्चर्स वगैरेमुळे महिन्यातले ७-८ दिवस बाहेरगावी असणं हे होतंच.
तर या सगळ्यासंदर्भाने आलेले दोन गमतीशीर अनुभव.
१. फेसबुकावर जुजबी ओळख झालेले सदगृहस्थ (फेजुओझास). त्यांच्या कॉलेजच्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी सामील होणे त्यांना अपेक्षित होते त्याप्रित्यर्थ फोन नंबराची देवाणघेवाण केली गेली होती.
फेजुओझास - पुढच्या महिन्यात अमुक तारखेला वेळ देऊ शकाल का आमच्या कॉलेजसाठी.

अब के बरस !

तशी मी काही फारशी इमोशनल वगैरे व्यक्ती नाही. उगाच कुणीतरी काहीही कारण इक्कुल्या कारणासाठी मला रडू वगैरे येत नाही. क्वचितच रडणार्‍यांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे एकदा रडू आलं की काही केल्या थांबत नाही.... मग आधीचंमागचंपुढचंगेल्यातीनचार वर्षांमधलं जे काय रडणं शिल्लक असतं तो सगळा इमोशनल धबधबा एकदमच सुरू होतो. “टचकन डोळ्यांत पाणीआलं” वगैरे नाहीच. डायरेक्ट जुलै महिन्यातला पाऊसच.

मराठी दिनाच्या शुभेच्छा!

सर्व मैत्रिणींना 'मराठीदिना'च्या मनापासून शुभेच्छा! :)

तुमच्या मराठी भाषेतील आवडत्या गोष्टी कोणत्या? कुठल्या कविता तुम्हाला आवडतात? अजुनही तोंडपाठ आहेत? कुठले लेख, ललितं, पुस्तकं तुमची आवडीची आहेत? कुठली म्हण तुम्ही नेहेमी वापरता? हे आणि असंच अजुनही जे तुम्हाला आठवेल ते इथे लिहा.

Keywords: 

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle