March 2015

वसंतातले पाहुणे-१

कुडकुडायला लावणारी थंडी कमी होऊ लागली की सगळ्यांनाच ऊबदार पण बंदिस्त घरातून बाहेर पडायचे वेध लागतात. आपणही मग पटकन घरात पळण्याऐवजी जरा बाहेर रेंगाळू लागतो. अजून बाहेरचं रंगहीन रुक्ष वातावरण तसंच असतं आणि अचानक कुठेतरी हिरवा रंग लक्ष वेधून घेतो. यावेळी तर मला एकदम जांभळासुद्धा दिसला! पाहुणे काही आगाऊ सूचना न देता उगवलेसुद्धा!

दारात हजर!

croc.jpg

आणि हे म्ह्णतायत, we are almost there! (ओळ्खा पाहू आम्ही कोण?)

सृजनाच्या वाटा: 

माझ्या आयुष्यातले वसंत

सगळ्यात शेवटी भेटलेला वसंत हा माझा जुना कलीग. वसंत कुलकर्णी. अजूनही त्याचं वय माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. पण वसंत हा तसा 'मैत्रीखोर' माणूस असल्यामुळे नवीनच आलेला पोस्टग्रॅडही वसंतला फार न घाबरता वसंत म्हणू शकतो. थोडा वातावरणाचाही भाग असावा. वसंत आणि त्याच्या दोन तृतीयांश वयाच्या त्याच्या आणि माझ्या, (म्हणजे मित्र माझेही) मित्रांच्या म्हणण्यानुसार मुलींशी मैत्री करण्यासाठी वसंत फार उतावीळ असतो. मागे एकदा म्हणे त्याच्याकडे समर स्टुडंट म्हणून काम करायला कोणीही मुलगी तयार न झाल्यामुळे त्याने एक टेप ड्राईव्ह असूयेचा अटॅक आल्यामुळे मोडला होता.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle