March 2015

कथाकली पेंटींग

मी हे पहिल्यांदाच ट्राय केलेय.

११ बाय १४ इंच कॅन्व्हास वर अ‍ॅक्रेलिक् पेन्टींग

painting.jpg

ह्या चित्रात नायक नायिके सोबत मागे खलनायक आहे.

त्यांच्या विशिष्ठ वेषभूषेबद्दल आणि कथाकली बद्दल थोडेसे लिहितेय...

अशी रंगली मेहंदी रेषा गेल्या पुसून....प्राक्तनात रुसलेले सुख आले खुलून !

अशी रंगली मेहंदी
रेषा गेल्या पुसून
प्राक्तनात रुसलेले
सुख आले खुलून

mehandicolor.jpg

मस्त कथ्थई रंग आला होता....

mehandicolor1.jpg

mehandi.jpg

शाळा कॉलेजमध्ये असताना वरचेवर मेहंदी काढली जायची... राखी पौर्णीमा नगपंचमी ला तर हमखास..

विद्युल्लता प्रदर्शन - निमंत्रण

नमस्कार मैत्रिणींनो,

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी फोटो सर्कल सोसायटीने महिला दिनाच्या निमित्ताने 'विद्युल्लता' हे फोटोस्टोरी प्रदर्शन आयोजित केले आहे.
२०१५ साली महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, जळगाव, सोलापूर, तुळजापूर, लातूर, औरंगाबाद अशा विविध भागातल्या, समाजासाठी उत्तुंग कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या फोटोस्टोरी या प्रदर्शनात पहाता येतील. या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन ६ मार्च २०१५ ते ८ मार्च २०१५ रोजी ठाणे कलाभवन, ठाणे येथे भरवले जाणार आहे.
तुम्हा सगळ्यांना या प्रदर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.

पुरणपोळी

लाटताना आज पोळी
गुणगुणली कविता मनी
शौर्य रसाची भाकरी, भाववाही ती पोळी
भावनेचा पूर ती
गझलवेडी पुरणपोळी

लयीमधला दावी खुमार
भाकरीचा तत्ताकार
मध्य एक लय बांधून
बढत घेई पोळीचा परीघ
लय तीच सांभाळुनी,डौल तिचा वाढवुनी
भावगर्भीत पुरण उदरी
गझल जणू पुरणपोळी

अंजली
५/३/२०१५

बाप्पा डूडल

||श्री गणेशाय नम:||

नमस्कार.

हौशी चित्रकला सुरु असते अधूनमधून. बस-ट्रेन प्रवास, कंटाळवाण्या मीटिन्ग्ज, फोन कॉल्स दरम्यान बरेचदा काहीतरी खरडलं जातं, ते कधीतरी बरं जमलेलं असतं. ते कागद, रायटिन्ग पॅड्स जपून ठेवते मग. हल्ली फोनवर पटकन फोटो काढता येतो ते बरंय. हे अशासाठी की ते बरं जमलेलं कधीतरी कुठेतरी पुन्हा वापरता येईल म्हणून.

मी अशी बरी जमलेली इथे देत जाईन. आवडतील अशी आशा. तुम्हाला पुढे ती भरतकाम, विणकाम, फॅब्रिक पेन्टिन्ग, इतर हस्तकला इ. साठी वापरायची असतील तर अवश्य वापरा.

सुरुवात म्हणून हे बाप्पा डूडल पोस्ट करत आहे.

'स्वच्छता अभियान' माझंही!

पहाटेचा हवेतला गोड सुगंध, हातात वाफाळता कप आणि समोर कोरं करकरीत वर्तमानपत्र.. हिवाळ्यातली सुट्टीची सकाळ म्हणजे पर्वणीच! गरमागरम चहाला फ्रेश विचारांची आणि निवांतपणाची साथ एरवी दुर्मिळच! रोजची धावपळ, उलटसुलट विचार अन ताण जणु अंधारातच विरघळला.. अन मस्त अशा मनस्थितीत मी पेपर वाचायला घेतला. पहिल्या पानावरच 'भारत स्वच्छता अभियाना'ला मिळत असलेला भरघोस प्रतिसाद याविषयीचा २-३ बातम्या! सोबत हातात झाडू अन खराटे घेतलेल्या स्वयंसेवकाचे प्रकाशचित्र! स्त्री-पुरुष, तरुण-वयस्कर स्वयंसेवक, नेतेमंडळी, सेलिब्रीटी.. जातपात, धर्म या अन अशा कोणत्याही बंधनात न अडकता देशाच्या स्वच्छतेचा मार्ग रेखत होते..

महिला दिनानिमित्त खेळ - मी ही अशी !

सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलो आहोत एक खेळ - मी ही अशी!

हा तसा म्हटला तर खेळ, आणि तसा म्हटला तर स्वतःशीच साधलेला संवाद...

Keywords: 

उपक्रम: 

मन

मन घुंघुर घुंघुर
लडिवाळ त्याचा नाद|
सवे दारी-अंगणात
पारिजात पारिजात|

मन खळखळ लाट
मन शंखले शिंपले|
ओंजळीत साठवले
नभ सूर्य चंद्र तारे|

मन मोगर्‍याचे फूल
मन कस्तुरी दरवळ|
पहाटेच्या नीरवात
मन काकड्याचा स्वर|

मन माथी मोरपीस
मन सुरेल बासरी|
उभ्या 'सावळ्या'च्या संगे
मन चैतन्याच्या सरी|

मन समईची वात
त्यात 'मी'पण जळावे|
मन सोने उजळता
मन 'सावळे'ची व्हावे|

लय जुळता सख्याची
मन होई निराकार|
मागे उरे माझे मन
त्यात 'सावळा' साकार||

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle