March 2015

अडीच सफरचंदं आणि एकच(+१) प्याला! (रंगीत अ‍ॅड केलाय)

ही दोन पेन्सिल स्केचेस म्हणजे "चित्रं काढायचं" म्हणून नीट वेळ काढून बसून काढलेली आहेत. पेन्सिल आवडतं माध्यम आहे पण रंगीत पेन्सिलीने जास्त काही केलेलं नाही. ही सफरचंदं पहिलीच!

apples2.jpg

wcup.jpg

ड्रोगॉन.. Blushing
drogon.jpg

पेय रंगीत-

कलाकृती: 

आसनं समर्पयामि!

हा माझा लेख माबोवर आणि माझ्या ब्लॉगवरही आहे. इथल्या मैत्रिणींपैकी ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी परत टाकतेय.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01 Ganesha-stone.jpg
01 Ganesha-stone.jpg

एक अनुवाद : Union Square: BY SARA TEASDALE (1884–1933)

एक कविता सगळ्याजणींसाठी , आशा करते की आवडेल :) , हा एक अनुवाद आहे -
विषय असा- एखादी साधी मधुर रचना असते. निखळ आनंद देते ती वेदना पोचवतानाही.वेदनेला सुंदर करण्याची ही प्रेरणा कविताच देत असते .. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते जवळ राहूनही कधी कळलंच नाही. आपणही संकोचाची सीमा ओलांडू शकलो नाही. अगदी सर्वसामान्य स्त्रीच्या भावजीवनात घडू शकणारी गोष्ट.’ Union Square’(1911) या SARA TEASDALE (1884–1933) यांच्या याच विषयावरील कवितेत मन असं गुंतून पडतं की जणू ही काल-आजची गोष्ट आहे !पण या कवितेचा शेवट मात्र विलक्षण धीट आहे.खिन्न करणारा आहे. तो आजच्या काळातही पचवायला जड वाटेल ..

सागरा,

IMG_20150316_083338.jpg

नाही खळखळाट,आहे फक्त अविरत गाज
साऱ्या आयुष्यभराचा,एक धीरगंभीर साज

लाटांच्या पाठीवर पडते, लाटांचीच थाप
न वाहता उचंबळत राहण्याचा तुला अभिशाप

तू श्वास उश्वास शशीचा, अखंड- निरंतर
पिउनि आसवे विश्वाची, तू करुणाकर

पोटात तुझ्या सामावली किती किती गुपीतं
सारे सारे देऊनही, अपार तुझं मन नाही होत रितं

सामावतोस साऱ्या, जगभराचं पुण्य पाप
सारे सारे रिचवून तू पुन्हा स्वच्छ, निष्पाप

इंट्रोड्युसिंग 'नी'

logo-page.jpg

नमस्कार मैत्रिणींनो,
बरेच दिवस येणार येणार जे ऐकत आहात त्या 'नी' ब्रॅण्डची एक सुरूवातीची झलक फक्त मैत्रिण वरच्या मैत्रिणींसाठी आणते आहे.
मी डिझाइन केलेली विविध धातूंच्या तारा वापरून बनवलेली काही कानातली लवकरच आणणार आहे.
सध्या केवळ कानातल्यांचेच कलेक्शन असेल.

तांबे, पितळ आणि जर्मन सिल्व्हर या तीन धातूंच्या तारांमधून ही कानातली बनवलेली असतील.
प्रत्येक कानातल्यामधे केवळ एकच वा दोन धातूंचा वापर असेल.

कॉर्पोरेट आणि कॅज्युअल अश्या दोन स्टाइल्स असतील.

अ‍ॅन्ग्री बर्ड आणि इतर

हा बघून काढलाय. मूळ पक्ष्यात नजर थोडी खाली होती, काढताना तो समोर बघतोय रागीटपणे असं झालंय.

angry.jpg

हा हॅपी डूडल-

happy.jpg

फारच जास्त वेळ मिळाला होता कधीतरी रन्गवायला....

HD2.jpg

कलाकृती: 

चित्रपटांतील आवडलेले सीन्स

या धाग्यावर आपण मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषीय चित्रपटांतील आपल्याला आवडलेले सीन्स शेअर करूयात आणि त्यावर चर्चा करूयात.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle