March 2015

दोऱ्याने विणलेल्या कलाकृती

लोकरीच्या गोष्टी नेहमीच नाही घालता येत. म्हणून मग काही गोष्टी दोऱ्याच्याही करून बघितल्या. हा दोरा अजून भारतात बऱ्यापैकी महाग आहे अाणि दोऱ्याचे विणकाम जास्त कौशल्याचे अन वेळेचेही काम. स्वाभाविकच त्यांची किंमतही जास्त.

1.
IMG_20150320_131014.jpg

2.
IMG_20141224_223532.jpg

3.

कलाकृती: 

सृजनाच्या वाटा

सृजन म्हणजे जणू आपल्या अंतर्यामीचा उन्मेष!

या उन्मेषाचे विविध आविष्कार एका व्यासपीठावर आणण्याचा एक अभिनव उपक्रम आम्ही 'मैत्रीण.कॉम' वरील सर्व मैत्रिणींसाठी घोषित करत आहोत - सृजनाच्या वाटा.

या उपक्रमांतर्गत दर महिन्यासाठी एक विषय (थीम) निवडण्यात येईल. त्या एक महिन्याच्या कालखंडात या विषयाच्या अनुषंगाने सदस्य मैत्रिणींनी आपापल्या कलाकृती इथे सादर करायच्या आहेत. या कलाकृती कोणत्याही स्वरुपातील आणि / किंवा माध्यमातील स्वनिर्मित कलाकृती असू शकतील.

Keywords: 

उपक्रम: 

माय आर्ट इज डूडलिंग… काही नवीन डूडल्स

बुकमार्क्स २ :

-----------------------------------------
मैत्रीण : ही वेबसाईट सुरु होत असताना काढलेलं हे डूडल. प्लूनी आजारी होते आणि डोक्यात 'मैत्रीण' चे विचार होते...

कलाकृती: 

किंचित चित्र

मी काही चित्रकला शिकले नाही. पण आवड फार. त्यातून कागदावर पेन्सिल,रंगीत पेन्सिलीने चितारलेली ही काही चित्र

कलाकृती: 

ये मोह मोह के धागे !

" कस पसंत केलत हो तुम्ही एकमेकांना ? " आजी धडधाकट असताना आमच्या कौटुंबिक गप्पामध्ये एकदा तरी आजी आजोबांना हा प्रश्न विचारला जायचाच . कारण माझे आजोबा म्हणजे अमिताभ बच्चन आणि आजी जया भादुरी. स्वभावही दोन ध्रुवावरचे .. मग दोघेही गाल्यातल्या हसायला लागायचे. हसायला कारणही तसच. प्रश्न जसा ठरलेला तस ऊत्तरही ठरलेलं.

"आम्ही पसंत पडलो ते एकमेकांच्या आई बाबांना . तुझ्या आजीला सर्वात प्रथम पाहिल ते लग्नात . तोपर्यत कुठली बायको, कूठला नवरा आणि कुठल काय. वडील माणस सांग्तील ती पूर्वदिशा . त्यानीच ठरवायच , आम्हाला फ़क्त माळ घालायला ऊभ केल जायच " इति आजोबा.

Taxonomy upgrade extras: 

तो पाऊस.. हा पाऊस..

अगेन.. फार जुनं लिखाण.. :)

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.
मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! :) )
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..

एक सुटलेले कोडे

मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली.  मार्चचा शेवट आणि  हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले. 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle