May 2015

खुलभर दुधाने भरलेला गाभारा

कोणे एके काळी एक राजा होता. राजाचे दोन तीन देव युरोप आणि अमेरिका खंडात होते. देवांची राजावर कृपा होती. राजाला भरभरुन काम मिळाले. त्याची भरभराट झाली. राज्यात समृद्धी नांदू लागली. आता राजाला देवांचा नवस फेडायला पूर्ण गाभारा ईतर राजांपेक्षा कमी वेळात दुधाने भरायचा होता. राजाने प्रजेला हुकूम दिला की दोन दिवसात गाभारा दुधाने भरला पाहिजे. प्रजेची घाई झाली. बर्‍याच जणांनी पोरं बाळं उपाशी ठेवली आणि सगळं दूध गाभार्‍यात नेऊन ओतलं. काही जणांनी पोरा बाळांना दूध पाजलं, स्वतः प्यायलं आणि उरलेल्या दूधात भरपूर पाणी घालून ते दूध गाभार्‍यात ओतलं.

लेख: 

खडूचा दिवा

ही मूळ संकल्पना माझी नाही. याबद्दलचा लेख एकदा वाचला होता. तो प्रयोग स्वतः करुन पाहिला. त्यानंतर दोन-अडीच वर्षांपूर्वी लेकाच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी मी हा प्रयोग सुचवला होता ज्याचे फार चांगल्या प्रकारे शाळेत स्वागत झाले. प्रदर्शनातही या प्रयोगाची विचारणा अनेकांकडून झाली.

आज सॄजनाच्या वाटा या उपक्रमांतर्गत 'रिसायकल-अप्सायकल' या विभागात मी हा प्रयोग- साहित्य, कॄतीसह इथे देत आहे. याचा उपयोग विशेषकरुन ग्रामीण भागातील लोकांना होऊ शकतो आणि तेही जिथे भारनियमन आहे अशा ठिकाणी. विशेष म्हणजे यासाठी लागणारे साहित्य अत्यल्प दरात मिळू शकते.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

अतुट नाती

माझा लेक अगदी बाळ असताना पांघरूण म्हणून माझ्या सुती साडीची चौघडी पांघरत असे. कालांतराने ती चौघडी अपुरी पडू लागली तशी एकाला लागून एक अशा दोन मऊ साड्या पांघरू लागला. आपोापच त्या एकमेकींना शिवणे आले, आणि आमचे माय-लेकाचे पहिले नाते जास्त घट्ट झाले आणि त्या गोधडी सारखे मऊही :-)
पण मग थंडीत त्याला ही गोधडी पुरेना. बरं माझेही एव्हाना साड्या वापरणे कमी झालेले, पंजाबीचा सुटसुटीतपणा बरा वाटू लागलेला.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पेन स्टँड, केक अन बरंच काही

माझी लेक इशिकाने बनवलेला पेन स्टँड - लिम्काचा किंवा तत्सम टिन, रद्दी पेपर,कार्ट्ररीज पेपर, स्ट्रा, फेविकॉल , रंग
केक - स्पंज, रंगित कागदाचे कपटे , लोकर अन रद्दी पेपर
बाहुली - शटलकॉक, टिश्यु पेपर, रंग, लोकर

IMG-20150502-WA0049.jpg

IMG-20150502-WA0051.jpg

Keywords: 

कलाकृती: 

छाया शिल्प

(जपान मधे एका म्युझियम मधे एक मोठा दगड ठेवलाय. ज्यावर माणसाची आकृती कोरली गेलीय. अणुबाँब पडला तेव्हा तो माणूस त्या आगीत क्षणात जळून गेला. दगडही जळला पण त्या माणसाचीची सावली पडलेला दगडही कमी जळला कारण त्या क्षणभरातली त्या माणसाची सावली.)

दिक्कालाचे एकच शिल्प,
मी उभा कधीचा त्या दगडाशी

मी उभा कधीचा त्या दगडाशी,
चालत होतो वाट जराशी
समोर होते कार्यालय अन,
उतरलो बस थांब्यापाशी
धावधाऊनी वेळ पाळण्या,
बॅग घेऊनी उरापाशी
फक्त होता मधे एक तो,
रस्ता ओलांडून जाण्यासाठी!

तिथेच उभा मी दगडापाशी,
वाट पाहत सिग्नलपाशी
तेव्हढ्यातच पण पहा आकाशी,
शतसूर्यांचा लखलखाट होई

Keywords: 

वाइल्ड - एक एम्पथी टूर. चित्रपट परीक्षण

" .... जीव असह्य दमला आहे. पायांच्या चिंध्या झाल्या आहेत. शरीराचा कण अन कण दुखतो आहे. पाणी संपत आले आहे. पाठीवरचे ओझे सहन होत नाही...." कुठल्या तरी मधल्याच शिखरावर बसून दम खाणार्‍या शेरीलची शारीरिक अवस्था बरी म्ह्णावी इतकी मानसिक अवस्था वाइट आहे. अशातच एक बूट घसरून दरीत पडतो. ती प्रचंड वैतागून शिव्या देते व दुसराही बूट फेकून देते. आता पुढील ट्रेक कसा पूर्ण करायचा ही चिंता देखील तिच्या मनाला शिवत नाही. ह्या पॉईंट वर सुरू झालेला चित्रपट नक्की कुठे जाउन संपेल हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. इथून सुरू होते एक शोधयात्रा. कसला शोध? स्वतःचा...

Keywords: 

स्लाईस ऑफ मान्सून

हे आमच्याकडचं "Slice of Monsoon"..
आमची स्वतःची लहानशी पावसाची सर...

भारतातल्या ज्या अगणित गोष्टी आम्ही इथे मिस्स करत असतो त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे मुसळधार पाऊस... खरं तर ओव्हरआल पाऊसच! त्यामुळे जेव्हा असं काहीतरी करूया हे डोक्यात आलं तेव्हा एक दिवसही वाया न घालवता आम्ही ही सर करायला बसलो आणि काही तासात पूर्णही झाली कि...

काही तास लागले कारण आम्ही बऱ्याच गप्पा मारत बसलो.. आम्ही म्हणजे मी आणि नवरा! पाऊस बनवायचा म्हणजे पावसाच्या गप्पा आल्याच... एकमेकांसोबत साजरे न केलेले आमचे २५-२७ पावसाळे आठवून त्यातले किस्से सांगत बसलो बराचवेळ. नाहीतर तासाभरात आरामात होईल ही कलाकृती.

सृजनाच्या वाटा: 

लोणी कढवण्यातलं अध्यात्म.....अमेरिकन स्त्रीच्या दृष्टीकोनातून

लोणी कढवण्यातलं अध्यात्म ....एका अमेरिकन स्त्रीच्या दृष्टीकोनातून (भाषांतरित)
जराशी प्रस्तावना :
मागील वर्षी अमेरिकेतल्या मुक्कामात जेव्हा वेळ मिळाला तेव्हा वाचन केलं. त्यातच घरी येणाऱ्या योगा मॅगझीनचाही समावेश होता.
संपूर्णपणे योगाला वाहून घेतलेलं अमेरिकन योगा मसिक. त्यात २००९ सालच्या एका मासिकात एक लेख आढळला. एका अमेरिकन महिलेने लिहिलेला.
काही कारणाने तिला लोणी कढवून तूप करण्याच्या पद्धतीची नव्यानेच माहिती झाली. आणि ती तिला खूपच आवडली आणि उपयुक्त वाटली. गरज ही शोधाची जननी आहे...म्हणतात ना!

वॉटर सिटी

सध्या आमच्या घरात क्राफ्टींग प्रोजेक्टचे वारे वाहत आहेत.लेक (वय वर्षे ३.३ ) शाळेत वेगवेगळे क्राफ्ट्स करायला लागल्या पासून घरी सुद्धा रंगीत पेपर, ग्लू, कलर्स घेऊन 'मी प्रोजेक्ट करतेय' असं म्हणत आकार कापणे , रंगवणे,चिकटवणे असं काही तरी करत असते. घर आवरताना एक पॅकेजिंगचा कार्ड्बोर्ड सापडला. त्याचा शेप इंटरेस्टींग वाटल्याने जपून ठेवलेला. नेमला लेकीच्या हातात आला.तीने तो कशाचा आहे हे विचारल्यावर मी ह्याचा प्रोजेक्ट करायचा आहे असं सांगितलं . मग आम्ही दोघींनी मिळून केलेला हा आमचा छोटासा प्रोजेक्ट :)
वापरलेल्या वस्तू :
बेस - ज्युसरच्या पॅकेजिंगचा कार्डबोर्ड
घरे - पेपर रोल आणि कार्ड पेपर

सृजनाच्या वाटा: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle