August 2015

पहिल्या पावसात अजुन काय लिहीणार?

(थोडा जुना पाऊस आहे हा... पण इथल्या सगळ्या छान छान पोस्ट पाहून शेअर करावासा वाटला)

तू लांब गेल्यानंतरचा पहिलाच पाऊस हा! नाही.. नाही म्हणजे आभाळ भरुन आल्यावर माझं मन दाटुन वगैरे आलं नाही. किंवा पावसाचे थेंब आणि माझे अश्रु वगैरे असंही काही झालं नाही. अगदी खरं सांगु तर तुझी आठवणही आपणहुन आली नाही... आत्ता तासभर पागोळ्यांशी खेळत पडवीत बसले होते, पावलांवर पावसाचं पाणी झेलत..

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पाउस गाणी

पावसानेच सांगितलंय मला
इतकंही कमजोर व्हायचं नाही
कितीही भरून आलं तरीही
लगेच असं कोसळायचं नाही
-------------------------------
पावसात जेवढा ओलावा नसेल
तेवढा जिव्हाला मैत्रीतून मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
उन्हात गेल्यावर कळतो.
--------------------------------
रात्रीचा वारा सुटलेला आणि
पाउस पडत होता
सहज वर पाहिले तर चक्क
चंद्र रडत होता.
------------------------------
पावसाची सर आता
नुकतीच बरसली
आणि आठवणीची पाऊल वाट
पुन्हा एकदा हिरवळली

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle