August 2015

छत्रीवाली मुलगी

हे लारानं साधारण तीन वर्षांपूर्वी तयार केलेलं चित्रं आहे. त्यावेळी ती ९ वर्षांची होती.

यात पेपर कटिंग ( छत्री), कागदाच्या उलटसुलट घड्या (मुलीचा फ्रॉक), छत्रीवर चिकटवलेलं फूल अशी हस्तकला आहे आणि बाकी चित्रं जलरंग आणि स्केचपेनानं रंगवलं आहे.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

कविता

पाऊस पडतो..
कुठेही,कसाही, कधीही पडतो..

गवताच्या पातीवर
डोंगराच्या छातीवर
वाट पाहून आसुसलेल्या
काळ्याभोर मातीवर..

ताडांवर माडांवर
हिरव्यागार झाडांवर
वठलेल्या खोडांवर
जुन्या जाणत्या वाड्यांवर..

फुलांवर मुलांवर
उंच उंच झुल्यांवर
लांब लांब शेपटीसारख्या
चमचमणार्‍या रुळांवर..

नदी नाले ओढे तळी
फेसाळत्या सागरावर
कमरेवरती हिंदकळणार्‍या
भल्यामोठ्या घागरीवर..

पाऊस पडतो

डोळ्यांतल्या पाण्यावर
मनातल्या गाण्यांवर
उगाच लटक्या लटक्या
नाजूक नाजूक बहाण्यांवर..

तिच्या वेणीवर
त्याच्या बटांवर
प्रेमाच्या अगणितश्या
रम्य रंगीत छटांवर..

पाऊस आमच्यावरही पडतो

सृजनाच्या वाटा: 

पाऊस = चहा!

पाऊस म्हणले की आठवतात ती पुस्तके! खिडकीशी बसून चहा पीत पाऊस बघणे यातच खरे सुख! हॉस्टेलला असताना माझी कॉट अगदी खिडकीशी होती. पडद्यांना खिळे मारायला परवानगी नव्हती म्हणुन फक्त काचेच्या दारे असलेल्या खिडक्या! सेमेस्टर सिस्टीममुळे अभ्यासाव्यतीरिक्त फार काही वाचायला वेळ मिळायचा नाही तरी एखादी कादंबरींका होईना वाचली जायची. कॉलेज नुकतेच चालू झालेले असायचे. मस्त पावसाची झिम्मड, भिजणारे गवत खिडकीतून बघताना चहा हा हवाच! मी पट्टीची चहाबाज वगैरे अजिबात नाही. रोज हवाच असे नाही, पण पाऊस आणि पुस्तक या काँबीनेशन बरोबर तो हवाच!

तर असा हा चहा! मी केलेल्या कपातून प्यायला या!

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ये मोह मोह के धागे

खूप दिवसांनी असं काहीतरी ऐकलं. जीवाला गुंतवावं असं... कसा जीव गुंतला होता, नाजुक नाजुक दोर्यांच्या वेढ्यांमध्ये. धागे सोडवावेत तरी कसे, थोडे माझ्या हातात, थोडे तुझ्या हातात. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं अशक्य... तू तिथं दूर मी इथं कुठंतरी. तरीपण एकमेकांच्या बोटांमधले गुंतलेले काहीतरी अनामिक, अपूर्ण, अर्धवट!

सृजनाच्या वाटा: 

नभ उतरु आलं....

काही वर्षांपूर्वी लोणावळ्यातील एका शिखरावर बांधलेल्या अप्परडेक नामक रिसॉर्टमध्ये ऐन जुलै महिन्यात जाण्याचा योग आला होता. तिथेच टिपलेली काही प्र.चि.

१. सावळ्या ढगांना या पाण्याचं ओझं पेलेनासं झालंय जणू आणि आता कोणत्याही क्षणी ते बरसतील

२. पण त्याआधी अंमळ डोंगरमाथ्यावर विसावून घेऊ

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे

पाऊस: आगळावेगळा-पण ओळखीचा !

पाऊस - कधी धो-धो पडणारा, तर कधी रिमझिम बरसणारा, कधी रौद्र रुपात तांडव करणारा तर कधी गायब होणारा ! अशी पावसाची विविध रुपे तर सर्वज्ञात आहेत. पण या नेहमीच्या पावसाव्यतिरिक्त आहे का असा एखादा पाऊस जो आपल्या सार्‍यांना चिरपरिचित आहे अगदी अनादि काळापासून?

अगदी तान्हे बाळ असतानाही आपल्या गरजा, हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी आपण 'या पावसाचा' उपयोग करुन घेत असतो. या पावसाचे थेंब पाहून भलेभले घायाळ होतात, अगदी शरणागतीही पत्करतात.

गॄहराज्यावरी गाजवी सत्ता राजा चिमणा एक
अन या 'चिमण्या राजाचं' हुकुमी अस्त्र असतं 'हा पाऊस' !

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle