March 2017

असं असं घडलं...(लेखमालिका)

तर इतिहास! नक्की काय म्हणजे इतिहास? अनेक काळ चर्चिला गेलेला हा विषय. त्याच्या सैद्धान्तिक चर्चेत मी इथे घुसणार नाही, आधीच म्हटलय की हा संशोधनपर लेख नाही. पण सर्वसामान्य जनतेत इतिहासाबद्दल असणाऱ्या समजांबद्दल, नावडीबद्दल, अतिरेकी आवडी बद्दल, नको इतक्या आग्रहीपणाबद्दल मला जरा बोलावसं वाटतय.
तर,

1. इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे गाडलेली मढी उकरून काढणं, इतिहास म्हणजे राजांच्या गोष्टी, .....

2.इतिहास का शिकायचा? तर भूतकाळावरून काही शिकायचं, भविष्यकाळाचा अंदाज घ्यायचा, वर्तमान काळ जगताना मागील चुका न करण्याची खबरदारी घ्यायची, इतिहास म्हणजे शास्त्र/ कला/ गोष्टी,....

लेख: 

इंटरमिटन्ट फास्टिंग

एप्रिल २०१६ पासून मी १८ किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात.

पहाट

पहाट
प्रभाती जागुनी झाडावरती
गोड किलबिल पक्षी करती
झाडामागे रवी जागला
मोदभरे संगती सकला

नभी दिसला चंद्र थकलेला
निरोप देण्या गेला शुक्र तारा
उरवी जेथे भेटे आकाशाला
उखा आणी तेथेच दिनकरा

भानू लाल गोल-मटोल झाला
उरुभागी मातेच्या पहुडला
लाली गाली,सर्वांगी चढली नीरी
व तरुशिरी उष्णीश सोनेरी

शीतल गंधित पावन वाहे
वार्ताहार तो उत्तम,वदे
संगे भूपाळी,ईश्वरा वंदूनी
संगे,सुप्त जीव जागे करुनी

कविता: 

असं असं घडलं...३. मध्ययुग

आधीचा भाग

इतिहासात प्राचिन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तीन प्रमुख कालखंड.
प्राचीन आणि आधुनिक युगांच्या मधले हे युग म्हणून मध्य युग. यालाच अंध: काराचे युगही म्हटले जाते.

कसे होते हे मध्य युग, का होते अंध:काराचे?

लेख: 

मन

 कधी अचानक दिवस उगवतो 
खूपच वेगळा अगदी वेगळा 
त्याला रोजची घाई नसते 
जाण्याची गती नसते
            रेंगाळणाऱ्या वार्यासारख्या
            तो  थांबून थांबून चालतो 
            जुन्या  पुराण्या आठवणीना
            तो आठवत आठवत निघतो
सुखाबरोबर दुखाचीही गोष्ट निघते
मनातील कोपर्‍यामधील आठवणी उजळत
मधेच एखादी अनामिक हुरहूर दाटते 
आणि अशातच संध्याकाळ होते
           मन पुन्हा एकदा विचलत होते
          पूर्णपणे घुसळून निघते
          मग एखादी अशा मनामध्ये जागते
         उरलेल्या आयुष्याला पुन्हा दिशा देते

Keywords: 

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle