March 2017

मासिके/ नियतकालिके आणि इतर...

मला आजच फेसबुकवर टाईमपास करताना द न्यु यॉर्करचे चांगले डील मिळाले. १२ आठवड्याचे $५. त्यात घरी मासिक येणार तसेच डिजिटल एडीशन सुद्धा. आत्ता ते पाहात होते तर त्यात अगदी पूर्वीचे अंक १९२५!चे सुद्धा वाचता येतात.
मला चांगले वाटले डील. इंटरेस्ट असल्यास इथे बघा: https://subscribe.newyorker.com/subscribe/newyorker/110617

मला वरील माहिती द्यायची होती, ती कुठे द्यावी कळेना. पुस्तक अ‍ॅज सच नाही हे. मग मासिकांचा वेगळा धागा काढला आहे. न्यु यॉर्करच नाही तर इतरही चर्चेला घेऊ शकता.

ब्लू वॉटर पिझ्झा - खाऊगिरीचे अनुभव २

ऑस्ट्रेलियातील न्यूकासल तसे फारच बोअर गाव होते असे मी मागच्या लेखात सांगितले होते. तसे असले तरी तेथे काही काही फार छान रेस्टॉरंट्स होती त्यातीलच एक ब्लू वॉटर पिझ्झा होते. अगदी समुद्रकिनाऱ्याजवळ होते तिथून खूप छान देखावा दिसायचा. उन्हात चकाकणारे निळे हिरवे पाणी बघत जेवताना फार छान वाटायचे.

लेख: 

ImageUpload: 

तुझ्यासाठी..

दूर दूर चालतांना वाट काही दिसत नाही..
जीवघेण्या वाळवंटात साथ कुणाची मिळत नाही..
आधार घ्यावा कोणाचा हे माझं मलाच कळत नाही..
आणि रडू नये, हताश होऊ नये हे कळूनसुद्धा वळत नाही..

ज्यांनी या जगात आणले त्यांच्याशी नाळ कधी तुटली.. कळलंच नाही..
ज्यांचा हात हातात धरला त्यांना नक्की काय हवंय.. कळलंच नाही..
नक्की कोणासाठी हा आटापिटा.. कोणास ठाऊक..
नक्की काय मिळतंय यातून.. झुरण्याशिवाय.. कोणास ठाऊक..

खूप एकटं वाटतं तेव्हा वाटतं तू या जगात यावं..
काही न बोलता सुद्धा खूप काही बोलून जावं..
तुझ्यासाठी वाटतं जगावं आणि तुझ्यासाठी मरून जावं..
माझ्यासाठी तुझ्यासाठी.. तू माझ्या जगात यावं..

कविता: 

जुन्या आठवणींना उजाळा - बगळ्या बगळ्या कवडी दे

हा लेख मी मायबोलीवर मार्च २००६ मध्ये लिहिला होता. त्यात थोडेफार बदल करून इथे देते आहे.

बगळ्या बगळ्या कवडी दे,
रांजणखोलची नवरी ने!

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle