April 2022

स्टेट, नॅशनल पार्क्स - ११. 'भातुकली ते शिमगा'- Chatfield & Staunton

Staunton State Park ट्रीप करण्यापुर्वी लेक मागे लागलेला म्हणुन मी लेकाबरोबर Chatfiled State Park ची ट्रीप केली. त्याबद्दल थोडक्यात लिहिते.

View.jpg

वसंतानुभव - १

शुष्क, पर्णहीन आणि राखाडी, ब्राऊन रंगाची झाडं, ढगाळ हवामान, सूर्य उगवला तरी थंडीचंच साम्राज्य, हिमवर्षाव झाला तर नवलाईचे दोन दिवस असे हिवाळ्याचे महिने जातात आणि मार्च उजाडतो. नेहमी सारखी थंडी नव्हतीच असे आठवणींचे उमाळे असले तरी रोजच्या सूर्यदर्शनाने, निळ्या मोकळ्या आकाशाने आपोआप जास्त उत्साही वाटायला लागतं.

सृजनच्या शाळेत या दिवसात एक खूप छान गाणं म्हणतात. मागच्या वर्षी मला पहिल्यांदा हे गाणं समजलं, पण सगळे शब्द लक्षात आले नव्हते, आता यावर्षी सृजन सध्या अखंड हे गाणं छान चालीत म्हणत असतो आणि मी पण त्याच्या सोबत म्हणत असते. त्या ओळींचा अर्थ मराठीत साधारण असा होतो -

लेख: 

स्टेट, नॅशनल पार्क्स - १२. 'Only the paranoid'- Staunton

Woods_0.jpg

ट्रेलवर निघाले तेव्हा उन्हे जरा कलली होती. सुर्यास्ताची वेळ ७.३० होती त्यादिवशी. म्हणजे मुक्कमास परतण्यास ४ तास तरी होते सहजच. ट्रेल म्हणजे एक लुप होते. डाव्या बाजुने वर डोंगरावर जाऊन मग उजव्या बाजुने दुसर्‍या ट्रेलवरुन परतीचा उताराचा रस्ता असणार होता. छोटी सॅक, त्यात थोडासा खाऊ, पाणी घेऊन निघाले. वाटेत हा फोटो काढला मी कारण जी हिरवळ दिसतेय ना फोटोत ती अगदी गालिच्यासारखी वाटली, मऊ मखमली! अगदी सुखद स्पर्श होता तिचा.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १४. ' जाऊ तेथे खाऊ' Staunton

मन विचीत्र असते. एरवी एकटेपणामुळे भिती आणि काळजी असायची आणि आता कुणीतरी आहे म्हणुन चिंता वाटु लागली. त्या तंबुत बारकासा लाइट दिसत होता. एक किंवा दोघंजण असावेत आत. माझ्या तंबुमधुन फ्लॅशलाइट घेतला आणि पार्किंगला गेले. तेथे रेस्टरुम्स आहेत. फ्लशवाली नाहीत पण वॉल्ट टॉयलेट्स आहेत. गाडीत अशीच असावी म्हणुन ठेवलेली सळई बरोबर घेतली, एक केक स्लाइस घेतला आणि तंबुकडे परतले.

Chatur

चतुर हजारो , अक्षरशः डोळ्यासमोर, घराच्या खिडकीत बसून बघतेय. भाग्य !!! खरंच मुंबई सारख्या ठिकाणी अंधेरीला अस काही घराच्या खिडकीत बसून डोळ्यासमोर येईल अशी अपेक्षाच जिथे दूर तिथे हे घडताना बघतेय. कदाचित पहिल्यांदा, कदाचित ह्या करता की आधी अस शांत बसून बघणं झालं नसेल किंवा संख्या जाणवली नसेल किंवा नुसतीच भिरभिर वाटली असेल. कारण काही असो, आता जाणवत आहे ते काहीतरी सुंदर भव्य आणि दुर्मिळ.

'हमिंगबर्ड, एsss हमिंगबर्ड... ' 

आमच्या बागेत बरेच पाहुणे येऊन जाऊन असतात - काही नकोशे, भीतीदायक किंवा उपद्रवी सरडे, उंदीर असे तर काही आवडीचे जसे की, फुलपाखरं, तांदूळ टिपणाऱ्या चिमण्या, पिटुकले रंगीत अनामिक पक्षी आणि आमचा लाडका हमिंगबर्ड. हमिंगबर्ड- फुलपाखरांच्याच आकाराचा पिटुकला पक्षी- त्याचे पंख इतके वेगात फिरत असतात की त्यामुळे हम आवाज येतो म्हणून त्याला हमिंगबर्ड म्हणतात. तर, आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या पक्ष्यांत हमिंगबर्डस् चा वावर जाणवण्याइतका जास्त असतो. लहान बाळाच्या मुठीएवढ्या आकाराचे हे पक्षी झूप-झूप इकडून तिकडे फिरत असतात. आमची गुंडाबाई बोलायला लागल्यापासून  'हमीनबल्ड, एsss हमीनबल्ड' अशी साद घालते आहे.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १५. 'ॠणानुबंधांच्या गाठी' - Mueller

Mueller State Park चांगले ९६०० फुट उंचीवर आहे आणि मी गेले होते नोव्हेंबर महिन्यात, त्यामुळे बर्फच होता काही काही भागांत. या पार्कमधुन उत्तर अमेरिकेतील Continental Divide दिसते. Continental Divide म्हणजे पर्वतरांगा, ज्या उत्तर अमेरिकेतील नद्यांचे दोन भागांत विभाजन करतात. पॅसिफीक सागराला जाऊन मिळणार्‍या नद्या आणि अटलांटिक सागराला मिळणार्‍या नद्या येथे वेगळ्या होतात असे कायसे. ही पर्वतरांग अलास्कापासुन चालु होऊन थेट मेक्सिकोपर्यंत जाते. या पार्कमधुन Continental Divide चा जो हिस्सा दिसतो, तो म्हणजे ' Rocky Mountain National Park' च्या पर्वतरांगांचा. हा एक फोटो काढला मी.

वसंतोत्सव

वसंत रंगात न्हाला गं
वसंत अंगात आला गं
पळस पांगारा शितल अंगारा
लेवून केशरी झाला
- शांत शेळके

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

फिटनेस डायरी २०२२

आपण सगळ्याच अधून मधून आरोग्यासाठी जागरूक होतो. काही काही करायला लागतो. फायदे तोटे डिस्कस करायचे असतात, काय केलं हे सांगितलं आणि समोरच्याने appreciate केलं की अजून थोडं मस्त वाटतं.
हे जास्त consistently होण्यासाठी अशी डायरी मेन्टेन करायची का?
रोज अगदी एखादी जरी गोष्ट आपण आपल्या overall health आणि फिटनेस साठी केली तरी ती लिहू या.
अगदी नीट झोप झाली किंवा मस्त योग्य प्रमाणात पाणी प्यायलं किंवा दिवसभर नीट balanced meals घेतली किंवा जिने चढले उतरले, १०के स्टेप्स केल्या, सकाळी लौकर जाग आली म्हणून एक सायकल ride केली,

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle