जानेवारी २०१६ - सुरूवात

फॅमिली क्रॉनिकल्स २ : श्रीगणेशा - अर्थातच सुरुवात!

या महिन्याचा सृजनाच्या वाटाचा विषय बघितला आणि म्हटलं, अरे, हा तर आपल्या स्पेशलायझेशनचा विषय... सुरुवात - म्हणजेच श्रीगणेशा.

'आमचे येथे कशाचीही 'सुरुवात' करून मिळेल, म्हणजेच कशाचाही 'श्रीगणेशा' करून मिळेल, पुढचे तुमचे तुम्ही बघा' - अशी आमची फॅमिली टॅग लाईनच ठरेल!

कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा आमचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. मग ते व्यायाम करणं असो, एखाद्या विषयावर वाचन असो, डायटिंग असो, घर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम असो. त्यातून त्या उपक्रमाला पैसे घालायचे असतील तर मग उत्साह अधिकच असतो. कुठलीही गोष्ट नुस्तीच न करण्यापेक्षा ती पैसे भरून नाही केली की कसं बरं वाटतं.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

गाजराच्या वड्या

ह्या वड्या करायला अगदी सोप्या आहेत. गाजराचा कीस, साखर, दूध, खवा इत्यादींचं प्रमाण बिनचूक माहिती असेल तर शब्दशः डोळे मिटून वड्या होतात. ह्या वड्या यंदाच्या मोसमात मी पहिल्यांदा केल्या त्याच मुळी १ जानेवारीला, म्हणून म्हटलं इथे साग्रसंगीत लिहूया जेणेकरून सृजनाच्या वाटामध्ये लिहायला माझी 'सुरूवात' होईल.

वड्या करण्यासाठी साहित्यः

गाजराचा कीस - ५ वाट्या
साखर - ३ वाट्या
दूध - २ वाट्या
खवा - १ वाटी
वेलची पूड - ३ टी स्पून
बदाम/ काजू/ पिस्त्याचे काप सजावटीसाठी

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

माझ्या डिजिटल चित्रकलेची सुरुवात

माझ्या भाच्याच्या लग्नात त्याच्या संसाराच्या वाटचालीच्या सुरुवाती साठी काढलेले हे डिजिटल (फोटोशॉपमधे काढलेलं) निसर्ग चित्र. नंतर ते कॅनव्हासवर प्रिंट करून त्याची फ्रेम केली.
माझ्या डिजिटल पेंटिंगची ही सुरुवात होती :-)
Chaitanya_Pooja copy.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सुरूवात

सृजनाच्या वाटाचा ह्या महिन्याचा विषय आहे सुरवात.
माझ्याकडे ह्यापेक्षा महत्वाची सुरूवात दुसरी कोणती असणार?

मैत्रीण.कॉमचे सुरवातीचे दिवस.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

Subscribe to जानेवारी २०१६ - सुरूवात
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle