February 2016

रपुन्झेल पास्कल अनं बरच काही....

हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे Wink )

रपून्झेल अन पास्कल :-)
IMG_20160121_210935_1.jpg

वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग

IMG_20160201_154639.jpg

Keywords: 

काच मण्यांची कर्णभूषणे

अमेझॉन वरून बीड ज्वेलरी मेकिंग किट मागवले व बसून काय काय बनवले आहे. अजून शिकतेच आहे. परवा एक मण्यांची ओळ केश्वीला बनवून दिली. खिळ्यावर टांगली की शोभेची दिसेल अशी.
पूर्वी पडदे असत असे काचेचे. एक सेट आहे. वीकांताला काय काय बनवत असते.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

मैत्रीण युनिव्हर्सिटी - मैत्रीण.कॉमच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा!

नमस्कार मैत्रिणींनो,

आज आपली मैत्रीण.कॉम एक वर्षाची झाली Thumbsup जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा मुख्य उद्देश घेऊन मैत्रीण ची वाटचाल सुरू झाली. आधारगट म्हणून मैत्रीण आज भक्कमपणे उभी राहिली आहे. सोबतीने अनेक उपक्रम, चर्चा, लेखनही गेल्या वर्षभरात अगदी यशस्वीपणे पार पडले. आज पहिल्या वाढदिवशी एक वेगळे पाऊल टाकण्याचा मानस आहे.

उपक्रम: 

काच मण्यांची कर्णभूषणे भाग दोन.

अजून काही बनवली आहेत. फोटो फोन वरून काढले आहेत व धागे दोरे जे दिसत आहेत ते नीट सफाइदार पणे करण्याचे काम ही चालू आहे. वाढदिवसाची भेट.

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

क्विलिंगची घड्याळे

दीड वर्शापूर्वी बहिणीला वाढदिवसाला काहीतरी वेगळी भेटवस्तू द्यावी असे डोक्यात होते. आणि नेटवर भेटवस्तू शोधता शोधता मला दिसली क्विलिंगची घड्याळे. किंमत होती १२०० ते १५०० अगदी माझ्या बजेटच्या बाहेर आणि . मग विचार केला, आपल्याला येतच क्विलिंग करायला, तर मग आपणच घड्याळ एक बनवुन द्यावे. आणि मग शोध सुरु झाला क्विलिंगसाठी मोकळ्या घड्याळाचा.

आणि फेविक्रिल हॉबी आयडियाजच्या दुकानात मिळालं एक घड्याळ. आणि भेट दिलं बहिणीला मी बनवलेलं क्विलिंगचं पहिलं घड्याळ. आणि ते पाहून तिच्याच ऑफिसमधल्या मैत्रिणींनी काही ऑर्डर्स दिल्या.

Keywords: 

कलाकृती: 

भीमबेटका - एक गूढ अनुभव

काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!

मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

Keywords: 

लेख: 

आवर्त

एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्‍यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle