June 2016

खेच ( वेगळी)

(मृ ने वापरला शब्द वेगळ्याच संदर्भात... त्याची कविता एक टिपी म्हणून तिथेच लिहिली. पण तो शब्द वेगळ्या अर्थाने मनात भिरभिरू लागला. अन मग ही उतरली मनातून खाली...)

तू म्हणालीस नजरेनेच
अन मी तुला जवळ खेचलं...
मनापासून हसलीस
अन लाजलीसही...

कित्तेक दिवस लोटले...
ना तू नजरेने काही बोललीस
अन मी ही नाहीच वाचले
तुझ्या अव्यक्त मनातले...

संपलीच का ग आपल्यातली
एकमेकांमधली,
ती हवी हवीशी
खेच...

कविता: 

पूल

तुला कळलं असेलच म्हणा,
कालच्या वादळी पावसात
आपल्या गावांना जोडणारा
पूलच मोडून गेला

तसं गाव नेहमीच्या
कामकाजात व्यग्र आहे;
पूल तुटल्याने काय ते
दळण्वळण फक्त बंद आहे

तसही स्वयंपूर्ण असल्याची
भावना इतकी तीव्र आहे
की आता दोन्हीकडून
परत पूल बांधायचे
प्रयत्नही होण कठीण आहे

हे देखील तुला कळलं असेलच म्हणा..

कविता: 

बुद्धिबळ

बुद्धिबळ शिकून घे!
तू नेहमी सांगायचास..

आयुष्यात कोण कसे
डावपेच खेळतोय;
समजायला उपयोग
होतो म्हणे त्याचा..

तू म्हणालास म्हणून;
शिकून घेतलं मी ते ही

पण; काळ्या पांढऱ्या सोंगट्या
अशी विभागणीच नसते
खऱ्या आयुष्यात

हे "चेकमेट" झाल्यावर
लक्षात आलं बघ

कविता: 

भटकंती ७

विविध ठिकाणी पाहिलेल्या इमारती, वाचलेली पुस्तके , गंध, चाखलेले पदार्थ ,ऐकलेली गाणी याना एका माळेत बांधणार यडच्याप मन आहे माझ. वरवर पाहता एकमेकाशी काहीही संबध नसता देखिल एकामागे एक फ्रेम्स उलगडातात.

भटकंती ८

भटकंती - ८ तदाओ आन्दो .

आर्किटेक्चरला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते.

उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! कंटेम्पररी , समकालीन हा शब्द आवडायला लागला होता. एक प्रकारच सबकल्चर/ कल्ट होउ घातलेले आम्ही काही बॅक बेंचर्स! पुण्यात काहीही नाही ह्यावर शिक्कामोर्तब करून, जगात इतर आर्किटेक्ट कसे विचार करतात , व्यक्त होतात , रुढ पायंडे मोडताना काय आणि कसा संघर्ष करतात. हे समकालीन नमुने बाकी कुठे कुठे काय आहेत? ह्याचा शोध चालू झाला.

"मिड पॉईंट रिव्ह्यू" - किल्ला (चित्रपट)

किल्ला
किल्ला रिलीज झाला तेव्हा अगदी बघायचाच होता .एक तर त्याच्या प्रोमोज मुळे आणि चित्रपटातल्या गुहागरच्या शुटींग मुळे. गुहागर हे माझ आजोळ असल्याने आणि लहानपणापासून "मे" महिन्याच्या सुट्टीत दरवर्षी गुहागरला जात असल्याने गुहागर मोठ्या पडद्यावर कस दिसेल ते बघण्याची ओढ जबरदस्त होती :)

तर आत्ता चित्रपटाविषयी :

चित्रपटाच घोषवाक्य आहे "तुमच्या मुलाच्या मनातल तुम्ही ओळखता का ?"खर तर कोणतेही आई -वडील आपल्या मुलाच्या मनातल ओळखतच असतात. पण मुलांच्या मनातल ओळखून त्या प्रमाणे कृती करण त्यांना शक्य असत का/जमत का? किव्वा त्यांच्या ते आवाक्यात असत का? हा कळीचा प्रश्न आहे.

उतू नका मातू नका फुकट काही घालवू नका - रिसायक्लिंग किंवा अपसायक्लिंग

विनीचा अपसायक्लिंगचा धागा आल्यापासुन डोक्यात होतं की एक कॉमन धागा काढूया, कारण आपण सगळेच काही ना काही रिसायक्लिंग किंवा अपसायक्लिंग करत असतो आणि आपण बनवलेल्या कलाकृतीचा आपल्याला मनोमन अभिमानही वाटतो. पण आपण प्रत्येकीने स्वतःच्या वस्तुंचा वेगळा धागा काढून त्यात फोटो टाकावेत एवढ्या क्वांटिटिमध्ये नसतात आपल्या वस्तु हे आपल्यालाही माहित असतं सो आपण बनवलेल्या अशाच थोड्या फार अपसायक्लिंगसाठी हा धागा वापरुया.

Keywords: 

असंही जोडलेलं एक नातं...

चार वर्षाची मुलगी आणि वर्षाचं बाळ मागे सोडून ती भरल्या संसारातून निघून गेली. गेली म्हणजे खरंच गेली, देवाघरी. घरावर दु:खाचं सावट पसरलं. पसरलं म्हणजे काय? घराला व्यापून राहिलं. कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे? मुलांचं काय? यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माहीत. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही आणि अशा कल्पना करूही नयेत. पण काय करणार? त्याच्यावर ती वेळ आली होती. घर लोकांनी भरलं होतं. जो तो जमेल तशी मदत करत होता.

लेख: 

भटकंती साडेआठ.

भटकंती - ८.५

तदाओ आन्दो.

तदाओ आन्दो नावाच गारुड एखाद्या लेखात मावणारं नाहीच. म्हणून हा साडे आठवा लेख.

अवचित सापडलेला एखादा सिनेमा भावतो आणि त्या दिग्दर्शकाच झाडून सगळ शोधुन पाहाव लागत ना , तसच झाल ह्या आन्दो सान च. 'चर्च ऑफ लाईट ' चे फोटो अन लहानसा लेख सापडला अन शोधयात्रा सुरु झाली. विद्यार्थीदशेत जे सापडल ते अनुभवांती उमजायला लागल. आणि नंतर त्या इमारती प्रत्यक्ष पहाण्याचीही संधी मिळाली.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle