July 2016

चला शिकुया कसुती ... (कर्नाटकी कशिदा)

कसुती हा आहे कानडी शब्द, कई (हात) व सुत (धागा) या दोन शब्दांपासून बनलेला. याचेच अजुन एक नाव म्हणजे - कर्नाटकी कशिदा. या शब्दाशी आपल्यापैकी अनेकांची ओळख
'रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी,
कर्नाटकी कशिदा मी काढला'

Keywords: 

कलाकृती: 

LCHF डाएट, मधुमेह आणि माझा अनुभव - भाग १

ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेचा पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.

सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटच.

Keywords: 

LCHF डाएट, मधुमेह आणि माझा अनुभव - भाग २

मला भात बंद करणे सहज जमले, परंतु चपाती एक तरी खायला हवी असे वाटायचे. पहिला दिवस एका चपातीवर निभावला. करून करायचे तर व्यवस्थितच करायला हवे (करून करायचे तर कच्चे का? अन माळ्यावर बसून अडचण क?) म्हणून मग चपाती ऐवजी भाकरी खावी असे ठरवले. एका जेवणात अर्धी ते पाऊण भाकरी.

गव्हातले आणि ज्वारी, बाजरीतले कर्बोदकांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास ते सारखेच आहे हे तपासल्यावर चौथ्या दिवसापासून मी भाकरीपण पूर्णपणे बंद केली.

सुरुवातीचे तीन महिने पूर्णपणे वर्ज्य केलेल्या गोष्टी :

चपाती
भात
मैदा
गोड पदार्थ (कोशिंबीरसुद्धा
बिन साखरेची)
भाकरी
कडधान्ये
डाळी
बीन्स
मटार
मका (दाणे, पीठ)

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

LCHF डाएट, मधुमेह आणि माझा अनुभव - भाग ३

हे डाएट तीन भागात केले जाते असे म्हणता येईल.

डाएटच्या पहिल्या भागात पूर्वी सांगितलेल्या आहारातून कर्बोदके कमी करून स्निग्ध पदार्थ वाढवायचे आहेत; पण ते चवदार लागते
म्हणून दिवसभराच्या एकूण कॅलरीजचे भान ठेवायचे. सुरुवातीच्या काळात भूक लागली की हाताशी सुकामेवा ठेवायचा. सुरुवातीच्या काळात प्रमाणात पाणी पिण्यावर लक्ष द्यायचे. प्रमाणात अशासाठी की अगदी मिनिटा मिनिटाला, तहान लागलेली नसताना दिवसाचे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून, गरज नसताना ४-५ लिटर पाणी पिणे योग्य नाही.

Keywords: 

तोलून-मापून

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील एक सरकारमान्य खाजगी शाळा. रविवार असल्यामुळे वर्दळ अशी नाहीच. एकच वर्ग तेव्हढा उघडा आणि बर्‍यापैकी भरलेला, तोही लहान मुलांनी नाही तर मोठ्या माणसांनी. 'पॉझिटिव्ह थिंकिंग' या विषयावर कसलीशी कार्यशाळा आयोजित केली होती या वर्गात. मीसुद्धा तिथेच, त्या वर्गातच हजर होते, निपचित पडून जे कानावर पडतंय ते ऐकत होते. तसंही टेबलावर धुळ खात पडलेल्या माझ्याकडे इतर कुणाचं लक्ष जाणार नव्हतंच. व्याख्याता बोलत होता, सकारात्मक रहायाला कसं शिकायचं?

Keywords: 

लेख: 

भटकंतीची बकेटलिस्ट

मी काही खूप भटकण्याची आवड असणारी व्यक्ती नाही. पण तरीही दोन गोष्टी मला मनापासून करायची इच्छा आहे.

१. हिमालयातला ट्रेक. छोटा/ सोपा/ मोठा / कठीण काहीही चालेल
२. नर्मदा परिक्रमा - चालत/ बसने/ कारने/ बाईकने कसाही चालेल

तुम्हाला कुठे आवडेल भटकायला जायला ? अगदी दोनच स्थळ निवडायची असलीत तर कुठली निवडाल?

सुशोभित किल्लीमंडले

तुम्ही घर सोडून बाहेर पडताना काय काय घेउन निघता? फोन, पर्स, पैसे, किल्ल्या? घरच्या अन कारच्या? ह्या किल्ल्या फार महत्वाच्या असतात आपले लाडके घर, आपली जानी दोस्त कार व कामाच्या ठिकाणी महत्वाची माहिती स्टोअर केलेली जपणार्‍या छोट्या जीनीच. ह्या किल्ल्यांसाठी मी छानश्या कीचेन्स बनवल्या आहेत. काच मण्यांची मी फॅन आहेच. व सेट मध्ये फिट न होउ शक णारे पण आपल्या जागी सुरेख, क्यूट असे मणी पडून होते. स्टार्ट टू फिनिश अर्धा तास लागला बनवायला. बघा ही सुशोभित किल्लीमंडले.

medium_013.jpg

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle